अष्टांगिक मार्गाचा अचूक अवलंब केल्यास कोरोनासारख्या रोगांपासून मुक्ती मिळू शकते - पू. भदंत सुदत्त भन्तेजी

देवगिरी। भगवान बुद्धांचा अष्टांगिक मार्ग आणि करना मुक्ती या विषयावर बोलताना पूजनीय भदंत सुदत्त भन्तेजी म्हणाले, माणसाचे मन जर अविकारी असेल, प्रांजळ असेल, चांगले असेल तर बाह्य रोगापासून त्याचे रक्षण होऊ शकते. मन अस्वस्थ असल्यास ते कोणालाही स्वस्त होऊ देत नाही. त्यामुळे आपले मन स्थिर व अविकारी असायला हवे. त्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतो. 

ते पुढे म्हणाले, ईश्वराला काशी मक्का मदिना याठिकाणी शोधण्यापेक्षा आपल्या अंतर्मनात शोधले पाहिजे. वाईट कर्म केल्यास तुमच्या वाटेल दुःख येते, त्यामुळे आपले कर्म चांगले हवे. 2600 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी कार्यकारण भाव सांगितला आहे असे त्यांनी सांगितले. 

भगवान बुद्ध यांनी दुःखाचा स्वीकार केला पाहिजे असे सांगताना पाहिले आर्य सत्य सांगितले. याच सोबत दुःख एक नाही, तो दुःखाचा समूह आहे असे सांगून त्यांनी दुःखाला सामोरे जाऊन त्याचा नाश करता येतो सांगितले. 

आर्य सत्य सांगताना भगवान बुद्ध यांनी त्यावरील उपाय देखील सांगितले. त्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात. त्यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक अजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी यांचा समावेश होतो. 

सम्यक दृष्टीमुळे माणसाची शुद्ध बुद्धी म्हणजेच प्रज्ञा जागृत होते. शिलामुळे सदाचार जागृत होतो. सम्यक वाणी समजावून सांगताना पू. भन्तेजी म्हणाले की आपली वाणी चांगली असायला हवी. त्यामध्ये कोणाचा अपमान, निंदा, नालस्ती, टीका नसावी. आपल्याकडून व्यभिचार, दुष्कर्म होऊ नये म्हणून भगवान बुध्दांनी सम्यक कर्म सांगितले आहे. आपली उपजीविका म्हणून आपण वाईट कार्य करत असू, शस्त्र व्यापार, गुन्हेगारी, लूट पाट करू तर ते चुकीचे असून आपली अजीविका सत्कर्मावर आधारित असायला हवी असे त्यांनी सांगितले. 

प्रत्येकाला दुःखापासून मुक्ती हवी असते. आपल्या संस्कृती व पंथाप्रमाणे आपण आचरण जरूर करावे परंतु, दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल त्याने अष्टांगिक मार्गाचा अवलंब जरूर करून पाहायला हवा. आज कोरोनरुपी आलेले संकट देखील दुःख आहे. अष्टांगिक मार्गाचा वापर केला तर यापासून नक्कीच आपली रक्षा होऊ शकते. विकारांपासून मुक्ती मिळेल, असे पू. भन्तेजी म्हणाले. 

भगवान बुद्ध यांनी सांगितलेले अष्टांगिक मार्ग :

१) सम्यक् दृष्टी - निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे. सकारात्मक दृष्टी ठेवणे. 
२) सम्यक् संकल्प - ज्यातून सर्वांचे कल्याण होईल, वाईट होणार नाही असा योग्य निर्धार, विचार.
३) सम्यक् वाचा - वाईट न चिंतणारी करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा ठेवण्याचा प्रयत्न करणे.
४) सम्यक् कर्मान्त - आपला संकल्प लक्षात ठेवून उत्तम कर्म करत राहणे.
५) सम्यक् आजीविका - वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
६) सम्यक् व्यायाम - आपला संकल्प सिद्धी साठी अविरत मेहनत व प्रयत्न करणे.
७) सम्यक् स्मृती - तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून मनाला जागृत ठेवणे.
८) सम्यक् समाधी - कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे. 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या