21 जून। जागतिक योग दिन विशेष

पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 रोजी संपूर्ण विश्वात अतिशय आनंदाने आणि उल्हसित मनाने साजरा केला गेला, आणि नक्कीच जागतिक पटलावर एक सकारात्मक बदल घडून आलेला दिसला.

योग एकमेव असा प्रभावशाली प्रकार आहे की, त्याच्या माध्यमातून केवळ शरीरचं नाही तर मन,मेंदू आणि आपला आत्मा यांच्याशी संतुलन निर्माण होऊन तादात्म्य निर्माण होते! तसेच योग हा केवळ शारीरिक व्याधी नाही तर मानसिक आजारांमध्ये देखील योग्य प्रकारे मदत करू शकतो.

 #योग् या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधल्या "युज" या शब्दापासून झालेले आहे याचा अर्थ असा होतो की आत्मा हा सार्वभौम चेतनेचा स्वरूप आहे आणि जेव्हा या आत्म्याचा त्या विश्वात्मक चेतनेशी (Universal Counsiosness)चा संपर्क होतो - ती अवस्था म्हणजेच योग!

वैदिक संहितेनुसार प्राचीन काळामध्ये अर्थात वेदामध्येही योगक्रियांचा उल्लेख आढळतो. सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा योग करणाऱ्या मुर्त्या सापडल्या आहेत, हिंदू धर्मामध्ये साधू, संन्यासी व योगी यांच्याद्वारे या योगीक सभ्यतेच्या अभ्यासाची सुरुवात सामान्य जनांमध्ये झाली आणि सामान्य लोकांमध्ये याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला.

प्रामुख्याने पतंजली मुनी हे या योग दर्शनाचे संस्थापक मानले जातात पतंजली मुनींनी योगाचे खालील आठ सूत्र सांगितलेले आहेत, यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी अशा आठ अवस्था सांगितलेल्या आहेत !

यामध्ये खलील तत्वांचा समावेश होतो.

१. यम - स्वार्थाचा त्याग करून विषयातून मन काढणे
२. नियम - जगण्याच्या योग्य त्या चौकटीत/सवयीत राहणे
३. आसन - यात आसनांचे विविध प्रकार येतात
४. प्राणायम - यात प्रामुख्याने श्वासोच्छवासावर नियंत्रण मिळवून प्राणशक्तीचा संचार शरीरात योग्य प्रकारे केला जातो.
५. प्रत्याहार - मन विकेंद्रित करणाऱ्या गोष्टी लांब ठेवणे
६. धारणा - मनाची एकाग्रता साधून, त्याला एका ठिकानक स्थिर करणे.
७. ध्यान - स्थिर मनाच्या बळावर अपेक्षित गोष्टींची साधना करणे
८. समाधी - जड व चैत्यनाचा अभेद साधने - अर्थात Universal Countiousness पर्यंत अवस्था जाणे.

तसेच भगवद्गीतेमध्ये देखील भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग, भक्तियोग व ज्ञान योग सांगताना समस्त मानव जातीला आजच्या भाषेत #Lifestyle_management, #Critical_thinking, # Decision_making आणि # stress_buster चे धडे देऊन - आरोग्यमय जीवन जगण्याचा #मंत्रही देऊन ठेवला आहे !

आज योग हा व्यायामप्रकार - आधुनिक जीवनशैली मध्ये आपले आरोग्य व्यवस्थित राहावे या कारणामुळे केला जात असला तरी,  त्याचा जेव्हा 2013 साली #योगा_डे झाला - तेव्हांच त्याचे नैमित्तिक स्वरूप जाऊन -  एक तो एक साजरा करण्याचा एक दिवसीय उत्सव झाला की काय अशी शंका निर्माण व्हायला वाव निर्माण झाला होता आणि अशी परिस्थिती आज आसपास पाहिल्यावर निश्चितचं निर्माण झाली आहे, असं सखेद म्हणावसं वाटतं - कारण आपल्या लोकांना आपलंच सांस्कृतिक ज्ञान व वारसा जोपर्यंत पाश्चिमात्य लोकं आकर्षक वेष्टनात घालून आणि जबरदस्त मार्केटिंग फंडे आपल्या वापरून आपल्यालाचं परत करीत नाहीत, तोवर आपल्याला त्याचं महत्वही अधोरेखित झालेलं नसतं. 

तरी सकारात्मक बाब म्हणजे आज अनेक सन्मानित भारतीय योगशिक्षक नियमितपणे अनेकोनेक योगअभ्यासक घडवत आहेत, त्याकामी अहोरात्र धपडत आहेतच. या लॉकडाऊनच्या काळातही अनेक योग-शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत - या नियमित साधनेत खंड पडू दिलेला नाही ! हा लेख त्या सर्व योग-शिक्षकांना समर्पित !

✍️ वरद मुठाळ 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या