सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे 20 जून रोजी हृदयद्रावक घटना घडली. भोंदू तांत्रिक मोहम्मद अब्बास, या तांत्रिकने गुप्त धनसाठी खेळलेला जीवघेणा खेळ उघड झाला! काही दिवसांपूर्वी ही घटना सामूहिक आत्महत्या होती, असे दिसून आले होते, पण ही आत्महत्या नसून सामूहिक हत्या आहे, हे पोलीस चौकशीतून उघड झाले.
भोंदू तांत्रिक अब्बासने डॉ. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांना गुप्तधन शोधण्यासाठी फसवले होते. कोट्यवधींचे गुप्तधन मिळून देतो हे सांगून त्याने दोन्ही भावांकडून लाखो रुपये उकळले होते. तांत्रिकाला पैसे परत करायचे नव्हते म्हणून त्याने वनमोरे बंधूंचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा कट रचून, भयानक घटना घडवली. यात नऊ जणांचा जीव जीव गेला.
वनमोर कुटुंब हे एक उच्च शिक्षित कुटुंब होते त्यांनी भोंदू तांत्रिकच्या जाळ्यात अडकून आपले जीवन उद्ध्वस्त केले. भोंदू तांत्रिक मोहम्मद अब्बास याने ड्रायव्हरच्या मदतीने वनमोरे कुटुंबातील 9 जणांची हत्या केली. चहामध्ये काही विषारी पदार्थ मिसळल्याचा पोलिसांचा दावा आहे. ते प्यायल्यानंतर वनमोरे कुटुंबातील सदस्य बेशुद्ध होऊन त्यांचा मृत्यू झाला.
सांगलीतील म्हैसाळ येथील भयंकर घटनेच्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे. स्वतःला विज्ञाननिष्ठ पुरोगामी म्हणून घेणारे, अंधश्रद्धा निर्मूलन करतो म्हणून ढोल वाजवणारे अंनिसवाले, तथा स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून घेणारी ही सल्लेबहाद्दर मंडळी, भोंदू मोहम्मद अब्बासच्या भोंदूगिरीवर मूग गिळून गप्प बसली आहे. ही मंडळी कुठेही या भयंकर व हृदयद्रावक घटना विरोधात आवाज उठवताना दिसत नाही हे महाराष्ट्रासाठी आश्चर्यकारक आहे.
समाजसुधारकांच्या नावाने आपल्या दुकान चालवणाऱ्या सल्लेबहाद्दर तथाकथित विज्ञाननिष्ठ मंडळींची महाराष्ट्रात कमी नाही. परंतु हीच सल्लेबहाद्दर मंडळी आरोपींची जात-धर्म पाहून निषेध व प्रबोधन करत असते. एक बाब प्रकर्षाने जाणवते जेव्हा आरोपी एका विशिष्ट वर्गाचा असतो, तेव्हा तथाकथित पुरोगामी व अंनिस सारख्या संघटना पद्धतशीरपणे गप्प बसतात. असे का?
अंधश्रद्धाचा बुरखा फाडणे काळाची गरज आहे, त्यादिशेने पावले उचलणे गरजेचं आहे, परंतु अंधश्रद्धा दूर करतो, अंधश्रद्धा निर्मूलन करतो म्हणून चालणाऱ्या संघटना, किंवा तथाकथित पुरोगामी मंडळी फक्त दिखावा करण्यासाठी आहेत का? ह्या संघटना किंवा ही मंडळी फक्त दोन समुदायमध्ये पक्षपात करण्यासाठी आहे का? हा मोठा प्रश्न आहे.
अंनिस किंवा तथाकथित पुरोगाम्यांच्या पक्षपातीच्या विचारसरणीला बळी न पडता आपण सर्वांनी समाजातील जागरूक नागरिक म्हणून कोणत्याही जाती-धर्माच्या भोंदूबाबाविरुद्ध उभे राहिले पाहिजे. जिथं अनुचित प्रकार घडत असेल तिथे कायदेशीर कारवाई केली पाहिजे. सांगली जिल्ह्यातील ही घटना महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. त्यामागील सर्व धागेदोरे शोधून षडयंत्र उघडकीस आले पाहिजे.
------------
0 टिप्पण्या