"16 ऑगस्ट" भारतीयांनी हा दिवस कधीही विसरता कामा नये



16 ऑगस्ट हा दिवस सध्या तालिबान आणि अफगाणिस्तान संघर्षावरून बहुचर्चित ठरत आहे. अफगाणिस्तान मधील सत्तांतर लोकशाही मार्गाने नाही तर हिंसक व विद्रोहाच्या मार्गाने होत आहे. या संघर्षात अफगाणिस्तान मधील तालिबान विरोधक, अफगाणिस्तान समर्थक, शरियत चे विरोधक, अल्लाह ला न मानणारे (काफिर), शिय्या मुस्लिम व दहशतवादला विरोध करणाऱ्या असंख्य लोकांच्या कत्तली घडत असतील. नेहमी प्रमाणे मीडिया त्याचे वास्तव लगेच मांडणार नाही. भारतीयांनी या सत्ता संघर्षाच्या 16 ऑगस्टकडे  बघताना 1946 च्या 16 ऑगस्ट ला सुद्धा कधीच विसरता कामा नये. 



1946 चे वर्ष म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याजवळ जाणारा काळ होता. याच दरम्यान मुस्लिम लीगला मुसलमानांसाठी वेगळा देश हवा होता. अनेक उच्च स्तरीय प्रयत्न करूनही यश मिळत नसल्याचे पाहून मोहम्मद अली जिना यांनी डायरेक्ट एक्शन प्लॅन लागू करण्याचा निर्णय घेतला व देशभरातील मुस्लिम विद्रोह करून उठतील असे भाषणं करण्यात आली व हातात शस्त्र घेण्याचं मुस्लिमांना आवाहन करण्यात आले.



बंगालचा तत्कालीन पंतप्रधान हुसेन सोहरावर्दी हा लीगचा समर्थक होता. त्याने 16 ऑगस्ट हा दिवस डायरेक्ट एक्शन साठी निवडला. आणि कलकत्त्यापासून हिंदू नरसंहाराला सुरुवात झाली. ठरवून, पूर्वनियोजित कट रचून दंगली घडवल्या गेल्या व बंगाली हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. हा दिवस 'कलकत्ता किलिंग' म्हणून सुद्धा ओळखला जातो. 



त्या दिवशी बंगालच्या हिंदुबहुल भागात प्रेतांचे खच पडले होते. लोक घरदार सोडून पळून गेले. माता भगिनी बलात्कार आणि नृशंस अत्याचाराला बळी पडल्या. धर्मांतर सुद्धा झाली. मुसलमानांसाठी वेगळा देश हवा होता. राजी व्हा, नाहीतर असाच नंगानाच चालू राहणार... अशी धमकीचा जणू या कृत्यातून देण्यात आली होती. 



मुस्लिम लीगच्या सभेला मुसलमानांची प्रचंड गर्दी गोळा करण्यात आली होती. तत्कालीन कलकत्ता पोलिसांच्या माहिती अहवालानुसार 5 लाख लीग समर्थक सभेला जमले व शुक्रवारचा जुम्म्याच्या नमाज नंतर एकच हलकल्लोळ माजवला गेला. या हिंसाचारात 10 हजार लोक मृत पावल्याचे सांगितले जाते. परंतु हा आकडा वास्तवात खूप मोठा होता व यामध्ये सर्वाधिक हत्या बंगाली हिंदूंच्या करण्यात आल्या होत्या. कलकत्तानंतर बिहार, उडीसा मधील शहरांमध्ये हिंसा भडकली व नौखाली येथे झालेल्या हिंसाचारात 50 हजार हिंदूंचा नरसंहार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. प्रेतांचे इतके खच रस्त्यावर पडलेले होते की महिनाभर गिधाडं आणि कावळ्यांनी त्या प्रेतांचे लचके तोडले.



आज एकविसाव्या शतकात आपण अफगाणिस्तान आणि तालिबान संघर्षामुळे विचलित झालो आहोत. हा संघर्ष जगासाठी पहिला नाही. जिहादी कट्टरतावादी मानसिकतेमुळे आजवर अनेक देशांमध्ये असे संघर्ष झाले आहेत व निष्पाप लोक बळी पडले आहेत. भारत सुद्धा याला अपवाद नाही. इस्लामिक आक्रमकांनी भारतासोबत हेच केले आहे. फाळणीच्या वेळी झालेला हिंसाचार, काश्मिरी हिंदूंचा नरसंहार करून मिळवलेली सत्ता, कलकत्ता किलिंग, नौखाली नरसंहार व नुकताच झालेला बंगाल हिंसाचार या सगळ्यामागे एकच विचार आहे. "तो" कळला तर तालिबान-अफगाणिस्तान संघर्षाचं खरं कारण कळू शकेल. 


- कल्पेश जोशी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या