वाढती लोकसंख्या हे भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. लोकसंख्या वाढीमुळे मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्ती ही एक मोठी समस्या झाली आहे. पण त्याच बरोबर भारताची लोकशाही, भारताची जीवनमूल्ये वाचवायची असेल तर लोकसंख्या नियंत्रण धोरण बनवणे तेवढेच आवश्यक आहे . भारताचा विचार "एकम सत विप्रा बहुधा वदन्ति" असा राहिला आहे. विविधतेमध्ये एकता ही भारताची परंपरा आहे. परंतु मुस्लीम लोकसंख्या जी पूर्वी 9.8 टक्के होती, ती 1951 ते 2011 दरम्यान वाढून 14.23 टक्के (सरकारी आकडेवारीनुसार) झाली आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदूंची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आश्चर्य वाटेल पण, सध्या 9 राज्यात हिंदूं अल्पसंख्याक झाले आहेत. भारतातून हिंदू समाज चहूबाजूने कमी होत आहे, आणि अन्य धर्मीय लोकसंख्या वाढत आहे. भारताच्या सांस्कृतिकदृष्ट्या ही चिंतेची बाब झाली आहे.
ज्या भागात हिंदूंची संख्या कमी झाली तिथून भारत खंडित झाला हा इतिहास आहे. भारताची फाळणी होण्यामागे आणि फाळणीनंतर हिंदू आणि शिखांची जी कत्तल झाली त्यामागे लोकसंख्या हा फॅक्टर होताच. भारत एक वेळा नव्हे तर अनेक वेळा खंडित झाला त्यामागील कारणे कोणती यावर कारणमीमांसा झाली पाहिजे.
पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशिया या देशांची उदाहरणे पाहू. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. तिथल्या हिंदूंक्या हत्या करणे, महिलांचे शोषण करणे, प्रार्थना स्थळे नष्ट करणे, हे सर्व कृत्य लोकसंख्या वाढवून, तेथील जिहादी वृत्तीने केले. इंडोनेशिया वगळता तिन्ही देशातील लोक त्यांच्या पूर्वजांचे संस्कार आणि सांस्कृतिक मूल्ये विसरले. इंडोनेशियातील लोकांचे धर्मांतर झाले, पण इंडोनेशियाने त्यांच्या पूर्वजांचे विचार जपले, त्यांची सांस्कृतिक मूल्ये जपली. भारतातही पाकिस्तान व बांगलादेश प्रमाणे कट्टरता वाढीस लागली आहे. नुकत्याच उदयपूर, v अमरावती येथील हिंदू व्यक्तीची झालेली हत्या ही धोक्याची घंटा आहे.
अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश असेल. 2010 ते 2050 दरम्यान जगातील मुस्लिम लोकसंख्या 73% वाढेल. त्याच वेळी, या काळात ख्रिश्चनांची लोकसंख्या 35% वाढेल, जो दुसरा सर्वात वेगाने वाढेल. हिंदू 34% पर्यंत वाढतील आणि ते जगातील तिसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले लोक बनतील. सध्या जगात मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत भारत इंडोनेशियानंतर दुसऱ्या क्रमांकावर असेल.
भारतासारख्या लोकशाही देशामध्ये एक अतिशय गंभीर मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे, जिथे मुस्लीम समुदायाची लोकसंख्या वाढली आहे तिथून त्यांनी संविधानाऐवजी शरिया कायद्याची मागणी वारंवार केली आहे. फार इतिहासात जाण्याची गरज नाही, फक्त गेल्या काही महिन्यांतील घटनांवर नजर टाका, देशात किती देशविघातक कृत्य झाले, किती चिथावणीखोर भाषणे झाले हे समजून येईल, लोकसंख्या वाढून हा पायदंडा रचला जात आहे, यात शंका नाही!
◆ नुपूर शर्मा प्रकरणात महिनाभरापूर्वी शुक्रवारच्या नमाजानंतर देशभरात अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली होती. संपूर्ण देशात अराजकता माजवण्यात आली. देशभरात मोर्चे काडून अशांतता पसरवण्यात आली.
◆ काँग्रेसचे आमदार हाजी फुरकान यांनी देवभूमीतील पिरान कलियर दर्गा हा पाचवा धाम बनवायची मागणी केली. कालियर परिसरात बेकायदेशीरपणे राहणारे बांगलादेशी नागरिकही पकडले गेले आहेत.
◆ झारखंडच्या जामताड़ा जिल्ह्यात स्थानिक मुस्लिम लोकांनी सरकारी नियम मोडून मनमानी करण्याचे प्रयत्न केले. परिसरातील शेकडो शाळांमध्ये सरकारी नियमानुसार रविवारची साप्ताहिक सुट्टी नाकारून शुक्रवारी (जुमा) सुट्टी देण्यात आली. शाळांची नावे उर्दुत लिहण्यात आले. आमची लोकसंख्या अधिक असल्यामुळे इथे नियम आमचेच असतील असं त्यांनी खुलेआम जाहीर केलंय.
◆ झारखंडमधील गढवा येथील स्थानिक मुस्लिम म्हणाले, आता आम्ही आमच्या लोकसंख्येचा 75 टक्के आहोत, आम्ही शाळेचे नियम ठरवू. तिथे मुस्लिम समाजाच्या दबावामुळे शाळेतील प्रार्थना बदलण्यात आली. मुलांना प्रार्थनेदरम्यान हात जोडण्यास देखील मनाई केली.
भारताची फाळणी झाली ती धार्मिक लोकसंख्या विचारात घेऊन. प्रचंड नरसंहार झाला होता. आपण फाळणीचा हा इतिहास जरी लक्षात ठेवला तरी आपल्याला भविष्यातील धोका लक्षात येऊ शकतो. फाळणीच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही भारतात आहे, ती लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी, भारतीय जीवन मूल्ये टिकवण्यासाठी, सुखी मानवी जीवनासाठी, पर्यावरणचे समतोल राखण्यासाठी, वाढत्या लोकसंख्या वर नियंत्रण गरजेचं आहे. त्यादिशेने कठोर पावले उचलणे गरजेचं झाले आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्या धोरणातील बदल सर्वांना समान रीतीने लागू करण्याची आवश्यकता आहे.
- दिपक राठोड, संभाजीनगर
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
#worldpopulationday
#PopulationControlLaw
#worldpopulationday2022
#लोकसंख्या_नियंत्रण
0 टिप्पण्या