मणिपूर - पूर्वांचलसाठी आजवर RSS ने काय केले? (भाग १)

@दिपक राठोड

मणिपूर हिंसाचार प्रकरणामुळे पूर्वांचलची अनेक तथाकथित राजकीय, सामाजिक नेते आणि कथित बुद्धिवादी लोकांना आठवण झाली. पूर्वांचल म्हणून सात राज्यांचा एक प्रदेश भारतात असल्याचा त्यांना जणू आज साक्षात्कार झाला, आणि संघाला प्रतिप्रश्न करू लागला की संघाने पूर्वांचलसाठी काय केले? संघ जनजाती विरोधी आहे, संघ जातीवादी आहे, संघ अमक्याचा, संघ तमक्याचा अश्या खोट्या आरोपांवर ज्यांचे दुकान चालते त्यांनी पुन्हा अपप्रचार करून विचारणा केली की संघ पूर्वांचल साठी काय करतो. निदान या निमित्ताने का होईना, संघाचे व्यापक राष्ट्र कार्य त्यांना व समाजाला कळेल असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केलेला हा लेखन प्रपंच. 
संघ प्रचारक दादाराव परमार्थ, वसंतराव ओक आणि कृष्णाराव परांजपे यांनी 27 ऑक्टोबर 1946 रोजी आसाममध्ये प्रवास केला आणि त्यांनी गुवाहाटी, शिलाँग (आसामची तत्कालीन राजधानी) येथे आरएसएस शाखा स्थापन केल्या. तेव्हापासून पूर्वांचल मध्ये संघ स्वयंसेवक अविरतपणे राष्ट्रसेवा करत सर्व आव्हानांचा सामना करत आले आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चन बहुल क्षेत्र असतानाही संघकार्य वेगाने वाढत आहे.
भारताचा अभिन्न अंग असलेला पूर्वांचल, उगवत्या सूर्याची भूमी ज्याला म्हंटले जाते तो पूर्वांचल. त्याच भूमीत ब्रिटिशांनी फुटीरतावादाच्या विषवल्लीचे बीज रोवले जी आज देखील देशासाठी त्रासदायक आहे. या फुटीरतावादाच्या विषवल्लीला संपवण्यासाठी अखंडित व परम वैभवशाली भारत बनवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्वांचल मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अविरतपणे वाटचाल करीत आहे, तो ही राष्ट्रीय एकात्मता व बंधुभावच्या जोरावर. पूर्वांचल मधील एक एक राज्य भारतापासून तोडण्यासाठी राष्ट्र विघातक शक्ती कार्यरत होत्या तेव्हा संघाचे स्वयंसेवक घरादारावर तुळशीपत्र ठेवून पूर्वांचल मधील समाज बांधवांना राष्ट्राच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी समर्पण साधना करू लागले होते. 
पूर्वांचलमध्ये आज मोठ्या प्रमाणात संघ कार्य सुरू आहे ज्यात असंख्य प्रकल्प, सेवाकार्य, जागरण अभियान, अनेक आयाम, इ. परंतु हे कार्य सहजासहजी सुरू झालं नाही. पूर्वांचल हा चर्चचा प्रभावक्षेत्र आहे. तेथील फुटीरतावादी संघटना भारतीयांना म्हणजेच इतर राज्यातील नागरिकांना 'भारतीय विदेशी कुत्रे' असे  म्हणायचे. पूर्वांचल वगळता अन्य भारतीय नागरिकांचा द्वेष पसरवला जात होता. जवळपास 37 अतिरेकी संघटना पूर्वांचाल मध्ये कार्यरत आहेत. चीन इथे शस्त्रे पुरवत असतो. अश्या असंख्य गंभीर परिस्थितीत पूर्वांचल मध्ये संघ कार्य उभे राहिले आहे.
संघाच्या अनेक प्रचारकांनी इथे राष्ट्रसेवा करतांना प्राणाची आहुती दिली आहे. प्रचारक ओमप्रकाशजी यांची हत्या अल्फाच्या अतिरेक्यांनी केली. रक्तदानचे महत्व सांगणारे रक्तदाता सूचीचा प्रकल्प सुरू करणाऱ्या प्रचारक प्रमोद दीक्षित यांचीही हत्या करण्यात आली. प्रचारक मुरलीधरणजी यांची हालहाल करून हत्या करण्यात आली. तरीही स्वयंसेवक डगमगले नाहीत. अधिक शक्तीने प्रेमाच्या आणि बंधुत्वच्या जोरावर संघाने पूर्वांचल मधील नागरिकांना राष्ट्रीय विचारांचे जागरण केले.

सुरूवातीपासून स्वयंसेवकांनी पूर्वांचल मधील समाज जागृत करून समाजाला संघटित करून अतिरेक्यांच्या विरोधात उभं करण्याचे कार्य केले आहे. आपल्या गौरवपूर्ण संस्कृतीची भावना स्थानिकांमध्ये जागवत मिशनर्यांच्या राष्ट्रविरोधी कारस्थानची ओळख इथल्या स्वयंसेवकांनी करून दिली.  
पूर्वांचलच्या भागात वसतिगृहे, मोफत आरोग्य केंद्र, फळ प्रक्रिया केंद्रे, सहकारी संस्था, महिलांसाठी निटिंग व शिलाई प्रशिक्षण केंद्रे, सहकारी संस्था आदी उपक्रम संघाच्या माध्यमातून सुरू झाले. वनवासी कल्याण आश्रम, विद्या भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्याभारती, विश्व हिंदू परिषद, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, सेवा भारती यांचे कार्य इथे अत्यंत समर्पण भावनेने सुरू आहे. राष्ट्रीय भावनेने ओतप्रोत असलेली, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेतलेली विद्याभारती आज पूर्वांचलात मोठ्या विस्ताराने कार्यरत आहे. विद्याभरतीच्या 700 च्या वर शाळा आज तिथे चालत आहेत. 
जनजाती समाजाच्या उत्थानासाठी वनवासी कल्याण आश्रमचे कार्य अत्यंत सेवा भावाने सुरू आहे. मोफत शिक्षण, वसतिगृहे, एकल विद्यालय, आरोग्यासाठी अनेक प्रकल्प कल्याण आश्रमकडून चालवले जातात. ज्यात दुर्गम भागात आरोग्य वैद्यकीय सेवा दिल्या जातात. स्वावलंबन कौशल्य विकास शिक्षा, कृषी विकास, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बचत गट इ. श्रद्धा-जागरण म्हणून जे कार्यक्रम घेतली जातात, ज्यामुळे मद्यपान आणि इतर सामाजिक वाईट गोष्टी थांबल्या/कमी झाल्या आहेत. आदिवासी समाज धर्मांतराच्या विरोधात आत्मभान जागृत करून सशक्त झाला आहे. सामाजिक सौहार्द आणि एकतेचे वातावरण विकसित झाले आहे. तसेच अंधश्रद्धा, सामाजिक कुप्रथा दूर झाल्या आहेत.
सध्याच्या स्थितीला वनवासी कल्याण आश्रम तर्फे काही प्रकल्प चालतात त्यांची माहिती अशी: मणिपूर वसतिगृह : 3; विद्यार्थी 36, शिक्षण केंद्र ४४; लाभार्थी 633 

◾मेघालय शिक्षण केंद्र 124, लाभार्थी 5385. 
◾नागालँड वसतिगृह 4, विद्यार्थी 103, शिक्षण केंद्र 34; लाभार्थी 1422
◾आसाम वसतिगृह 6; विद्यार्थी 163
◾शिक्षण केंद्र 76; लाभार्थी 45
◾वैद्यकीय 124; लाभार्थी16265
◾आर्थिक विकास 211; लाभार्थी 1575 
◾दक्षिण आसाम वसतिगृह 5; विद्यार्थी 131; शिक्षण केंद्र 24 लाभार्थी 920 
◾क्रीडा केंद्र (क्रीडा) 16
◾श्रद्धा जागरण सत्संग 25 
◾सिक्कीम वसतिगृह1; विद्यार्थी 16
◾शिक्षण केंद्र 201; लाभार्थी 2988
◾वैद्यकीय 40; लाभार्थी: 1763 
◾त्रिपुरा वसतिगृह 8; विद्यार्थी: 245
◾शिक्षण केंद्र: 46 
◾अरुणाचल प्रदेश शिक्षण केंद्र 51; लाभार्थी: 2713
◾वैद्यकीय सेवा 142; लाभार्थी 29074
◾आर्थिक वाढ 3 लाभार्थी : 49

(अधिक माहिती पुढील भागात)

क्रमशः 1

@दिपक राठोड, छत्रपती संभाजीनगर 
मो .98900 79925

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या