जंगल सत्याग्रह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

@दीपक राठोड

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या सर्व प्रयत्नांना डॉ.हेडगेवार यांचा थेट पाठिंबा होता,  त्यामुळेच त्यांनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला. फक्त उपदेश नाही तर प्रत्यक्ष कृती हे त्यांचे वैशिष्ट्य होते. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जंगल सत्याग्रह मध्ये भाग घेतला होता.  2 जून 1930 रोजी संघाचे सरसेनापती मार्तंड परशुराम जोग यांची मध्य प्रांतातील युद्ध विभागात 'असिस्टंट कमांडर' म्हणून नियुक्ती करण्यात आली. 
 8 ऑगस्ट 1930 रोजी मार्तंडराव जोग यांना युद्ध मंडळाचे स्वयंसेवक प्रमुख करण्यात आले.  13 सप्टेंबर 1930 रोजी एम्प्रेस मिलसमोर धरणे आंदोलन केल्याबद्दल मार्थंडराव जोग यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्याच्यासोबत भास्कर बडकस नावाच्या संघ स्वयंसेवकालाही कैद करण्यात आले.  त्यांना प्रथम नागपूर आणि नंतर रायपूर तुरुंगात ठेवण्यात आले. ७ जानेवारी १९३१ रोजी ते तुरुंगातून बाहेर आले.  हेडगेवार यांच्या गटात प्रांत काँग्रेस कमिटीचे सचिव तथा वर्धा जिल्हा संघाचे अध्यक्ष हरि कृष्ण उर्फ आप्पाजी जोशी, सालोडफकीरचे संघचालक त्र्यंबकराव कृष्णराव देशपांडे आणि आर्वी (जिल्हा वर्धा)चे संघचालक नारायण गोपाळ उपाख्य नानाजी देशपांडे यांचा समावेश होता.  यापैकी प्रत्येकाला चार महिने कारावासाची शिक्षा झाली.  नानाजी देशपांडे यांच्या जागी नियुक्त झालेले आर्वीचे संघचालक डॉ. मोरेश्वर गणेश आपटे यांनाही २७ ऑगस्ट १९३० रोजी जंगल सत्याग्रहासाठी तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांच्यासोबत वामन हरी मुंजे नावाचे स्वयंसेवक होते. यासोबतच शेकडो स्वयंसेवकांनी जंगल सत्याग्रहात सहभाग घेतला होता.

जगलं सत्याग्रहचा संघ वर प्रभाव.
2 ऑक्टोबर 1930 विजयादशमी दिवशी संघ स्वयंसेवकांनी नागपूर कारागृहात कैदी असलेले मार्तंडराव जोग तथा दुसरे कैदी काँग्रेस नेते मोरोपंत अभ्यंकर यांच्या घरारासमोर मुख करून मानवंदना दिली. 1 ऑगस्ट ला लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी सरसंघचालक डॉ डॉ परांजपे यांच्या उपस्थितीत झाली.

23 मार्च, 1931 ला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली त्याच दरम्यान पोलिसांची हत्या प्रकरणात 13 जानेवारी 1931 ला चार देशभक्तांना फाशी देण्यात आली  दोन्ही घटनांमध्ये हुतात्म्यांना लष्करी मानवंदना दिल्यानंतर संघाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. 26 जानेवारी 1931 ला स्वातंत्र्य दिन घोषित करण्यात तेव्हा 55 स्वयंसेवक काँग्रेसच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. 6 फेब्रुवारी 1931 रोजी मोतीलाल नेहरूंच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी संघ कार्याला सुट्टी देण्यात आली.

डॉ हेडगेवार तुरुंगात असताना कोणत्याही निर्देशचे वाट न बघता संघ स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने राष्ट्र निष्ठा ठेऊन आपले कर्तव्य पार पाडले, जे डॉ हेडगेवार यांना अपेक्षित होत त्या मार्गाने स्वयंसेवक चालले, आपली भूमिका पार पाडली. संघ म्हणजे वेगळं काही नाही संपूर्ण समाजच एक संघटन. हिंदू समाजाशी एकरूपता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या