डॉ. आनंदीबाई जोशी पुण्यस्मरण..

*डॉ. आनंदीबाई जोशी* म्हणजे भारतातील महिला कल्याण व शिक्षण क्षेत्रातील एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व. पती गोपाळराव यांचे उत्तम सहकार्य व प्रखर ध्येयनिष्ठ असल्याने डॉ. आनंदीबाई भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. 

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी *ख्रिस्ती धर्म* स्वीकारण्याची अट त्यांनी मोडीत काढली. मी माझा हिंदू धर्म आणि संस्कृती कदापि त्यागणार नाही, असे सांगून त्यांनी वैद्यकीय शिक्षणातील वाईट प्रथा मोडीत काढली.

१८८३मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 'विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया'मध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. तथापि कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी.ची पदवी मिळाली.

एम.डी.साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले. भारतात येऊन महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या अल्पायुषी ठरल्या, पण कोट्यवधी भारतीय महिलांसाठी प्रेरणास्थान बनून गेल्या. 

*डॉ. आनंदीबाई यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.*

©️vskdevgiri

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या