देवगिरी। निसर्गाशी एकरूप होऊन राहणं हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हे आपल्या पूर्वापारपासून चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरा, लोकसाहित्य, कला आणि आपण भारतीयांचे दैनंदिन जीवन ह्यातुन दिसून येते. परंतु तरीही गेल्या काही वर्षात निसर्गाची मोठी हानी होत असल्याचे आपल्या लक्षात येत आहे. म्हणूनच 'पर्यावरण संरक्षण गतीविधी' आणि 'हिंदू अध्यात्मिक व सेवा फाऊंडेशन' या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून देशभरात 'प्रकृती वंदन' हा आगळा वेगळा कार्यक्रम साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी रा. स्व. संघाचे सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत स्वतः उपस्थित राहणार आहे.
प्रकृती वंदन हा कार्यक्रम देशभरात घरोघरी ३० ऑगस्ट, सकाळी १० ते ११ या वेळेत साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे फेसबुक व यु ट्यूब वर ऑनलाईन प्रक्षेपणही करण्यात येणार असून संत सज्जनांच्या वेदपठणासोबत आपल्या राहत्या घरी किंवा निवासस्थानीच तुळशी वृंदावन किंवा वृक्षाच्या रोपट्याचे पूजन करण्यात येईल, असे स्वरूप आहे. नंतर पू. सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत १० मिनिट उद्बोधन करणार आहेत. एका लिंक द्वारे देशभरात २४ राज्यातील १ कोटी लोक या कार्यक्रमात नोंदणी करून सहभागी होत आहेत. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांनी नोंदणी करून या कार्यक्रमात सहभागी व्हावे, जेणेकरून पर्यावरण, वने व जीवसृष्टी संरक्षण हेतू एक मोठे पाऊल टाकता येईल असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
काळानुरूप मानवाच्या जीवन शैलीत झालेले बदल, नवीन लागलेले शोध, तंत्रज्ञान यामुळे कळत नकळत निसर्गाची हानी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. देशातील कित्येक संघटना, सरकार, प्रशासन, शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था असे विविध घटक यासाठी आजवर प्रयत्न करत आले आहे. समाजातील विविध समुदायांचे निसर्गाशी एकरूप होऊन राहणे, त्यांची जैवसृष्टीतील विविध घटकांवर असलेली श्रद्धा, निसर्गावर अवलंबून असलेले जीवन आणि हे सगळं असतानाच त्याबरोबरीने निसर्गाचे जतन आणि संवर्धन हे विविध पुरातन परंपरांमधून दिसून येते. 'प्रकृती वंदन' म्हणजे हा तसाच कार्यक्रम आहे.
आपली नोंदणी करण्यासाठी लिंक👇
https://forms.gle/d1QA7HkvUDFchYSm9
लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी लिंक 👇
Facebook :
https://www.facebook.com/devgirivsk/
YouTube:
https://www.youtube.com/channel/UC4kV0lvxJQA0c08qBpx56Bw
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या