मराठ्यांना संपवण्यासाठी टिपू सुलतानाने भारताबाहेरील इस्लामी राजवटींशी केलेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यापैकी त्याने अफगाणिस्तानचा नवाब झमानशाह याला १७९७ साली पाठवलेलं पत्र उपलब्ध आहे.
हा झमानशाह म्हणजे १७६१ साली नजीबखान रोहिल्याच्या विनंतीवरून भारतावर चालून आला त्या अहमदशाह अब्दालीचा नातू होय....अहमदशाह अब्दालीशी लढतांना पानिपतावर एक लाख मराठ्यांना बलिदान द्यावे लागले.
झमानशहाला पाठवलेल्या पत्रात टिपू म्हणतो,
"दिल्लीच्या गादीवर सध्या मराठ्यांचे वर्चस्व आहे. कित्येक वर्षांपासून इस्लामी राज्य असलेल्या दिल्लीच्या तख्तावर काफीर (Infidel) लोकांचे राज्य असताना जगभरातील मुस्लिम राजांचे हे पवित्र कर्तव्य आहे की त्यांनी एकत्र येऊन दिल्ली मराठ्यांकडून ताब्यात घ्यावी.”
पुढे तो म्हणतो, “दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर झमानशाहने दक्षिणेत उतरावे. दक्षिणेत मी स्वतः जिहाद ची योजना करत असून आपण एकत्र येत काफीर मराठ्यांचे पारिपत्य करू आणि इस्लामच्या तलवारीसमोर त्यांना गुडघे घासायला भाग पाडू.”
आणि दुर्देव असे की याच टिपु सुलतानाचा फोटो छत्रपती शिवरायांच्या फोटोशेजारी ठेवून त्याची जयंती आमचेच लोक साजरे करत आहेत.
संदर्भ - Tipu As He Really Was , Page No - 70
लेखक - श्री.गजानन भास्कर मेहेंदळे
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
#swaraj75
#टिपू_सुलतान
#जिहादी_टिपू_सुलतान
#भारतविरोधी_टिपू_सुलतान
#हिंदूविरोधी_टिपू_सुलतान
0 टिप्पण्या