@ बा.भो.शास्री
महानुभाव वैदिक की अवैदिक हा प्रा. पुरुषोत्तम नागपूरे व डॉ. कोलते यांच्यात फारवर्षापूर्वी झालेला वाद आहे. डॉ.रा. बो. मेश्राम कोलत्यांच्या बाजूने उतरले होते. त्यावरा पडदा पडला. आता नव्याने तो वाद डोकं वर काढताना दिसतो आहे. महानुभाव स्वतंत्र धर्म आहे, या दिशेने ती वाटचाल चालू आहे.
स्वामींनी वेदांचं अस्तित्व मानलं, वेद चैतन्य मायेपर्यंत पाहतात हेही मानलं. पण वेदाचं मानलं नाही. देवता मानल्या. त्या पंचप्रकारानेयुक्त असल्याचं संगितलं, त्या परमेश्वराच्या शक्ती आहेत असा स्वतः स्वामींनीच उल्लेख केलेला. पण हा पंथ देवताभक्ती करीत नाही. गीता व भागवतातला दशमस्कंद महानुभावांनी आधार मानून त्यावर सुंदर भाष्य केलं, काव्य लिहिलं, सर्वज्ञांनी कृष्णकथेचा काही भाग स्वतः सांगितला. श्रीकृष्णाच्या भोवतालचे धागे दोरे त्यांच वैदिकत्व बळकट करणारे आहे. राजसूय यज्ञाचे ते मार्गदर्शक होते. वेद त्रिगुणात्माक आहे. असंही गीतेत म्हटलं आहे.
क्षुद्रदेवतांची उपासना वारकरी पंथ, समरौथ संप्रदाय बसवेश्वर, आर्यसमाज नाकारतो ते अवैदिक होत नाही. उपनिषेदे हा वेदाचा अंतिम भाग समजल्या जातो, या ज्ञानकांडात दत्तात्रेयाचे दहा उपनिषदे आहेत, काय दत्तात्रेयाला अवैदिक समाजणं कसं शक्य आहे?
ते तर महानुभावांचे अद्य दैवत आहे. ते वैदिकच होते, एखाद्या गावात स्वामी जात तेव्हा येथे कुणी सामक आहे का ? असं विचारित व त्याला "पुरुषसूक्त "म्हणायला लावत. ते सूक्त वेदातीलच आहे. जो जाणतो तो वैदिक वेदात ज्ञानाच्या अनेक शाखा आहेत काहींनी जाणलं, पण मानलं नसेल तेही वैदिक आहेत. काहींना थोडं ग्राह्य होतं थोडं त्याज्यही होतं, पण वेद चैतन्य देवते पर्यंत पाहतात हे वेदशक्तीचं महानुभाव तत्वाने केलेलं कौतुकच आहे.
महानुभाव तत्वज्ञान परमेश्वर देवतेहून वेगळा मानतं, देवता सुख देतात परमेश्वर आनंद देतो असा महानुभावांचा सिद्धांत आहे. वेद त्रिगुणात्मक व परमेश्वर गुणातित असं त्यांचं मत आहे. म्हणून वैदिक कर्मकांड हे महानुभावांना मान्य नाही. याचा अर्थ वेदाचं काहीच मान्य नाही असं कधीच होत नाही.
"सत्यसनातन महात्मा धर्म की जय" असा जयघोष आमचे महानुभाव परंपरेने म्हणत आले, हिंदू शब्द जन्माला येण्या आधी महानुभावांचा हा जयकार आहे. महानुभव हे नाव १२ किंवा तेराव्या शतकातलं आहे. त्यांना सनातन म्हणता येणार नाही. म्हणून सनातन विचारधारेचा तो जयजयकार आहे. ईश्वराचं ज्ञान सृष्ट्यारंभी सांगितलं, तोच सनातन धर्म आहे. त्यांना वेगळा धर्मा कशाला हवा ?
असं वाटतं, तिथी वार नक्षेत्र स्वामी नाथोबाला विचारित असत ही तर, वैदिकांची देण आहे. अवैदिक म्हणायचाच असेल तर पहिलं शंकराचार्यांनाच म्हणावं लागेल कारण त्यांनी प्रथम कर्मकांड नाकारलं आहे. आईच्या अंत्ययात्रेत कर्मकांडी नाराज झाले त्यांनी पर्वा केली नाही. "ब्रह्म सत्यजगत्मिथ्य" आहे. हे बुद्धाच्या शून्यवादाशी बरच साम्य दिसतं. ते पक्के वैदिक होते.
भरवसवरुन महाराष्ट्रात येताना स्वामी "गोपाळनी आण" म्हणजे श्रीकृष्णाची शपथ घेत असत, महानुभाव अवैदिक आहेत म्हणण्यासाठी आम्हाला प्रथम श्रीकृष्णाला अवैदिक ठरवावं लागेल, अन ते केवळ अशक्य आहे. हे समजणं महत्वाचं आहे. राहिला प्रश्न हिंदुत्वाचा तो अनेकांना सामावून घेतो, अवतार माणणारे न माणणारे आस्तिक नास्तीकांना सगळे त्यात आहेत, महानुभाव हा "प्रतीती पंथ आहे" असा स्वामींनी उल्लेख केलेला आहे.
पूर्वी सनातन्यांनी छळलं हेच कारण असेल तर, सनातन्यांनी आपसात परस्परांना छळलं नाही का ? मुस्लिमात युद्ध होतात, तो धर्म किंवा जातीचा भाग नसून हा प्रवृत्ती दुष्प्रवृत्तीचा खेळ आहे. भलेही बापाचे मुलाचे टोकाचे मतभेद असतिल पण बाप तो बापच असतो, असं मला वाटतं.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या