Fact Check| हरेगाव दलीत तरुण मारहाण प्रकरणी विवेक विचार मंचकडून पीडितांची भेट; सत्यता समजून घेण्याचा प्रयत्न

दिनांक २५ ऑगस्ट रोजी नगर जिल्ह्यातील हरेगाव ता.श्रीरामपूर येथे चार तरुणांना कबुतर व शेळी चोरल्याच्या कारणावरून जातीय मानसिकतेतून अमानुष मारहाण करण्यात आली व जातीवाचक शिवीगाळ करून अवमानास्पद वागणूक देऊन झाडाला टांगून मारहाण करण्यात आली असे सांगितले जात आहे. या प्रकरणी विवेक विचार मंच टीम ने पीडित कुटुंब व तरुणांची भेट घेतली. या घटनेची माहिती जाणून घेतली.


पिडीत आणि आरोपींची माहिती घेतली असता या घटनेत चार पीडित तरुणांच्या मध्ये तीन जण अनुसूचित जातीतील आहेत तर एक पीडित तथाकथित उच्चवर्णीय समाजातील आहे. सात आरोपींमध्ये तथाकथित उच्चवर्णीय, दोन अनुसूचित जातीतील तर अन्य दोन जन इतर मागासवर्ग समाजातील आहेत. पिडीत तरुणांमध्ये एक जण तथाकथित उच्चवर्णीय समाजाचा तर आरोपींमध्ये दोन जन अनुसूचित जातीचे असल्यामुळे ही घटना खरंच जातीय मानसिकतेतून झालीय का, हा प्रश्न पडतो. 


तसेच हरेगावात दलित समाजात मोठ्या प्रमाणात ख्रिचन धर्मांतरण झालेले असल्याची माहिती मिळाली. पिडीत आणि आरोपी मध्ये सुद्धा एक-एक जण व त्यांचे कुटुंबीय ख्रिश्चन धर्माचा अवलंब करतात असे कळाले. पोलिसांनी मुख्य आरोपींसह सहा जणांना अटक केली आहे. एक फरार आहे.  

पीडित तरुणाचा भाऊ अक्षय माघाडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, मुख्य आरोपी गलांडे आणि बोडखे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. गुंडगिरी करणे, दहशत माजवणे, लोकांच्या जमिनी बळकावणे असे कामे ते करतात. गावात चांगले सामाजिक वातावरण आहे, हरेगावतील सर्वच ग्रामस्थांना या गुंडांचा त्रास होत असतो, असेही त्यांनी सांगितले.

गावगुंडांच्या तावडीतून या पीडित मुलांना वाचवणारे मोहन खरात यांचीही भेट घेतली. त्यांनी घटनेची माहिती सांगितली. अशा पद्धतीने मारहाण होत आहे कळल्यावर खरात यांनी घटनास्थळी जावून मुलांना सोडविल्याचे सांगितले.

श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात जावून पिडीत तरुणांची भेट घेतली. सर्वांशी संवाद साधला. सर्वांची तब्येत आता ठीक आहे. थोडी भीती चेहऱ्यावर होती व सांगत होते की, आम्हाला मुख्य आरोपी भविष्यात मारहाण करू शकतात. 


विवेक विचार मंचची भूमिका:

एकूणच गावात दहशत रहावी ही मानसिकता, गुंडगिरी आणि विकृत मानसिकतेतून सदर अमानवीय घटना घडली असे दिसते. अशा घटनांमुळे सामाजिक वातावरण गढूळ होताना दिसते. अशा संवेदनशील घटनांच्या मध्ये कोणीही राजकारण करून नये. या घटनांचे कोणीही समर्थन करत नाही. 

वाईट प्रवृत्तीला जातीय रंग देऊ नये. काही घटक हेतुपुरस्सर जातीयवादी, विद्वेषी व चिथावणीखोर भाष्य करत आहे, पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. 

समाजात सामाजिक बंधुभाव जपला गेला पाहिजे. पोलिसांनी योग्य तपास करत आरोपींना कठोर शासन होईल असे पुरावे न्यायालयात सादर करावे तसेच, पिडीत कुटुंबांना संरक्षण द्यावे अशी मागणी विवेक विचार मंच द्वारे करण्यात आली आहे. 

या संदर्भात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. या भेटीमध्ये विवेक विचार मंचचे सागर शिंदे, अरुण कराड, बेबीताई कांबळे व निखिल आठवले उपस्थित होते. 


@ विश्व संवाद केंद्र, देवगिरी




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या