असत्याची चिरफाड: ‘मुघल’ आणि ‘रक्षाबंधना’चा संबंधच काय?

“रक्षाबंधन मुघलांनी सुरु केलं…”
“वारकरी संप्रदायाच्या मुळाशी असलेली भक्ती चळवळ मुघलांमुळे विकसित झाली..”

नाही. असल्या बातम्या/ लेख ‘प्रतिष्ठित’ मिडियातून येडचॅपपणाने येत नाहीत. त्या मुद्दाम प्लांट केल्या जातात. एका प्रचारतंत्राचा- विमर्षाचा- नॅरेटिव्हचा भाग म्हणून सतत या गोष्टी अशा टाकल्या जातात. 
तुमच्या परंपरा, सण, धार्मिकता यांच्याबद्दल तुमच्या मनात गोंधळ उडाला पाहीजे. तुम्ही त्यांचा तिरस्कार करत त्यांपासून मनातूनच दूर जायला हवं. 
असं झालं की मग कशावरच विश्वास नसलेल्या पिढ्या तयार होतात. त्यांच्या सामाजिक जाणीवा व सामाजिक बदलांच्या कल्पना पर्व्हर्टेड किंवा विकृत असतात. वोकिजम हे त्याचे सध्याचे उदाहरण. 
याची सुरुवात कम्युनिस्टांनी ठरवून कशी व कुठे केली? त्याविषयी परत कधी तरी. 

इतिहास, शालेय अभ्यासक्रम, बॅालीवूड, विद्यापीठीय संशोधन सगळीकडे गेल्या चार पाच दशकांत हे असलं जाणीवपूर्वक पसरवलेलं आहे. याला प्रत्युत्तर का देत नाहीत मग? 
तर त्याची दोन कारणं- 
१. खोटं लिहायला दोन दिवस लागतात. खोटं पुराव्यानिशी उघडं पाडायला दोन वर्षे. 
२. सत्य पायात चपला अडकवून बाहेर पडेपर्यंत असत्य अर्ध्या जगाची प्रदक्षिणा करून आलेलं असतं!

आपण काय करायला हवं?
- मिडियानं सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीवर त्वरीत विश्वास न ठेवणं. पडताळणी करून विश्वास ठेवणं. 
- आपला इतिहास आणि समाजाची मूल्यं (त्याला धर्म म्हणतात) यांची मुलभूत तरी माहिती ठेवणं!

बाय द वे,
मुघल भारतात येण्याच्या शेकडो वर्षे आधीपासून भक्तीमार्गात विविध जातींत जन्मलेले संत आहेत. त्यांचे ब्राह्मण गुरु होते (रामानंदांचे विविध जातीतील शिष्य) किंवा उलटही होतं (संतशिरोमणी रोहिदास महाराज ब्राह्मण जातीत जन्मलेल्या राजाचे आणि क्षत्रीय म्हणून जन्मलेल्या राणी मीराबाईंचे गुरू होते). 
रक्षाबंधनाचे कितीतरी संदर्भ मुघलपूर्व काळातील आहेत. लिखीत वाड्.मयात आहेत)
त्यामुळे असल्या बुलशीटवर कधीही विश्व्स ठेवायचा नाही.. कितीही प्रतिष्ठित मिडियात प्रसारित झालेलं असलं तरी. कारण ते विकृत हेतूनं प्रसारीत केलेलं असतं!

@प्रसन्न पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या