भारत - चीन का समोरासमोर आले?

चीन समजून घेण्यासाठी भारतीय तरुणांना हे चांगले निमित्त आहे. मी आपल्याला स्पष्टीकरण देऊ शकतो की कशाप्रकारे कम्युनिस्ट चीनने भारतासोबत सीमा प्रस्थापित केली जी 1949 मध्ये अस्तित्वात नव्हती. कुठे दीर्घकाळ चालणारे संवेदनशील केंद्र आहेत? कुठे कुठे संघर्ष होण्यासारखे ठिकाणे आहेत? आणि का भारत - चीन आताच समोरासमोर भिडले?

इतिहासात जर आपण डोकावलो तर भारत - चीन सीमा कधीच अस्तित्वात नव्हती हे लक्षात येते. भारताची सीमा आशियाई पूर्व तुर्कस्तान आणि तिबेटला जुळलेली होती. पिवळ्या रंगातील चित्रामध्ये आपण पाहू शकतो. जेव्हा चीन पूर्णपणे कम्युनिस्ट सत्तेखाली आलेला होता. समाजवाद्यांना त्यांनी तैवान येथे हलविले होते. तिबेट, झिंजियांग आणि अन्य भाग बळकावलेले होते. 

चीनमध्ये 'हैहे' आणि 'टेंगचोंग' असे दोन भाग आहेत. जर आपण या भागांना विभागणारी काल्पनिक रेखा काढली, तर ती आजच्या चीनला दोन निम्म्या भागात स्पष्टपणे विभागते. पूर्वेकडील भागात 94% चिनी लोकसंख्या आहे. हाच इतिहासातील मूळचा चीन असून पश्चिमेकडील भाग हा बळकावलेला आहे. 

चीन कश्याप्रकारे भारतातील प्रदेशावर आपला हक्क सांगतो, हे हा नकाशा दर्शवतो. चीनचा दावा आहे की लडाखमधील अक्साई चीन, शक्सघम व्हॅली, उत्तराखंडचा काही भाग आणि संपूर्ण अरुणाचल प्रदेश हा भाग चीनचा आहे. त्यांचा हेतू स्पष्ट आहे. ह्या भागावर कब्जा मिळवण्यासाठी त्यांची धडपड आहे. तुमचे थोडे जरी दुर्लक्ष  झाले, तर तुम्ही सारे गमावलेले असू शकते. 

विसाव्या शतकात चीनने ज्या प्रकारे बहुसंख्य बौद्ध असलेल्या तिबेटला बळकावले ही तर सर्वात मोठी शोकांतिका आहे. तिबेट हा भारताचा हजारो वर्षापासून सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक सुसंबंध असलेला शेजारी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तिबेट हा आशिया खंडातील 9 मोठ्या नद्यांना जन्म देणारा प्रदेश आहे. कम्युनिस्टांनी या पाण्यावरच आपला कब्जा केलेला आहे. 

असे कोणते ठिकाणं आहेत जिथे चीन भारताशी युद्ध करू शकतो?

-डीबीओ आणि गलवान व्हॅली
-पँगाँग तलाव
-सिंधू नदी उगमस्थान जवळील भाग
-दक्षिण केदारनाथ, उत्तराखंड
-सिक्कीम भूतान जंक्शन
-तवांग
-सिअंग व्हॅली
-वलॉंग

शेवटचे तीन ठिकाणं अरुणाचल प्रदेशातील आहेत. 

भारत - चीन आताच का समोरासमोर आले?

चीनला असे वाटते की भारताने 2022 पर्यंत भारताने सर्व 61 सीमाभागातील रस्ते बांधकाम पूर्ण करून टाकले तर त्यांना भारतातील प्रदेश बळकावता येणार नाही. भारताने लडाख मध्ये सर्वात मोठा पूल देखील बांधला आहे. पँगाँगच्या पश्चिमेकडे (Beyond finger 6) चीन त्याचमुळे दबाव टाकत आहे आणि गलवानवरील अतिक्रमण हे त्याचमुळे होत आहे. 

काय होईल, जर भारत - चीन दरम्यान लडाखमध्ये युद्ध झाले तर?

भारताचा सर्वात मोठा फायदा हा आहे की भारताची सप्लाय लाईन ही केवळ 200 ते 400 किलोमीटरची आहे. मूळ चीनपासून चीनची सप्लाय लाईन मात्र 1500 ते 2500 किलोमीटर इतकी लांब आहे. या भागात भारताच्या वायुदलास अनुकूल वातावरण असून चीनला तिबेटमध्ये मालवाहू व वजनदार विमाने उतरवण्यासाठी मोठ्या अडचणी आहेत.

चीनने गलवान व्हॅलीवर केलेला अटॅक हा भूतान आणि नेपाळसाठी सूचक इशारा आहे. नेपाळी लोकांनी माओ झाडोंग ने सांगितलेली "पाच बोटं (Five Fingers)" ही नेहरू हिंदी चिनी भाई भाई करण्यात गुंतलेले असताना केलेली संकल्पना लक्षात ठेवली पाहिजे. नेपाळ सध्या त्याच परिस्थितीतून जात आहे. 

Five Fingers बद्दल काय म्हंटले होते माओ झाडोंगने? 

चिनमध्ये कम्युनिस्ट क्रांती आणणारा नेता
 माओ झाडोंग 1950 मध्ये बीजिंग येथून तिबेट आणि हिमालयविषयी म्हणतो, शिझांग (तिबेट) हा चीनच्या उजव्या हाताचा तळवा आहे. तो त्याच्या पाच बोटांपासून (लडाख, नेपाळ, सिक्कीम, भूतान आणि अरुणाचल प्रदेश) वेगळा झालेला आहे. या भागावर आज भारताचे नियंत्रण आहे. त्यामुळे या पाच प्रदेशांना पुन्हा शिझांगला (तिबेटला) कसं जोडायचं ही चीनची जबाबदारी आहे. 


साभार - पांचजन्य 
लेखक - किरण कुमार के एस
/अनुवादित लेख

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी 


टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

Sharad Patil म्हणाले…
माहितीपूर्ण लेख.
अनामित म्हणाले…
खूप छान माहिती आहे..
Unknown म्हणाले…
खूप छान
Unknown म्हणाले…
आपण जनतेला जागृत केले ही काळाची गरज.ते कार्य आपण पार पाडल्या बाबत धन्यवाद