दाजींनी शिकवलेली अविचल संघनिष्ठा ठेऊन मार्गक्रमण करणे, हीच खरी श्रद्धांजली..

{स्व. मधुकर (दाजी) जाधव यांच्या विषयी आपल्या स्वतःच्या काही आठवणी असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त कराव्यात...}
--------------------------------------------------------

@हरीश कुलकर्णी

     आपण काहीतरी गमावल्याची तीव्र भावना निर्माण झाली. आणि जे गमावलं ते परत मिळवण्यास आपण हतबल आहोत ही आपली दुर्बलता पण लक्षात आली. दाजी गेले. मधूकर श्रीरंग जाधव, देवगिरी प्रांताचे मा. प्रांत संघचालक, पण सर्वांचे दाजी. 

     कधीकाळी घरात घेतलं जाणार नाव कित्येक वर्षांपासून संघच ज्यांनी आपल कुटुंब मानलं होतं, त्या संपूर्ण संघाचे ते दाजीच झाले होते. संघ आणि दाजींमध्ये कधी द्वैत नव्हतच. संघात आल्यापासून जीवनाच्या पूर्णाहूती पर्यंत अपवादाने, पण एखादे वर्ष नाही जेंव्हा त्यांच्याकडे संघाची जबाबदारी नव्हती. अनथक अविरत साधना त्यांनी कधी सोडलीच नाही. अगदी जाण्यापूर्वी चार दिवसआधी झालेल्या वर्षप्रतिपदेच्या आॅनलाईन ऊत्सवात सहभागी होऊन आद्यसरसंघचालक प्रणाम दिला गेला पाहीजे यासाठी त्यांची धडपड आणि उत्सवात सहभाग होता. ते आल्याऩंतरचे समाधान
त्यांची संघावरची अविचल निष्ठा जाणवून देणारी आहे. 

     बोलण्यात सहजपणे येणारे तुकाराम महाराजांचे अभंग, त्यांचा गाथेचा अभ्यास हे त्यांचा अध्यात्मिक पिंड  लक्षात आणून देणारा होता. स्वाभाविक उत्स्फूर्त पणे त्यांनी रचलेल्या अभंगाच संकलन 'अभंगमधू' सर्वांनाच भावून गेलं.

     ४५-५० वर्षांचा त्यांचा संघातला प्रदीर्घ प्रवास होता. या संपूर्ण काळात किती घटना, प्रसंग, आव्हाने आणि त्याच्यावरचे तात्कालिक व दीर्घकालीन स्थायी उपाय याचे ते साक्षीदार नव्हे, तर विचार विनिमयातले प्रमुख घटक राहीले याची गणनाच होऊ शकत नाही. पण हा तर त्यांच्यावर आलेल्या अनेक जबाबदा-या त्यांनी कशा समर्थपणे पेलल्या याचा संदर्भ. संघाच्या सदासर्वकाळ जबाबदारीत असताना कार्यकर्त्यांना आणि संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी दिलेली सलगी कायम स्मरणात रहाणारी आहे. 

     आपल्याला संधी मिळावी अशी मागणी घेऊन जाणा-याची अपेक्षा त्या वेळेस पूर्ण करू शकत नसले तरी त्या स्वयंसेवकाचं स्मरण ठेवून त्याला संधी मिळवून देण्यासाठीची त्यांची धडपड, प्रत्येकाविषयी त्याच्या मनातला आत्मीयतेचा भाव दाखवून देणारी होती. 

     समाजातील विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील व्यक्ती,  विविध प्रश्नात  संघाचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे जात. नेहमीच संघ म्हणजे समाजहीत डोळ्यासमोर ठेवून दाजींनी दिलेला सल्ला पटो अथवा न पटो त्यांच्या शांत पण ठाम पणे सांगण्याच्या शैलीमुळे सर्वजण त्यांचा सल्ला आनंदाने स्वीकारत याची कितीतरी उदाहरणं सांगता येतील.

      देवगिरी प्रांतातील संघकामाच्या प्रत्येक टप्यावर दाजींचे अस्तित्व आहे.  हे सर्व असताना  स्वीकारणे व सोडण्यातली त्यांची सहजता विलक्षण होती. संघाचे नवीन नवीन येणारे आयाम संघाच्या मूलभूत चिंतनातील विकासाची प्रक्रिया कशी आहे हे समजावून सांगतानाची त्यांची कुशलता त्यांचा संघकामाचा अनुभव व आकलन लक्षात आणून देणारी होती. ओघवती बोलण्याची शैली, विचारांची स्पष्टता, योग्य उदाहरणांची पेरणी, झालेल्या बैठकीचे सार आपल्या बोलण्यात आणण्याची त्यांची हातोटी हे ठळक पणे जाणवणारे होते. 

     छत्रपती शिवाजीमहाराज, संत वाङग्मय याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. पहिल्या लाॅकडाऊन मध्ये संताच्या आॅनलाइन बैठकीत संघाचं काम करणारे दाजी एक संतच आहेत असे एक महाराज म्हणाले, हे त्यांच्या सात्विक जीवनाकडे पाहिल्यावर जाणवल्याशिवाय राहणार नाही.
संघाच्या देवगिरी प्रांताच्या सर्वोच्च जबाबदारीवर काम करत असतानासूद्धा त्यांच्या जीवनशैलीतील साधेपणा सर्व स्वयंसेवकांना मार्गदर्शकच आहे. आपल्या आई-वडीलांप्रती त्यांचा स्नेह व आदर त्यांच्या वागण्या बोलण्यातून नेहमीच जाणवत होता. त्याच आत्मियतेने त्यांनी आपल्या वडीलांची सेवा केली.

     एक ग्रामीण भागातला युवक आपल्या परिश्रमाने स्वतःची भौतिक आणि अध्यात्मिक प्रगती साधत, मुल्याधारित समाजाभिमूख जीवन जगता येऊ शकतं आणि ते यथार्थ करता येऊ शकतं, या यशस्वी ग्रंथाचं नाव आहे दाजी ऊर्फ मधूकर श्रीरंग जाधव.

     उणीव तर जाणवणारच, पण पांगळं करणारं मार्गदर्शन त्यांनी कधी केलच नाही. म्हणून त्यांच्या जीवन प्रकाशात त्यांनी दाखवलेला अनथक अविरत साधनेचा मार्ग आणि संघ विचारावरील अविचल निष्ठेची शिकवण लक्षात ठेवून पूढे चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होऊ शकते..!

- हरीश कुलकर्णी
देवगिरी प्रांत कार्यवाह

Published by @VSKDevgiri

टिप्पणी पोस्ट करा

53 टिप्पण्या

vasekar_englishlab म्हणाले…
You have paid a fitting tribute to Daji... Thank you Harishji for sharing with us ! Namaskar
हेमंत पोहनेरकर म्हणाले…
शांत, सुस्वभावी आणि मनमेळावू व्यक्तिमत्वास कोटी कोटी प्रणाम
श्रध्येय दाजी म्हणाले…
विनम्र श्रद्धांजली..
आम्हा सर्वांचे आधारस्तंभ - संघ कार्य ची सुरुवास्तकं आम्ही दाजी यांचे बोट धरून केले होते ..
1990 पासून आज पर्यंत दाजी मार्गदर्शक म्हणून मायेची सावली देत असे. आम्हा सर्वांना गोमाता सारख वत्सल देत असे. प्रत्येक वर्ग, बैठक मधील त्यांचे बौद्धिक आम्हाला नवी दिशा नवे मार्गपथ देत असे. पोटुळ येथील गोसेवा प्रशिक्षण वर्ग चा समारोप बौद्धिक अविस्मरणीय होता. गोमाता साक्षात त्यांच्याच रुपात विराजमान होती. आदरणीय दाजी मधुर , गोड आवाज आज ही कानात ऐकू येत आहे .
नावाप्रमाणेच मधु असलेले दाजी आज आपल्यात नाही याचा विश्वासच बसत नाही..
पवित्र दिव्यआत्मा स विनम्र श्रद्धांजली.
मनिष वर्मा - गोसेवा गतीविधी देवगिरी प्रांत
hit म्हणाले…
दाजी ना जास्त जवळ पाहायला सदभावना बैठक ला पाहायला मिळाले बैठक ला कोण्ही काही प्रश्न विचारले तरी दाजीन कळे त्याचे उत्तर असे
हेमंत पोहनेरकर म्हणाले…
दाजी विषयी चिरस्मरणात राहिलेली आठवण म्हणजे वीस वर्षांपूर्वी मी वसमतला असतानाची. मी शाखा कार्यवाह होतो.
दाजी आमच्या शाखेच्या वार्षिक उत्सवाला वक्ते म्हणून आले होते. प्रांत कार्यवाह थेट एवढ्या छोट्या स्तरावर काम करण्यासाठी येतात, या गोष्टीने मला त्या वेळेस खूप ऊर्जा मिळाली होती.
Unknown म्हणाले…
मी संभाजीनगरला 1994 मध्ये आलो व 1995 पासून 10 / 11 एप्रिल 2021 च्या बैठकीपर्यंत दाजींचा सहवास व मार्गदर्शन मिळत राहिले. मी माझ्या वैयक्तिक व संघ जीवनात आज जिथे आहे तिथपर्यंत पोहचण्यात दाजींचा वाटा महत्वाचा आहे . पुढील वाटचालीत त्यांनी केलेले मार्गदर्शन व घालून दिलेला आदर्श नक्कीच मोलाचा ठरेल. अशा महान विभूतीस विनम्र श्रद्धांजली - धनंजय धामणे, प्रांत सहकार्यवाह
Prof. Dr. Umesh Ashok Shinde म्हणाले…
दाजींचं जाणं म्हणजे संघ परिवारातून एक अनुभव , प्रशिक्षित, संगठन प्रिय व्यक्ति असलेल्या व्यक्ती आपल्यातून जाणं ही खूप मोठा शोक आहे धक्का आहे.
Unknown म्हणाले…
*देवान स्वतःचाच ताण वाढवला..!*
• देव कसा आहे? पाहा ना...!
• चांगल्या माणसांची देवाला चटकन लागली....!
• चांगले असणे खरच एवढं अवघड असत का..?
• चांगले वागणे याची एवढी मोठी किंमत असते का कुठे?
• देवाने मांडलेल्या या बाजारात चांगल्या व्यक्तीला एवढी किंमत असेल तर ही लोक एवढी चांगली का वागली?
• चांगले,सरळ,सहज,सुंदर राहणे हे खरंच पुण्य आहे का?
• की देवाला आवडेल म्हणून त्याने तयार केलेला गुणांचा समुह आहे.
• कधी कधी वाटत की चांगले वागुच नये? मग देव इतक्या लवकर,सहज व एवढी मोठी किंमत देऊन नेणारच नाही.
• बरं, ह्या सार्या माणसांनी थोडी तरी वाईट वागव... म्हणजे देवाने थोडी वाट पाहिली असती.
• त्याची आज नव्हे तर कायमच गरज होती आम्हाला. आता आजुबाजुच्या लोकांना आपल्या जवळचाच चालतांना, बोलतांना देव कसा दिसेल?
• देवाने चांगले केली की वाईट हे माहिती नाही. पण एक खरं आहे की ह्या व्यक्तीनां बोलावून पृथ्वी वरील त्याच्या कामाचा देवाने ताण मात्र वाढवला.
• कारण, देव नेहमी कामात व्यस्त असतो.तो आमच्या सारख्याकडे लक्ष केव्हा देईल? सहज आत्मीयतेने विचारेल का? कसा आहेस? कुठून आलास?विचारेल का...?
• तर त्या देवाच्या रुपान आम्हाला ही मंडळी विचारत होती.म्हणून वाटत देवाने आपला स्वतःचा ताण वाढवला...!
• अशी माणसं पुन्हा येतील? तयार करण्यासाठी थोडा वेळ लागेल? कारण आत्मा अमर आहे. तुमचं ,माझं जीवन उजळून येण्यासाठी ही पुण्यआत्मे पुन्हा येतील हाच विश्वास आहे...!
• पण देवा आता तुझी काळजी वाटते रेsss! तुझा ताण वाढला आहे. काळजी घे रेsss देवा....!
- श्रीराम पांडे
K.Purushottam. म्हणाले…
सतत हसतमुख तरीहि विषय व कामाबाबतीत गंभीर,
सर्व कार्यकर्त्यांविषयी आपुलकी असणारे,
बैठक किंवा प्रवासासाठी बोलावल्यास नेहमीच तत्पर,
अवघड विषयांचीही सोप्या प्रकारे उकल करणारे,
अनेक विषयांत लिलया संचार करणारे,
परिस्थिती अनुरुप व वस्तुस्थितीशी सुसंगत अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारे,
संत वाङ्गमयाचे अभ्यासक,
सामाजिक सद्भाव व समरसता याबद्दल सखोल चिंतन, कार्य व अनुभव असणारे....

संघकामात दाजींचा परिचय झाला आणि त्यांच्यातला साधेपणा, सलगीचे दर्शन भावले.
कोणतीहि गोष्ट संघरीतीप्रमाणे झाली पाहिजे, त्यात कोणतीहि तडजोड नसावी, या बाबतचा त्यांचा आग्रह यामुळे, त्यांची संघनिष्ठा इतर स्वयंसेवकात संक्रमित होत असे.
विभागातील संघचालकांच्या वार्षिक एकत्रित बैठकीचा आग्रह, तीत सहभागी असणाऱ्या संघचालकांना कार्यप्रवृत्त करणारा ठरे.
प्रांत संघचालक हे मोठे दायित्व असतांनाही, त्यांचा उपखंडस्थानापर्यंत होणारा प्रवास ही त्यांची मुलभूत, दैनंदिन संघकामाबद्दल, कार्यपद्धतीबद्दल असणाऱ्या विश्वासाची स्वयंसेवकांना येणारी अनुभूती असे.

दाजी (मधुकर श्रीरंगराव जाधव). यांचं इहलोक सोडून जाण, खरं तर अनपेक्षित आणि म्हणून मनाला चटका लावून जाणारं, हृदयात कालवाकालव करणारं.
ईश्वरेच्छा बलियसी.
त्यांची स्मृति आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहाणार.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होतांना, त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती द्यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ओम शांती.
डॉ.पी.के.कुलकर्णी, बीड.
काल बातमी कळाल्यापासून मोठं काहीतरी हरवल्या सारखं वाटतयं. त्यांच्या सोबत अनेकदा प्रवास करण्याची, संवाद करण्याची धन्यता मी अनुभवली आहे. ते दूरसंचार कार्यालयात असोत की, संघप्रवासात त्याच्या सोबतच्याला त्यांच्या प्रगल्भतेची जाणीव पदोपदी व्हायची. दाजी खूप लवकर सोडून गेले.
दाजी अतिशय प्रगल्भ होते. ज्ञानी होते. माझ्या सारख्या सामान्य स्बयंसेवकासोबतही अतिशय सहज संवाद करायचे.
दाजी अनुकरणीय होते, आदर्श होते , मधुभाषी होते.
त्यांची नुसती उपस्थिती सुध्दा संस्कारक्षम होती. दाजी जरी देहरुपाने आपल्यात नसले तरी संस्काररुपाने माझ्यासारख्या असंख्य स्वयंसेवकांच्या ह्दयात ,आचरणात आजन्म असतील _/\_
Unknown म्हणाले…
प.पू.श्री गुरुजी जन्मशताब्दी वर्षात संघ स्वयंसेवकानी चालवलेल्या संस्थेत निवडणूक नको!
भा.शि.प्र.संस्थेची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी मा.दाजींनी शिवधनुष्य ऊचलले, मी विभाग कार्यवाह होतो त्यामुळे एकत्र प्रवास झाला, दाजींची सरळ सात्विक व्रूत्ती जाणवत होती.
भाव शुद्ध होता, कांहीं आढाखे ,अंदाज चूकले ही असतील पण निवडणूक न होता संचालक मंडळ आले!
तत्कालीन संघ पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांच्या भूमिका, व राजकारण करण्यात हातखंडा असलेली कांहीं अति महत्वकांक्षी मंडळी स्पष्ट झाली.
दाजी किती सत्शील आहेत, संघशरण आहेत, व प्रचारकां संबंधी किती संवेदनशील आणि तत्पर आहेत याचा अनुभव आला!
गिरीश जी कुबेर यांच्या बद्यल तर त्यांना कमालीचा आपलेपणा आदर होता, तो सर्लच प्रचारका साठी असतो हेच लक्षात येते!
कठोर निर्णय, व संकटाच्या स्थिती त ही संघ हितालाच प्राधान्य देणारा हा एक निष्ठावंत अधिकारी होते,
भावपूर्ण श्रद्धांजली!
सलग 38 वर्षे एकत्र वाटचाल ,त्यांच असं सोडून जाणं ,मनात कायम एक खंत ठेवणार!
भाव सुमनांजली!
Anand म्हणाले…
कोटी कोटी प्रणाम
Unknown म्हणाले…
दाजी प्रांतकार्यवाह असताना माझ्याकडे जिल्हा कार्यवाह दायित्व संबंधीत बोलणी करण्यासाठी आले होते त्यांचे संघाप्रति असलेली निष्ठा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली.
दाजीचे ते आपुलकीने वागणे कुटुंबातील व्यक्ति ची चॊकशी करणे सहज असे.
मागच्या वर्षी नाशिक येथे भेट झाली तीच शेवटची. पण दाजी आपल्या सोबतच असतील त्यांच्या कार्यामुळे.
आत्मयास शांती मिळो व सगळ्यांना हे दुःख सहन
करण्यासाठी शक्ती मिळो हिच ईश्वराकडे प्रार्थना.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Unknown म्हणाले…
आ.दााजींच्या अनेक आठवणी आहेत. अनेक वर्षांचा सहवास होता. आपल्या घरातील जेष्ठ व्यक्ती गेल्याची भावना आहे. संघकार्यकर्ता म्हणून, भा.शि.प्र.संस्था कार्यकर्ता म्हणून मला वैयक्तिक खूप स्नेह आणि मार्गदर्शन मिळाले. अनेक कठीण प्रसंगात संघानुकुल भूमिका कशी घ्यावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मा.दाजी होत. आमच्या पिढीने प.पू.डााॅक्टरांना पाहिलेले नाही. आम्ही त्यांच्यातच डाॅक्टर पाहिले.
.....प्रकाश जोशी,
अंबाजोगाई.
Shrirangsgosavi@gmail.com म्हणाले…
मागिल वर्षी अंबडला घरी होणा-या बालाजी उत्सवाची पत्रिका मा दाजींना पाठवली होती. नंतर भेट झाल्यावर दाजींनी आवर्जून सांगितले की मी आपल्या घरच्या बालाजीच्या उत्सवाला येणार आहे. व खरोखरच शब्द दिल्या प्रमाणे मा दाजी दोन दिवस अंबडला बालाजी च्या उत्सवा साठी आले. सर्व धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले. घरातील बाल गोपालांचा बालाजी च्या उत्सवातील सहभाग व उत्साह पाहुन मा दाजींनी सर्वांचे कौतुक केले. मा दाजींचा तो दोन दिवसांचा सहवास आमच्या सर्व कुटूंबियांना भारुन टाकणारा होता. कै अण्णा नंतर ही सर्व कुटूंबियांनी जपलेली अध्यात्मीक परंपरा पाहुन मा दाजी अत्यंत खुष झाले होते. ज्या ज्या वेळी मा दाजीं सोबत अनौपचारिक बोलणे होई त्या वेळी कुटुंबातील सर्वांची अत्यंत सखोल चौकशी करत. सर्व भाऊ त्यांची मुले, बहिणींचे काय चालले आहे इत्यादी. मा दाजी आपल्यात नाहीत यावर अजुनही विश्वास बसत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली
श्रीरंग गोसावी- अंबड
Prof Dr Pandarinath Ramesh Rokade म्हणाले…
...!! विनम्र श्रद्धांजली !!....
सन्माननीय दाजी....
संघ परिवारातील सर्वसामान्य कार्यकर्त्या विषयी ...
आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, अभिमान आणि विशेष कौतुक असणारं असं व्यक्तिमत्त्व...
.. आपण अनेक बैठकी मधून केलेले मार्गदर्शन,
दिलेले संस्कार,
आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चिरस्मरणीय राहतील...
...आदर्श संघस्वयंसेवक असलेल्या दाजींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षिक संघ व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या वतीने
!!!..भावपूर्ण श्रद्धांजली...!!!
प्रा. डॉ. पंढरीनाथ रोकडे
Unknown म्हणाले…
पाच मिनीट मनाची चलबिचल झाली .दाजी आपल्या त नाहीत हे वास्तव .भावपूर्ण श्रध्दांजली . साल 2015 गुरुपोर्णिमेच्या कार्य क्रमाला दाजी वक्ते होते.धाराशिव मधले सर्वात मोठे मंगल कार्यालयात उत्सव ठरला होता.वेळ सायंकाळची पावसाचे दिवस दुपारी चार पासुनच पावसाला सुरवात पाऊस थांबात नव्हता पञिकेचे वितरण व्यवस्थित झाले होते बाहेर पाऊस असला तरी सभागृहात तयारी झाली होती साडेपाच वाजता पाऊस थांबला सहा वाजता सभागृह भरले 6-15ला पहिली शिट्टी झाली तेव्हा दाजींनी मोबाईल बघितला पुजन झाले दाजींच बोलन झाल ठरल्या प्रमाणे कर्यक्रम झाला राञी भोजन करुन दाजी निघणार होते आमचे व्यवस्था प्रमुख खुश होते जाताना दाजींनी मला जवळ येवून म्हणाले छान झाला कार्यक्रम आणि पाठीवरुन हात फिरवला हात फिरताच दिवसभराचा थकवा पळाला मी म्हणालो मी आता व्यवस्था प्रमुख नाही दाजी पटकन म्हणाले मला माहीत आहे म्हणून तर अभिनंदन केले . ही दु:खत बातमी येताच तो प्रसंग डोळ्या समोर आला .पुन्हा एकदा भावपूर्ण श्रध्दांजली शेवटी सरले ते दिवस राहील्या फक्त आठवणी
Kailas Rathod म्हणाले…
आज संध्याकाळी दाजींच्या दुःखद निधनाची बातमी कळली, क्षणभरासाठी विश्वासच बसेना

दाजींच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती कधीही भरून निघणार नाहीये
त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील, मागील 3 वर्षात ग्रामविकास काम करत असताना मी जेव्हा त्यांना कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात पूर्णवेळ थांबण्यासाठी आग्रह करायचो, तेव्हा ते कधीही नाही म्हटले नाही, पूर्णवेळ आमच्यासोबत राहून आमचा उत्साह वाढवला, मार्गदर्शन केले,2 वर्षापूर्वी माझे वडील वारले तेव्हा भेटता नाही आले, म्हणून फोनवर चौकशी केली.
प्रचारक काळातही त्यांचा सहवास हवाहवासा वाटायचा, अशा एक ना अनेक आठवणी आज दाटी करताहेत, दाजी सदैव स्मरणात राहील,
दाजी पुण्यात्मा होते.

शेवटी काय ईश्वरेच्छा बलीयसी!����

कैलास राठोड
ग्रामविकास
Sanjay Talkhedkar म्हणाले…
पु .बाळासाहेब देवरस म्हणत,"संघाला देवदुर्लभ कार्यकर्ते लाभले आहेत".मा.दाजी याचे मूर्तिमंत उदाहरण !
अतिसामान्य, अल्पभूधारक, अशिक्षित परंतु अध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या कुलीन घराण्यातून आलेले हे शालीन व्यक्तीमत्व.संघ संपर्कात आले,हिऱ्याला पैलू पडल्यावर जसे स्वरूप अधिकच उजळते तद्ववत दाजींचे व्यक्तिमत्व संघ संपर्कात आल्यावर अष्टपैलू झाले !
संघजीवनात निरंतर दायित्व पार पाडून अंतिम क्षणापर्यत सक्रिय। राहिले.
मा.दाजी देवगिरी प्रांताचा चालत बोलता इतिहासच होते.तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यापासून सर्व स्तरातील, विविध क्षेत्र, संस्था संघटना कार्यकर्ते यांच्याशी घनिष्ठ संबंध !या आपुलकीच्या नात्याने अनेक गुंतागुंतीच्या प्रसंगी मार्ग काढण्याची विलक्षण हातोटी !
सामाजिक प्रश्नांची विलक्षण जाण, संतसाहित्याचा व्यासंग हे वैशिष्ट्य !
कार्यकर्त्यांच्या जीवनात खरंच त्यांचे स्थान ,"दाजी" हेच होते!
पु .डॉक्टरांच्या पासून सुरू झालेली अशी ही कार्यकर्त्यांची अक्षूण्य परंपरा,त्यातील एक मा.दाजी !सर्वसामान्यांच्या जीवनातील सर्व कडूगोड प्रसंग त्यांच्याही वाट्याला आले. मात्र व्यक्तीगत जीवनात संघकामाला त्यांचे सर्वोच्च प्राधान्य राहिले .
म्हणून आपल्या जीवनात संघरचनेत राहून प्राधान्याने,शक्तीबुद्धीची पराकाष्ठा करून निरंतर पणे दायित्व स्वीकारून संघकार्यात सक्रिय रहाणे हीच खरी श्रद्धांजली ! ओम शांती
संजय तालखेडकर
Unknown म्हणाले…
गेल्या त्या दिगंबर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी

आज संपूर्ण देवगिरी प्रांतच नाही तर दाजीवर आतोनात प्रेम करणारे सर्व दुःख सागरामध्ये बुडालेले आहेत कारण हे व्यक्तिमत्त्वच तसे होते मी प्रत्यक्ष त्यांना पाहिलं नाही अथवा त्यांचा सहवास कधी मिळाला नाही परंतु त्यांच्या ठिकाणी असणारी संतांवरील अतूट श्रद्धा त्यांचं संत तुकाराम महाराजांच्या परी असणार कवित्व यांनीच मी प्रभावित झालो शेवटी तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे

उत्तमची उरे किर्ती मागे

या उक्तीप्रमाणे आज त्यांच्या कार्याची महती त्यांचा स्वभाव याविषयी संपूर्ण समाज हळहळ व्यक्त करत आहे. दाजींना परमेश्वराने निश्चितच आपल्याजवळ स्थान दिलं असेल कारण जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असो दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या वाणी ला विराम देतो.
भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती शांती शांती ......
ह भ प संदीप महाराज
विहिप जिल्हा सहमंत्री जळगाव.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
देवगिरी प्रांताच्या २०१९ च्या प्रथम वर्षाच्या समारोपाप्रसंगी मा. दाजींचे बौद्धीक झाले. त्यात त्यांनी असे सांगितले, संघ व समाज एकरुप करणे हे प्रत्येक स्वयंसेवकाचे कर्तव्य आहे व हे काम स्वयंसेवकाच्या प्रत्येक कृतीतून समाजाला दिसत असते. सहज व ओघवत्या सांगण्यातून वर्गातील सर्व स्वयंसेवकांना सांगितलेला मार्ग या वरिल वाक्यातून कळतो. प्रभु रामचंद्र दाजींच्या आत्म्यास शांती देवो हिच प्रार्थना.
॥ ॐ शांती, शांती, शांती ॥
ज्ञानेश्वर रविशंकर कोंडावार , परतुर ( जालना )
Unknown म्हणाले…
दाजी चा आणि माझा प्रथम परीचय झाला तो तात्यांच्या ( अनंतराव देशपांडे ) यांच्या माध्यमातून त्या वेळेस दाजी जालना येथे कार्यरत होते. संघ कार्य कसे करावे हे त्यांच्या बोलण्यातून कळत होते नंतर हळवद येथील संघ शिक्षा वर्गात दाजी आले होते त्यांचे बौद्धिक एैकण्यात आले व दोन दिवस त्यांचा सहवास लाभला लोहचुंबका प्रमाणे मला त्यांनी ओढूनच घेतले. ही आठवण जन्मभर न विसरणारी आहे.
माझे दुर्दैव असे आहे की मला ज्या वेळेस ज्या व्यक्तींची जास्त गरज भासते ती व्यक्ती अनंता च्या प्रवासाला निघून जाते.
पण दाजी चा जो काही सहवास व मार्गदर्शन लाभले तो काही कमी नाही स्वयंसेवक म्हणून काम कसे करावे दैनंदिन जिवनात त्याचे आचरण कसे असावे ते दाजी कडे पहील्या नंतर कळते.
दिपक वसंतराव मांडे , जालना.
🌳🙏🌳
Unknown म्हणाले…
मा.स्व.दाजी ना भावपूर्ण श्रध्दांजली. दाजी चा सहवास मला मी जालना येथे abvp पूर्ण वेळ असताना आला. तेव्हा पासून त्यांनी सर्वौच स्थरावर जबाबदारी असताना , सतत कार्यमग्न , प्रवासात , शासकीय सेवेत मोठे अधिकारी असताना ही कधीही वेगळ पण न दाखवता त्यांच्या हसत मुखाने कुठलीही वेळ असो अडचण न सांगता स्वागत केले ! आपुलकीने ,प्रेमाने वेळ देवून संपर्क ठेवून सर्व चौकशी करत ! Abvp ,संस्था, सिनेट व वैयक्तिक कुठलाही विषय असो ते शांत ऐकून न्याय देत.ते मोठे अधिकारी असताना ही त्यांनी संघ अधिकारी व कार्यकर्ता यातील अंतर वाढू दिले नाही. ही त्यांची सहजता, कार्यशैली आपलेपणा अनेक स्वयंसेवकांना ,कार्यकर्त्यांना संघ व परिवारात नेहमीसाठी बांधून ठेवेल.
संघ अधिकारी दाजी अविस्मरणीय आहेत. मनोज पत्की
Unknown म्हणाले…
मा.दाजी यांचा अनेक वेळा सहवास लाभला, त्याचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणा दाई आणी समाज काम करण्यासाठी उपयोगी होते. दाजीची आपलेपणा ची वागणूक काम करण्यासाठी शक्ती देणारी होती. दाजी नसल्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारी आहे.
मा.दाजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
राजु भालेराव जालना
Unknown म्हणाले…
🕉️ शांति शांति शांति
PRASHANT म्हणाले…
भावपूर्ण श्रद्धांजली,
दाजीचा मागील दोन वर्षांपूर्वी सहवास लाभला. त्यांच्यासोबत धाराशिव ते कळंब प्रवासाचा योग आला. खूप सहृदय व मधू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते.
देवगिरी प्रांताची व एकूणच संघाची खूप मोठी क्षती झाली आहे
प्रशांत महाजन
कुटुंब प्रबोधन जिल्हा संयोजक, धाराशिव जिल्हा
Unknown म्हणाले…
मी आणि दाजी बालमित्र होतो, कांही काळ मी मुख्यशिक्षक व दाजी कार्यवाह म्हणून परभणी येथील अभिमन्यू सायं शाखेत सोबत काम केले. नंतर शिक्षण, नौकरी निमित्ताने ते संभाजीनगर येथे स्थाईक झाले आणि संपर्क कमी झाला पण अधून मधून फोन होत असायचा, कांही वेळा भेटही होत होती. आपला एक जवळचा बालमित्र मा.प्रांत संघचालक झाला याचा खूप अभिमान व आनंद झाला होता. एक जवळचा मित्र आज गमावला याचे खूप वाईट वाटले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती 🙏🏻🙏🏻
Unknown म्हणाले…
मन समर्पित, तन समर्पित, और यह जीवन समर्पित, चाहता हूँ मातृ भु तुझको अभी कुछ और भी दूं...इसी भावना को जीते हुए आदरणीय दाजी चले गए। ऐसे सपूतों केत्याग और समर्पण से हम उऋण नहीं हो सकते उनके पदचिन्हों पर चला गया हमारा एक कदम भी उन्हें सच्ची श्रद्धांजलि होगी।। -प्रा.डॉ.विजयप्रकाश शर्मा, शहादा
मा.दाजी आपल्यातून निघून गेले.विश्वासच बसत नाही.मा.दाजी शेवटपर्यंत कार्यमग्नता जीवन व्हावे,मृत्यु हीच विश्रांती...या पद्याच्या उक्तीप्रमाणे जगले.सामान्य स्वयंसेवकांवर जीवापाड प्रेम करणारे,भेट झाली की प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करणारे,परतूरकर कसे आहेत?आपुलकीने विचारपूस करणारे दाजी होते.माझी वैयक्तिक भेट झाली की,'काई टाबर' असे म्हणणारे मा.दाजी आज निघून गेले.मागच्या वर्षी दि.२८ फेब्रुवारी २०२० सा.विवेक प्रकाशित 'मधुगंध' प्रकाशन सोहळ्यात त्यांचे मधुर वाणीतील बौद्धिक ऐकले ते शेवटचे...आवाजही ऐकला तो शेवटचा...अन् भेटही शेवटची...मा.दाजींना भावपूर्ण श्रद्धांजली...�� मनिष अग्रवाल,परतूर(जालना)
Unknown म्हणाले…
संघा च्या उत्सवा निमित्ताने बौद्धिक देण्यासाठी मा.दाजीं चा धुळे येथे अनेक प्रवास सातत्याने होत...२००६पासुन ते२०१८ पर्यंत ...
दाजीं चे बौद्धिक स्वयंमसेवकांं साठी मोठी मेजवानीच असे.... त्यांचे बौद्धिक संपल्यानंतर स्वयंसेवकांं चा भोवती गराडा पडायचा...संघ सम्बधी अनेक प्रश्नां ची विचारणा होत....व विचारणार्या ना समाधान होई पर्यंत सहजपणे सोप्या,स्वच्छ शब्दात
, समर्पकपणे ते उत्तर देत असत...
त्यांचे व्यक्तिमत्व हि तेवढेच सरळ, सु संस्कृत, व चैतन्यदायी...स्वयंसेवकाना भावणारे.... आपलसं करणारे.....आदर्श वत वाटणारे...
मा. दाजीं ची अनंताची यात्रा ...खुपच वेदना दायक...मन सुन्न करणारी...अबोल करणारी...
अनेक संघमयी आठवणीं चे गाठोडे असेच ठेऊन...पुन्हांं भेटु .... असे सांगणारे दाजीं....
खरचं पुन्हा भेटतील का कधीतरी....?
भावपूर्ण श्रद्धांजली ....
Unknown म्हणाले…
साहेबचंद जैन धुळे
बाबू गंजेवार म्हणाले…
मी जिल्हा संघचालक होतो त्यावेळी कंधार तालुक्यातील नंदांशिवणी ह्या छोट्या खेड्यातील सरपंच असलेले माझे स्नेही ( भजपा कार्यकर्ते ) संग्राम जाधव हे मला म्हणाले की मधुकर जाधव साहेबांना नंदनशिवणीला बोलवायचे आहे, मला आश्चर्य वाटले मी विचारले की कशासाठी? तर ते म्हणाले संत तुकाराम वर भाषण ठेवायचे आहे,
हे दुसरे आश्चर्य वाटले कारण दाजी संत तुकाराम विषय मांडतात हे मला ठाऊक नव्हते. यथावकाश तारीख घेतली मोटरसायकलवर तिथे गेलो, सायंकाळी मारोतीच्या पारासमोर सगळा गाव जमलेला, आणि दाजीनी संत तुकाराम मोठ्या रसाळ भाषेत मांडला. साधारणतः दिडतास लोक तल्लीन होऊन ऐकत होते...हा सर्वच अनुभव माझ्यासाठी नवीन होता, दाजीचे एक वेगळे रूप कळाले...आजही ती पारास्मोरची सभा स्पष्ट आठवते...
Vijay chatupale म्हणाले…
*समर्पित....*

संघ परंपरेतील एक निखळ संघ विचाराचा वाहता झरा , वाहता वाहता थांबला.

मी परम पूजनीय डॉक्टर हेगडेवार किंवा श्री गुरुजी यांना पाहिले नाही पण त्यांच्या संघ विचारांचा ज्ञानरूपी झरा मी तो माझ्या जीवनामध्ये दोन व्यक्ती मध्ये पाहिला आणि अनुभवला .. एक म्हणजे स्वर्गीय प्रल्हाद जी अभ्यंकर आणि दुसरे माझ्या बरोबरीने अतिशय जवळून अनुभवलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रांत संघचालक श्री मधुकरराव जाधव (दाजी) ज्यांच्या सहज व आदर्श वागण्यातून मी संघ अनुभव घेतला तो अविस्मरणीय व प्रेरणादायी असा आहे

स्वयंसेवकाच्या प्रत्येक गोष्टींवर त्यांची आवर्जून दृष्टी असायची. तो काय करतो, काय केले पाहिजे, काय करू नये ...... कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असो, त्या स्वयंसेवकाच्या प्रत्येक गोष्टीवर हे नेहमी लक्ष ठेवत असत. कितीही अवघड विषय त्यांच्यासमोर मांडल्यानंतर ते त्याचे उत्तर अतिशय सहजतेने व प्रेरणादायी पद्धतीने सांगायचे, मग तो विषय वैयक्तिक असो किंवा संघटनेचे संदर्भात.

संघटनेत काम करताना त्यांनी सांगितलेली अनेक उदाहरणे माझ्या आयुष्यामध्ये नेहमीच प्रेरणा देणारी ठरली आहेत. शहर कार्यवाह, तालुका बौद्धिक प्रमुख,तालुका कार्यवाह , म्हणून काम करत असताना दाजींचा सहवास हा अविस्मरणीय व आदर्श स्वयंसेवक बनण्यासाठी प्रेरणादायी असा होता.

"शब्दांची ही माळ किती गुंफत गेलो , दाजींना आदरांजली वाहण्यासाठी कितीही मोठी केली तरी ती कमीच पडेल ,असा हा संघ रुपी झरा परत वहातांना दिसणार नाही , पण त्यांनी दाखवलेला मार्ग हा अजून अनेक झरे निर्माण करणारा नक्कीच ठरेल"

या आदर्श व्यक्तिमत्वाच्या विचाराने व संस्काराने मी लहानाचा मोठा झालो. त्यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. माझ्या परिवाराचे आदर्श आदरणीय देवगिरी प्रांत संघचालक मा मधुकरराव(दाजी) जाधव त्यांच्या जाण्याने माझ्यासारख्या सर्व स्वयंसेवकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.

ईश्र्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !!
त्यांच्या कुटुंबीयांना आई योगेश्वरी हे दुःख पेलण्यासाठी शक्ती देवो.

।।ॐ शांती शांती शांती।।
🙏🏻🙏🏻🙏🏻
विजय चाटुपळे
पैठण
🙏💐 भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
शांत,सुस्वभावी, अभ्यासु , विनम्र, प्रेमळ आणि चांगले मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आपल्या मधून निघून गेले ह्याचे फार दुःख आहे. मुद्देसूद आणि अभ्यासू वक्ते म्हणून दाजी हे आपल्या सर्वांना परिचित होते. त्यांचा सहवास प्रत्येकास हवाहवासा वाटायचा . प्रत्येक विषय सोपा करून व उदाहरणासह मांडणी करणे हा दाजींच्या वक्तृत्वाचा हातखंडा होता. दाजींनी मांडलेला विषय इतका सोपा आणि ओघवता असायचा की सामान्यातल्या सामान्य स्वयंसेवकाला तो सहज समजून जायचा.
संपर्कात आलेल्या प्रत्येक स्वयंसेवका सोबत स्नेहाचे, जिव्हाळ्याचे संबंध तर ठेवायचेच सोबतच त्यांच्या अडचणी आणि निराकरण सहजपणे करण्याचे कौशल्य दाजीच्या व्यक्तिमत्वात होते. अनेक बैठकांमधून व कार्यक्रमांमधून दाजीशी बोलण्याचा व त्यांचे विचार ऐकण्याचा योग आला. आमच्या पिढीतील अनेक तरुण स्वयंसेवक दाजींचे ऐकूनच विषय मांडणी आदर्शपणे व मुद्देसूद कशी करावी हे शिकले. परिवारातील अध्यात्म आणि राष्ट्रधर्म दोन्हीचा समन्वय करणारा तारा निखळला आहे. त्यांचे असे जाणे संघ कार्यासाठी खूप मोठी क्षती आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरंतन शांती प्रदान करो .
Unknown म्हणाले…
मी भूम तालुका कार्यवाह असताना दाजी भूमला आले होते. ते माझ्या दुकानात येवून गेले. दाजीना पाहिल्यावर खूप प्रसन्न वाटत असे. कुंथलगिरी येथे लातूर विभागातील सर्व संघचालकांची एक दिवसाची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीची सर्व व्यवस्था माझ्या कडे होती. बैठकीसाठी दाजी उपस्थित होते. त्यांचा दिवसभर सहवास खूप उर्जा देवून गेला. ते नेहमी हसतमुख असत. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांचे खूप नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली .....

सचिन क्षीरसागर भूम (धाराशिव)
Unknown म्हणाले…
एक सच्चा माणूस हरवलं आहेत...
शांत स्वभाव, सहज मिसळणारे व आपलेसे करणारे तसेच कमी शब्दांत समजुन सांगणारे दाजी आज आपल्यात नाही पण त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.

ॐ शांति शांति शांति 🙏
Unknown म्हणाले…
भास्कर भाले. मी परभणी जिल्हा संघचालक असतांना दाजींचा सहवास मला लाभला. पुर्णेला आमची लोककल्याण पतसंस्था आहे. पतसंस्थेच्या ईमारतिच्या उद्घाटनप्रसंगी बोलावल्याबरोबर होकार दिला.तेंव्हा त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच आमच्या लोककल्याणच्या व्याख्यानासाठी आले होते. दाजींना विनम्र श्रद्धांजली.
Unknown म्हणाले…
भावपुर्ण श्रद्धांजली
Unknown म्हणाले…
विनम्र अभिवादन "
जोशी सरांचा मेसेज आला दाजींची आठवण लिहा म्हणून. आधीच दाटलेल्या आठवणींनी मला भूतकाळात अजूनच मागे नेल. आमचा अरुणदादा आणि मधुभाऊ त्यांच्या शिक्षणाच्या काळात परभणीला सोबत रहायचे. सोबतच संघाच काम करायचे. अरुणदादामुळंच आम्हाला मधुभाऊ भेटला. अरुणदादा आणि मधुभाऊ मित्र होतेच पण सख्ख्या भावांप्रमाणे त्यांच एकमेकांवर प्रेम होतं. पुढे दोघंही नोकरीला लागले. मधुभाऊचं लग्न ठरलं. मधुभाऊला तीनीही भाऊच. त्यामुळं त्याची करवली होण्याचं भाग्य मला मिळाल.
दहावीनंतर मी अरुणदादाजवळ शिकायला राहीले होते तेव्हा मधुभाऊ - वहिनी आमच्याकडे यायचे. त्यामुळं त्यांचा सहवास मला मिळायचा.
१९९४ मध्ये अरुणदादाला नियतीनं आमच्यापासून हिरावल. पण मित्र गेला म्हणून मधुभाऊ आपलं कर्तव्य विसरला नाही. उलट अरुणदादाने घेतली असती तेवढी तो नेहमी माझी काळजी घ्यायचा. योगायोगानं लग्नानंतर मी बीडला, अंबाजोगाईला रहायला आले. आणि मधुभाऊच कार्यक्षेत्रही देवगिरी प्रांतात. बीडला, अंबाजोगाईला आल्यावर मधुभाऊ माझ्याकडे येऊन जायचा आणि माझ्याकडून निघताना " काही गरज लागली तर सांगत जा " असं म्हणून मला धीर देऊन जायचा.
खरोखर माझ्या गरजेच्या वेळी तो नेहमीच माझ्या मदतीला आला. मधुभाऊला नुसतं फोन करुन सांगायला उशीर की त्याच्याकडे माणसं तयारच असायची. त्याने सांगितलं की त्या त्या संघबंधुंनी सुद्धा अगदी आपुलकीनं माझ्या कामात मला नेहमीच मदत केली.
कधीच अरुणदादाची उणीव मधुभाऊन मला भासु दिली नाही.
एक दिवस त्याचं गाठीचं आॕपरेशन झाल्याचं समजलं. भितीनं पोटात गोळाच उठला. सुरुवातीला 'आता एकदम छान तब्यत आहे ' असं मधुभाऊ म्हणायचा. पण आजारापेक्षा किमोने तो त्रासून जायचा हे त्याच्याशी बोलताना जाणवलं. पण अशा दुखण्यातूनही बरे झालेले लोक मी बघितले होते त्यामुळं थोडा धीर धरत होते. पण भितीनेच अखेर विजय मिळवला. आणि जी नको तीच बातमी येवून धडकली. आमचा मधुभाऊ नियतीनं हिरावला.
आता खरं वाटतय की जी माणसं आपल्याला हवीशी वाटतात तीच माणसं देवाला पण पाहिजे असतात. आणि खरोखर देवानं दुस-यांदा आमचा अरुणदादा आमच्यापासून हिरावला. देवानं त्याचा डाव साधला. आमच्या मधुभाऊला त्यानं अवेळी काळाच्या पडद्याआड नेलं. मधुभाऊची उणीव नेहमीच भासणार आहे.
त्या ईश्वराला एकच प्रार्थना आहे की अरुणदादाच़ं, मधुभाऊचं आवडत -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच काम येवढं विस्तारु दे की ते पाहून मधुभाऊच्या आत्म्याला शांती आणि समाधान मिळू दे. मधुभाऊची आई, पत्नी, मुलं, सुना आणि आम्हा सर्वांना हे दुःख पेलण्याची शक्ती दे.

मंदाताई जोशी.
Unknown म्हणाले…

दोन दिवस झाले दाजींना जाऊन पण अजुनही विश्वासच बसत नाहीये या दू:खद घटनेवर...

हे सगळंच अनपेक्षित व अनाकलनीय आहे. विधीचे विधान आपणास काय ठाऊक, जो आलाय तो जाणार आहे हे ईश्वरिय सत्य जरी असलं तरी दाजींच जाण हे खूप क्लेशदायक आहे. दाजींच्या सोबतच्या आठवणी,त्यांचा सहवास आपणा सर्वांना कायम आठवत राहणार ..

दाजी आपल्यात नाहीत हे स्विकारनं खूप कठीण आहे.पण विधात्याचा इच्छे समोर आपण खरंच कोण आहोत.??

भगवती आई श्री जगदंबा, रेणुकामाता ,प्रभु श्रीराम ,श्री स्वामी समर्थ महाराज , ह्या कठीण घडीत दाजींचे कुटुंब व आपणा सर्वाना सावरण्याचे बळ देवो ,सामर्थ्य देवो ही प्रार्थना..

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं ............
ॐ शांति: शांति: शांतिः
Unknown म्हणाले…
खुपच सुंदर रचना!!
दोन दिवस झाले दाजींना जाऊन पण अजुनही विश्वासच बसत नाहीये या दू:खद घटनेवर...

ईतकं हे सगळंच अनपेक्षित व अनाकलनीय आहे. विधीचे विधान आपणास काय ठाऊक, जो आलाय तो जाणार आहे हे ईश्वरिय सत्य जरी असलं तरी दाजींच जाण हे खूप क्लेशदायक आहे. दाजींच्या सोबतच्या आठवणी,त्यांचा सहवास आपणा सर्वांना कायम आठवत राहणार ..

दाजी आपल्यात नाहीत हे स्विकारनं खूप कठीण आहे.पण विधात्याचा इच्छे समोर आपण खरंच कोण आहोत.??

भगवती आई श्री जगदंबा, रेणुकामाता ,प्रभु श्रीराम ,श्री स्वामी समर्थ महाराज , ह्या कठीण घडीत दाजींचे कुटुंब व आपणा सर्वाना सावरण्याचे बळ देवो ,सामर्थ्य देवो ही प्रार्थना..

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं ............
ॐ शांति: शांति: शांतिः
गिरीश जोशी रत्नाळीकर
Unknown म्हणाले…
दाजींच्या उत्तम उत्तम बौद्धिक वर्ग मूळे त्यांनी
स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले आणि त्यांचा पूर्ण प्रांतामध्ये असलेला वावर सर्व सेवकांना खूपच आधार होत होता त्यांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे त्यासाठी इतर स्वयंसेवकांना सुद्धा त्यांच्याप्रमाणेच कार्य करावे लागेल दाजींचा अनेक भौतिक वर्गांमध्ये असलेले शेवटचे वाक्य घर घर मे हो जिजाऊ हे स्मरणात राहील. दाजीना भावपूर्ण श्रद्धांजली
अरुण जोशी आणि परिवार जळगाव .
Snehalata swami म्हणाले…
दाजींच नसणं खूप दुःखद घटना आहे.समरसतेच्या निमित्ताने दाजींचा संपर्क आला होता.त्यांच्या आत्मिय बोलण्याने मी अगदीच प्रभावित झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज त्यांच्या उज्ज्वल कार्याचे जणू द्योतकच होते.
Unknown म्हणाले…
दाजी म्हणजे संघ विचार,कार्यपद्धती चे चालते बोलते व्यासपीठ होते.
पूर्वीचे स्वयंसेवक मा.प्रल्हादजी ची खूप सारी उदाहरणे दाखले देतात पण आमच्या पुढीचे प्रल्हाद जी म्हणजे दाजी होते. प्रत्येक गोष्ट नीट समजावून घेणे व योग्य तीच प्रतिक्रिया देणं हे दाजीच खास वैशिष्ट्य होत.
मी दाजींना 1998 पासून ओळखत होतो त्यांचा नेहमीच काही ना विविध कारणास्तव संपर्क येतं असे ते नेहमीच हसतमुखाने स्वागत करत व योग्य चर्चा करून स्वीकार होईल असा मार्ग काढत.त्यांचं ते निखळ हसणे खूप काही देऊन जात असे.
एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही ही कल्पना मान्य होत नाही.
भगवंत त्यांना चिरशांती देवो.
माझी भावपूर्ण श्रद्धांजली....💐💐💐
Unknown म्हणाले…
दाजी म्हणजे संघ विचार,कार्यपद्धती चे चालते बोलते व्यासपीठ होते.
पूर्वीचे स्वयंसेवक मा.प्रल्हादजी ची खूप सारी उदाहरणे दाखले देतात पण आमच्या पुढीचे प्रल्हाद जी म्हणजे दाजी होते. प्रत्येक गोष्ट नीट समजावून घेणे व योग्य तीच प्रतिक्रिया देणं हे दाजीच खास वैशिष्ट्य होत.
मी दाजींना 1998 पासून ओळखत होतो त्यांचा नेहमीच काही ना विविध कारणास्तव संपर्क येतं असे ते नेहमीच हसतमुखाने स्वागत करत व योग्य चर्चा करून स्वीकार होईल असा मार्ग काढत.त्यांचं ते निखळ हसणे खूप काही देऊन जात असे.
एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही ही कल्पना मान्य होत नाही.
भगवंत त्यांना चिरशांती देवो.
माझी भावपूर्ण श्रद्धांजली....💐💐💐

संदेश सोनवणे, संभाजीनगर
9403200408
sominath khade म्हणाले…
सतत चालणे आहे आता..
दाजी हा शब्दच आपलेपणाचा अर्थ सांगून जातो. मा.मधुकर जाधव उर्फ दाजी सतत हसत असणाऱ्या चेहऱ्यावर निखळ प्रेमाचा वर्षाव करणारे निःस्वार्थ व्यक्तिमत्व दाजी आज आपल्यात नाहीत हे अशक्यच वाटते. मा.सुदर्शनजीच्या उपस्थित बैठक व प्रकट बौद्धिक संभाजीनगरला असताना दाजीचे नियोजन व त्यांचे सांघिक काम करून घेण्याचे कौशल्य मला आजही डोळ्यासमोर उभे राहते. दाजी हे अखंड प्रेरणेचा स्रोत त्यांचे बौद्धिक सतत ऐकावेच वाटत असे वेळ संपला हे कधीच लक्षात येत नसे. राष्ट्रीय जीवनातील विविध उदाहरणे ते समोर उभे करत तसेच सामान्य व्यक्तीला समजेल असे सहज शब्द व उदाहरणे देत.अध्यात्मिक व संत परंपरेचा पाया असणारे दाजी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर होते. त्यांचा धाराशिव जिल्हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय राहिला त्यांची सामान्य कार्यकर्ता संपर्क करण्यासाठी असणारी तळमळ, सहज प्रवास, घरातील सर्वांची आस्तेवाईकपणे विचारणा आणि सर्व कार्यकर्त्यांची आठवण काढणे व भेट घेणे. जालन्यात असताना अनेक वेळा सोबत प्रवासाचा योग आला. दाजी प्रचारकासारखे साधे संयमित व चेहऱ्यावर आपलेपणाचा विश्वासदर्शक सहज भाव त्यांचे जीवनव्रत राहिले. कार्यकर्ता आपल्या मनातील भाव निसंकोचपणे व्यक्त करत तो दाजी पेक्षा वयाने छोटा असेल किंवा मोठा असेल मनातील सर्व बोलावे मनमोकळे करावे असे मातृहदय दाजी.ते कधी रागावलेत असे कोणिहि पाहिले असतील असे वाटत नाही. दाजी सदैव तरुणच राहिले ते कधी थांबले व थकले नाही. ४० ते ४५ वर्ष सतत अविरत संघकार्य कर्मयोगी होऊन बोलक्या हसऱ्या चेहऱ्यावर ओजस्वी तेज,निःस्वार्थ प्रेम, समाजाचे दायित्व निभावण्यासाठी कार्यमग्न, चारित्र्यमय जीवनाचा उत्तम आदर्श सातत्याने प्रेरणा देत राहिल.दाजी शरीराने जरी यापुढे आपल्यात नसले तरी मनातील संघकार्य प्रेरणेने सदैव आपल्यात कार्यरत राहतील...सतत चालणे आहे आता नाव नको विश्रांतीचे...भावपूर्ण श्रद्धांजली...💐 डॉ. सोमीनाथ सारंगधर खाडे,जालना.
Unknown म्हणाले…
माझी व्यक्तिशः खुप हानी झाली आहे.मला संघकाम , शेती व प्रक्रीया उद्योग याबाबत वेळोवेळी ऊत्तेजन तसेच मार्गदर्शन मिळत असे.
आदर्श व देवदुर्लभ कार्यकर्ता !!
भावपुर्ण श्रध्दांजली !!!
अरविंद देशपांडे (पालमकर) म्हणाले…

ते १९७४ चे साल असेल, त्यावेळेस संघाचे जिल्हा प्रचारक म्हणून स्व. श्री जनुभाऊ रानडे होते. मधु ला घेऊन माझ्याकडे आले आणि सांगितलं की आ.भा.वि.प. च्या कामामध्ये जोडून घे. बस मग काय ! दोस्ती झाली. त्यावेळचा एक प्रसंग आठवतो परभणी बसस्टँड शेजारी हरिनाम रिमांड होम होते. तेथे श्री राठोड नावांचे अधिकारी काम करत होते. मि त्यांची भेट घेतली व एक प्रस्ताव मांडला. दर रविवारी एक तासभर आम्ही आपल्या रिमांड होम मधील मुलांना कवायती, गोष्टी , गाणी शिकवू त्यास श्री राठोड यांनी आनंदाने संमती दिली. अश्या प्रकारे आमची साप्ताहिक शाखा चालू झाली. मी, मधु आणि अरुण देशपांडे कवायती ,गोष्टी आणि गाणी शिकवू लागलो. एक-दोन रविवार नंतर याचा चांगला परिणाम दिसू लागला. गुन्हेगारी वृत्तीची ही मुले स्वच्छ स्नान करून शाखेत स्वतः बसून गोष्टी, गाणी शिकू लागली. आम्हची व प्रत्येक रविवारची वाट बघू लागले. आम्हचा उत्साह देखील वाढला. त्यावेळेस परभणीत महिला मंडळाचे काम स्व.डॉ. मंजिरी चौधरी पाहत असत. आम्ही तिथे त्यांना भेटण्यास गेलो. त्यांना या ५० मुलांना दसऱ्या निमित्य कपडे करणार का ? असा प्रस्ताव मांडला त्यांनी तो आनंदाने स्वीकारला. या मुलांना नवीन कपडे दसऱ्याचा निमित्याने भेट म्हणून दिले. या कार्यक्रमाला शहरातील मान्यवरांना निमंत्रित केले होते व श्री कृष्णा माथेकर यांचे बौद्धिक ठेवले होते. याचा प्रभाव मुलांनवर झाला ते एकमेकांना सहकार्य करू लागले. शिवाजी कॉलेज समोर श्रीमती कडूबाई देशमुख राहत होत्या. त्या मोठ्या धार्मिक आणि दानशूर होत्या. आम्ही त्यांना भेटलो व या मुलांना गोड जेवण देण्याची विनंती केली ती त्यांनी मान्य करून गोडाच जेवण दिले.
श्रावणाचा महिना होता. मधू तेव्हा देशमुख गल्लीत रूम करून राहत असे. त्याचा लक्षात आले की, अनेक मुले त्या परिसरात हॉस्टेल मध्ये राहत होते. मधुच्या डोक्यात एक कल्पना आली की या हॉस्टेल मध्ये श्रावणा निमित्याने श्रीसत्यनारायणाची पूजा करायची या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याची संपूर्ण जबाबदारी अर्थात मधू ने घेतली होती.
७८ साली मधु B.Sc. पास झाला व मधु पुढील शिक्षणासाठी संभाजीनगरला गेला. त्यावेळी माझा एक मित्र श्री चौधरी टेलिफोन ऑफिस मध्ये काम करायचे त्यांनी मला एक जाहिरात दाखवली मी ती मधू ला दाखवली. या साठी पात्रता B.Sc. Physics अशी होती. मधुने त्या साठी अर्ज केला पुढे त्याची परीक्षा झाली व मधु पास झाला. अश्या प्रकारे टेलिफोन खात्यात Repeater Station Assistant म्हणून नियुक्त झाला. मग परिषदेचे जबाबदारी त्यानंतर संघाची जबाबदारी , संघ कार्यवाह , प्रांत कार्यवाह , प्रांत सह संघचालक ते देवगिरी प्रांत संघचालक असा प्रवास एका भोगावं सारख्या छोट्या गावातील मधुने लीलया सर केला .
एक ग्रामीण भागातील आलेला तरुण संघचालक पदा पर्यंत केवळ संघातच निर्माण होऊ शकतो. मी माझा मित्र श्री गुलाब राठी (जिंतूरचे आमदार) यांना जिंतुरला भेटण्यास गेलो असता आम्हाला भोगावला मधुच्या घरी जाण्याचा पण योग आला होता. एक साधा कार्यकर्ता आपल्या कर्तुत्वाने देवगिरी प्रांत संघ चालक पदा पर्यंत जाऊ शकतो याचं मधु एक आदर्श उदाहरण.
अश्या माझा प्रिय मित्र स्व. मधुकर (दाजी) जाधव यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! ओम शांती.

अरविंद देशपांडे (पालमकर), डोंबिवली, मुंबई.
सेवावर्धिणी, महाराष्ट्र संस्थापक कार्यवाह,
रा.स्व.संघ मुंबई महानगर, कार्यालय प्रमुख,
आ.भा.वि.प आणिबानीपूर्व मराठवाडा विद्यार्थी प्रमुख,
जनकल्याण समिति महाराष्ट्र प्रांत कार्यकारीणी सदस्य
व पुर्वांचल विकास विभाग पालक
फोन नं. - 9765406387


Unknown म्हणाले…
दाजी,
असे वाटते की कालच भेटलो दाजींना.
ब-याचदा घरी येऊन गेले, अत्यंत हसरा चेहरा, बोलके डोळे, मीत भाषी, स्मीत हास्य, बोलण्यात कमालीची सहजता, बोलायला लागले की ऐकत रहावं असं बोलणं ......
आईच्या पंच्चहत्तरीच्या कार्याक्रमास आवर्जून येऊन गेले घरातील सर्वांना खूप आनंद वाटला, भेट झाली की घरातील सगळ्यांची नावानिशी चौकशी, कार्यकर्ता, पालक म्हणून आईसारखे ममत्वं, पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम ......
किती आणि काय म्हणून लिहावे दाजींबद्दल .......
दाजी नाहीत यावर विश्वासच बसत नाही
वर लिहिल्याप्रमाणे खरंच असं वाटतं की आत्ताच तर भेटलो दाजिंना .........

संघ स्वभावे सहज जगावे .......
Prakash Kulkarni म्हणाले…
जुन २०१५ हळवद, गुजरात येथील सं.शि. वर्गात आपले बौध्दिक अजुन डोक्यात आहे, तत्कालीन जि.प्रचारक राजेशजी तुमच्या मुळे मा.दाजींचे चरण स्पर्श आमच्या घरी लागलें,मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो,मौन नि: शब्द श्रध्दांजली ����