सविनय कायदेभंग चळवळ: जंगल सत्याग्रहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग



सविनय कायदेभंग म्हणजचे मिठाच्या सत्याग्रहाचे रूप  जंगल सत्याग्रह होते. हे दोन आंदोलन वेगळ्या पद्धतीने झाले असले तरी एकमेकांना पूरक होते. हे समजून घेणे महत्वाचे ठरेल.
 
सविनय कायदेभंग:
"काँग्रेस कार्यकारिणीने 14 ते 15 फेब्रुवारी 1929 रोजी झालेल्या बैठकीत गांधींना सविनय कायदेभंग चळवळीचा आदेश दिला. गांधीजी आणि त्यांच्यासह 79 सत्याग्रहींनी 6 एप्रिल 1930 रोजी 241 मैलांचे अंतर कापत दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावर कूच केले.  मिठाच्या कायद्याची अवज्ञा करून चिमूटभर मीठ उचलले. या आंदोलनाने सर्व देशवासियांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर देशभरातील लोकांनी समुद्राच्या पाण्यातून कढईत मीठ तयार करण्यास सुरुवात केली. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल देशभरात साठ हजार लोकांना अटक करण्यात आली. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत संघाच्या अनेक प्रमुख स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. 
जंगल सत्याग्रह
मिठाच्या सत्याग्रह मध्यप्रांत आणि बरार मध्ये वेगळ्या पद्धतीने झाला होता. मध्य प्रांतांचे मराठी आणि हिंदी भाषिक असे दोन भाग होते.  मराठी भाषिक भागामध्ये नागपूर, वर्धा, चांदा (सध्याचे चंद्रपूर) आणि भंडारा जिल्ह्यांचा समाव हिंदी भाषिक भागामध्ये नर्मदा (निमाड, हुशंगाबाद, नरसिंगपूर, बैतूल आणि छिंदवाडा जिल्हे), जबलपूर (जबलपूर, सागर, दमोह, सिवनी आणि मंडला जिल्हे) आणि छत्तीसगड (रायपूर, बिलासपूर आणि दुर्ग जिल्हे) यांचा समावेश होता.  अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा जिल्हे बेरारमध्ये होते.  बेरारच्या दहीहंडा (अकोला) च्या पाण्यातून आणि तिथून पाच किमी अंतरावर असलेल्या भामोद (अमरावती) च्या खाऱ्या पाण्याच्या विहिरींतून 13 एप्रिल 1930 रोजी प्रथम मीठ तयार करून बेरारमध्ये 13 मे पर्यंत मीठाचा सत्याग्रह चालू होता.
 तत्कालीन वन कायदा बरारच्या जनतेसाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी घातक होता, इंधनसाठी लाकूड कापणे, चारा वर प्रतिबंध टाकण्यात आला, पशुधनावरही वन कायदा मोडल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांची उपेक्षा होत होती. श्रीहरी उपाख्य बापूजी अणे यांच्या नेतृत्वाखाली  जंगलात लढा सुरू केला. प्रतिबंध मोडण्याचा निर्णय घेतला. विनापरवानगी जंगलातील गवत तोडणे हा त्याचा मुख्य उद्देश होता.यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसर आणि सुरुवातीसाठी 10 जुलै 1930 निश्चित करण्यात आली होती.

आप्पाजींनी फेब्रुवारी 1930 मध्ये डॉ. हेडगेवार यांना पत्र लिहून जंगल सत्याग्रहात विचारपूर्वक सहभागी होण्याच्या त्यांच्या निर्णयाची माहिती दिली.  त्याला उत्तर देताना डॉ.हेडगेवार म्हणाले की, संघाचा प्रशिक्षण वर्ग संपल्यानंतर याबाबत नक्की विचार केला जाईल. वर्ग संपल्यावर आप्पाजींनी पुन्हा विचारले.  आप्पाजींच्या प्रकृतीमुळे डॉ.हेडगेवार यांनी घाईघाईने मान्यता द्यायचे टाळले होते.  मात्र, अप्पाजींनी पुन्हा पत्र लिहिल्यावर डॉक्टरजींनी त्याला होकार दिला.  दोघांनी मिळून सत्याग्रह करण्याचा विचार केला.

जंगल सत्याग्रह मध्ये सहभागी होण्यापूर्वी डॉ हेडगेवार यांनी सरसंघचालक पदाचा त्याग केला. काही काळासाठी डॉ परांजपे यांना सरसंघचालक बनवले. जंगल सत्याग्रहसाठी डॉ हेडगेवार यांच्या टोळीत 12 सत्याग्रही होते. डॉ हेडगेवार यांच्या नेतृत्वात ही टोळी 14 जुलै 1930 मध्ये पुसद कडे निघाली. 21 जुलै 1930 ला यवतमाळ मध्ये जंगल कायदा तोडल्या प्रकरणी डॉ हेडगेवार आणि त्यांच्या सोबतच्या 11 सत्याग्रहिंना बंदी बनवण्यात आले.

'केसरी'ने 26 जुलै 1930 च्या अंकात या घटनेचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे,
 "21 तारखेला यवतमाळमध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. डॉ. मुंजे यांच्या तुकडीत सामील होण्याच्या तयारीत नागपूरहून आलेले डॉ. हेडगेवार, ढवळे,  बारा जणांच्या स्वतंत्र पथकाने पहिल्याच दिवशी कायदा मोडून काढला. पुसदपेक्षा हे गाव मोठे असल्याने दहा ते बारा हजारांची गर्दी येथे जमली. हे ठिकाण पुसदपासून 4 मैल 2 फर्लांग अंतरावर आहे. आजूबाजूला डोंगर आणि सर्वत्र हिरवळ यामुळे 'शस्य श्यामला ' या भूमीचे निसर्गसौंदर्य मनमोहक होते. पाच वर्षांच्या लहान मुलांपासून ते 70 ते 75 वर्षांच्या स्त्री-पुरुषांपर्यंत आणि अनेक महिला त्यांच्या खांद्यावर लहान मुलांसह या पवित्र ठिकाणी चालत आल्या. डॉ. हेडगेवार यांनी त्यांच्या अकराव्या तुकडीने कायदा मोडला तेव्हा महात्मा गांधींचा जयजयकार,  स्वातंत्र्य देवीचा जयजयकार,  इत्यादि गर्जनांनी सारे जंगल हादरले.
 "केसरी" ने पुढे लिहिले की, "कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वीरांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर तुरुंगाच्या खोलीत खटला चालवण्यात आला. कलम 117 आणि कलम 279 नुसार डॉ. हेडगेवार यांना अनुक्रमे सहा आणि तीन महिने शिक्षा झाली. महिना म्हणजे एकूण नऊ महिन्याचा सश्रम कारावास. तर अकरा त्याग्रहींना कलम 379 अन्वये प्रत्येकी चार महिने सश्रम कारावासाची शिक्षा झाली. या सर्वांना तात्काळ अकोला कारागृहात नेण्यात आले. अश्या प्रकारे संघ संस्थापक असलेल्या डॉ. हेडगेवार यांनीही स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. 

- दीपक राठोड, छत्रपती संभाजीनगर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या