छत्रपती संभाजीनगर |
राष्ट्रीय विचारांच्या पुस्तकांचा समाजात जास्तीत जास्त प्रसार व्हावा, सकारात्मक विचारांची पेरणी व्हावी, या सदहेतूने कार्य करणाऱ्या भारतीय विचार साधना फाउंडेशनचे विचार रथ यात्रा रथाचे आज शुक्रवारी दिनांक २१ जुलै रोजी सकाळी दहा वाजता शहरात जोरदार आगमन झाले. परिणामी चोखंदळ वाचकांना राष्ट्रीय विचारांची मेजवानी मिळणार आहे.
पुणे येथील भारतीय विचार साधना फाउंडेशन साहित्य क्षेत्रात कार्य करणारे अग्रगण्य फाउंडेशन आहे. सशक्त भारत व समाज उभारणीसाठी समाजात राष्ट्रीय विचारांची पेरणी करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने फाउंडेशन समाजात राष्ट्रीय विचार घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी 'संस्कारक्षम साहित्य आपल्या दारी' या संकल्पनेतून विचार यात्रा रथ तयार केला असून त्यात राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, कर्तुत्ववान महिला, इतिहास, महापुरुष चरित्रे अशा विविध विषयांची पुस्तके उपलब्ध असणार आहे. या दुर्मिळ पुस्तकांचा वाचकांनी लाभ घेण्याचे आव्हान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
*"संस्कारक्षम साहित्य आपल्या दारी"*.
पुणे येथील भारतीय विचार साधना फाउंडेशने राष्ट्रीय विचारात घराघरात पोहचविण्यासाठी विचारयात्रा रथाची (पुस्तक विक्री गाडी) निर्माण केली आहे. या रथामध्ये १५० पेक्षा अधिक पुस्तके प्रक्षेप प्रदर्शित असतील. हा रथ शुक्रवार ते बुधवार अशे एकूण सहा दिवस शहरात असणार आहे.
शुक्रवारी या रथाला सकाळी टीव्ही सेंटर पासून सुरवात होईल व अश्या एकूण शहर भरात १२ वेगवेगळ्या स्थानावर हा रथ जाईल. ज्यात बजरंग चौक, शिवाजी नगर, कांचंनवाडी, गजानन महाराज चौक, दर्गा चौक, काळा गणपती मंदिर, चिकलठाणा, वाळूज महानगर, एम पी लॉ कॉलेज रोड व शेवटी क्रांती चौकात सहाव्या दिवशी रथाची सांगता होईल.
(अधिक माहितीसाठी श्री अमित जालनावाला (९३७३३६८२८१) यांना संपर्क करावा.)
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
राष्ट्रीय विचारांची सत्य, स्पष्ट व योग्य माहिती मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा whatsapp group
0 टिप्पण्या