रामानंद सागर जेव्हा ‘रामायण’ मालिकेसाठी निधी मागत होते, तेव्हा त्यांची खिल्ली उडवत होते लोक पण...

आजही रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेली रामायण हि मालिका म्हणजे भारतीयांसाठी श्रद्धेच विषय आहे. टी. व्ही. वर दिसणारे राम, लक्ष्मण आणि सीता यांच्यावर आजही पुष्पवृष्टी केली जाते. मात्र रामानंद सागर यांना रामायण या मालिकेची कल्पना कशी सुचली, यासाठी एक घटना कारणीभूत आहे. 

१९८० च्या दशकात बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे बनत होते,  मात्र त्याच वेळी इंडस्ट्रीमध्ये खंडणी गोळा करण्याचे प्रकारही समोर येत होते. याचा फटका संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला बसला. दाऊद इब्राहिमच्या अंडरवर्ल्ड माफिया गॅंगने त्या काळात जवळपास सगळ्याच दिग्दर्शकांना वेठिस धरलं होतं. त्यामुळे नवीन दिग्दर्शकांना त्या काळात नवीन चित्रपट तयार करणं कठीण बनत चाललं होतं. 
रामानंद सागर हे देखील त्याच फळीतील दिग्दर्शक होते. त्यामुळे त्यांचं चित्रपट सृष्टीतलं अस्तित्व धोक्यात येऊ लागलं. आता काहीतरी पर्याय शोधण गरजेचं होतं. त्याच काळात १९७६ साली स्विझर्लंडमध्ये चरस या चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. त्यासाठी रामानंद सागर त्यांच्या कुटुंबासोबत तिथे गेले होते. शूटिंगनंतर ते एका कॅफेत बसले होते, ऑर्डर दिल्यानंतर तिथल्या वेटरने रिमोटने  टी. व्ही. चालू केला अन त्यावर रंगीत चित्रपट दिसू लागला. त्याकाळात चित्रपट टी. व्ही. वर दिसत नव्हता,  म्हणून त्यांना ती मोठी गोष्ट वाटाली. यावरून त्यांनी ठरवलं, कि आता आपण टेलिव्हिजन इंडस्ट्रीत जायचं अन रामायण, महाभारताच्या गोष्टी मांडायच्या. 
आता रामायण महाभारतच का ? तर स्वतः रामानंद सागर यांनी संस्कृत विषयात गोल्ड मेडल मिळवलं होतं, शिवाय त्यांनी भारतातील पौराणिक ग्रंथांचा अभ्यास केला होता. या प्रकारच्या गोष्टींवर भारतीय लोकांची श्रद्धा होती, म्हणून त्यांनी सर्वात आधी रामायणावर सिरीयल करायचं ठरवलं. 
त्यांनी हे सगळं ठरवलं पण या सर्व बाबी सत्यात उतरवणं म्हणजे एकप्रकारे तारेवरची कसरत होती. खुप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची होती, त्यासाठी आर्थिक पाठबळ गरजेचं होत, म्हणून रामानंद सागर यांनी मित्रांकडे आर्थिक मदत मागितली. तेव्हा बऱ्याच लोकांनी त्यांची खिल्ली उडवली. पण तरीही रामानंद सागर यांनी रामायण मालिका करायचीच, असं ठरवलं. 
तब्बल तब्ब्ल ५५० दिवस याचं शूटिंग चाललं होतं. हि मालिका प्रसारित करण्याची वेळ आली, तेव्हा पण याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. दूरदर्शनचे अधिकारी आणि सरकार यांमध्ये मतभेद होऊ लागले. कोणतीही धार्मिक मालिका दाखवण्यास सरकारचा विरोध होता. पण नंतर राजीव गांधींच्या मध्यस्तीने मार्ग काढण्यात आला व परवानगी मिळवली. आणि बघता या मालिकेने वेगवेगळे विक्रम केले. आजही रामनंद सागर यांच रामायण हा भारतीयांच्या भावनेचा विषय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या