मणिपूर हिंसाचार आणि ‘चर्च’ कनेक्शन


मणिपुर हिंसाचार का होतोय? कोण घडवतय? ह्या बाबींचा विचार न करता अनेक संभ्रम निर्माण केले जात आहे. नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. मुळात ख्रिश्चन मिशनरींना व ड्रग्ज माफियांना वाचवण्यासाठी हे संभ्रम निर्माण केले जात आहे का, असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही. कारण मणिपूरची राखरांगोळी करण्याचा विडाच मिशनरी जमातीने उचलला आहे. मणिपूर मधील मागील किमान 70 वर्षात काय बदल झाले याचा विचार करणे आवश्यक आहे.

मणिपूर मध्ये 1961 साली 19.49 टक्के असणारे ख्रिश्चन आता 41.29 टक्के झाले आहेत तर 1961 मधील 61.68 टक्के हिंदू आज 41.39 टक्के झाले आहेत. म्हणजे ख्रिश्चनांची संख्या वाढत आहे तर हिंदूंची संख्या कमी होत आहे.  त्यामुळे आता गंभीर परिस्थिती झाली आहे. मणिपूर मध्ये कुकी नावाची एक  जमात आहे जी धर्मांतरित ख्रिश्चन आहे. मणिपूर मध्ये एकेकाळी फक्त 11 कुकी गावे होती, परंतु आज 50 हून अधिक आहेत. यांचा खरा डाव मणिपूरला कुकी लँड बनवण्याचा आहे. त्यासाठी चीन पुरस्कृत आतंकवादी संघटना अनेक वर्षापासून सक्रिय आहेत. अर्थात भारताचे तुकडे करण्याचा त्यांचा उद्देश आहे. धर्म बदलतो आणि काय परिणाम होतो तो आज आपण बघत आहोत.


मैतेयी कोण?

यात मैतेई जनजाति आहे ती, ही जनजाती मूळ हिंदू आहे. मैतेई हे मणिपूरचे मूळ रहिवासी आहेत, जे खोऱ्याच्या परिसरात राहतात. त्यांची भाषा मेइतिलोन आहे, जी मणिपुरी भाषा म्हणूनही ओळखली जाते. मैतेई नैसर्गिक वैष्णव जीवन जगतात. मागील काही वर्षांपासून पैशाच्या जोरावर चर्चने मैतेई लोकांनाही फसवायला सुरुवात केली आहे, त्यांना आमिष दाखवून ख्रिश्चन बनवले जात आहे.


‘मैतेयी’ विरुद्ध ‘कुकी’ भांडण कोण लावतय?

लोकसंख्या आणि जमिनीतील असमतोलामुळे, मैतेयी समुदायाने जनजातीचा दर्जा देण्याची मागणी केली, जी उच्च न्यायालयाने मान्य केली. याच्या निषेधार्थ कुकी गटाने हिंसाचाराचा अवलंब केला, ज्यामुळे हिंसाचार झाला. सध्या, हिंसा मुख्यतः कुकी आणि मेतेई समुदायांमध्ये सुरू आहे. भारतातील ख्रिश्चन मिशनर्‍यांनी असा अपप्रचार सुरू केला आहे की मैतेई आधीच साधनसंपन्न आहेत , आणि जर त्यांना जनजातीचा दर्जा मिळाल्यास ते जमीन, सरकारी नोकऱ्या आणि इतर सुविधाही बळकावतील, त्यामुळे कुकी अति आक्रमक झाले आहेत. थोडक्यात काय ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मैतेयी विरुद्ध कुकी असा संघर्ष पेटवला आणि देशभरात आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी असे वातावरण निर्माण केले जात आहे.


जनजाती संरक्षित जमिनीवर ख्रिश्चनांचा कब्जा

मणिपूर मधील कलम ‘३७१ सी’ चा ख्रिश्चन मिशनर्‍यांनी गैरफायदा घेतला आहे. मणिपूरच्या आदिवासी संरक्षित भागात बिगर आदिवासी जमीन खरेदी करू शकत नाहीत, पण ख्रिश्चन संघटनांनी(धर्मांतरित) या भागात मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित केली आहे. जंगल संरक्षित, डोंगराळ भागातही, जिथे खाजगी मालमत्तांना सक्त मनाई आहे, अश्या ठिकाणी मिशनऱ्यांनी कब्जा केला आहे. इथे अर्ध्या रात्रीत बांबूचे चर्च उभे केले जातात. कृत्रिम गावे वसवली जातात अश्या परिस्थितीत विद्यमान सरकारने अशी अनेक रूपांतरित कृत्रिम गावे हटवली. हिंसेचे हे प्रमुख मुख्य कारण आहे, मिशनरी टोळीला जागेचे भूक लागली आहे आणि ते जमिनीसाठी आग लावत आहेत.


अंमली पदार्थ आणि दहशतवादी गटांचे संबंध

मणिपूरच्या सरकारने अंमली पदार्थ विरोधात मोहिम सुरू केली आहे. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात 4305 एकरमध्ये अवैध अफूची शेती नष्ट केली आहे. 136.93 कोटी रुपयांची ड्रग्ज जप्त केली आहे. यात कुकी सारख्या समुदायांनी अफूची लागवड केली आहे. अंमली पदार्थांचा व्यापार मणिपूरपासून म्यानमार, लाओस आणि कंबोडियापर्यंत पसरलेला आहे.  यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून या अतिरेकी संघटनांनी शस्त्रे खरेदी केली. कुकी नॅशनल आर्मी आणि जोमी रिव्होल्युशनरी आर्मी यांसारख्या संघटना यात प्रामुख्याने सक्रिय आहेत. तसेच म्यानमारच्या आतंकवादी कुकी संघटना सक्रिय आहेत. अफूच्या लागवडीवर बंदी घालण्याबरोबरच अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. देशाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी  उचललेले स्तुत्य पाऊल, मणिपूरच्या सरकारने उचलले त्याचा भयंकर राग काडण्यासाठी कुकी समुदाय हिंसक झाला आहे, हा ही हिंसाचार मागील प्रमुख कारण आहे.


ख्रिश्चन का भडकले?

जर मैतेई समुदाय डोंगराळ भागात स्थायिक झाले तर ख्रिश्चनांचे अवैध धंदे बंद होतील, अफूची शेती बंद होईल, शस्त्रे खरेदी करता येणार नाही ह्या सर्व गोष्टी ख्रिश्चन मिशनरींच्या काळजात धडकी भरवणारे निर्णय आहे.  यामुळे ख्रिश्चन मिशनरी चवताळून उठले आहे, आणि मणिपूर मध्ये हिंसा भडकवत आहे. मिशनर्यांचे हे मनसुबे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठे आव्हान आहे.


डाव्या लिब्रांडूचा मदतीचा हात?

अश्या अनेक पार्श्वभूमी असल्यामुळे मे महिन्यापासून मणिपूर पेटले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय सुरक्षा बले तैनात केली आहे. तिथल्या उग्रवादी संघटनांचे राष्ट्रविरोधी मनसुबे उधळून लावले जात आहे. एक हजार पेक्षा अधिक अत्याधुनिक हत्यारे पोलिसांनी या आतंकवादी गटांकडून हस्तगत केली आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी मे महिन्यातच दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी, कुकी उग्रवादी संघटना आणि आतंकवादी संघटना यांचे धाबे दणाणले आहेत. दोन महिन्यापासून मणिपूर चे इंटरनेट बंद आहे. साहजिकच भारतातील डाव्या, लिबरल गँग मणिपूर मधील उग्रवाद्यांच्या मदतीला उतरत आहेत. नागरिकांची दिशाभूल करून सरकारच्या कारवाईत खोडा घालण्याचा उद्योग त्यांनी केला आहे.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या