समग्र क्रांतीचे अग्रदूत- योगेश्वर श्रीकृष्ण

@नरेंद्र सेहगल

अधर्मी, आतंकवादी, समाजविघातक देशद्रोही आणि भ्रष्टाचारी यांना समाप्त करण्याच्या उद्देशाने जन्म घेतलेल्या योगेश्वर श्रीकृष्ण शेवटपर्यंत आपल्या निर्धारित उद्देशासाठी सक्रिय राहिले. श्रीकृष्णाच्या जीवनातील समस्त लीला व कार्य प्रत्येक मानवासाठी प्रेरणादायी व अद्भुत प्रसंग आहेत. श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवन हे कर्म क्षेत्रांमध्ये उतरून समाज आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी निरंतर संघर्षरत राहण्याचे अतुलनीय उदाहरण आहे. त्यांचे 'आदर्श' आणि 'सिद्धांत' आपल्या व्यावहारिक जीवनात उतरवण्याचे दिशानिर्देश आहेत.


योगेश्वर श्रीकृष्णाची जीवनयात्रा कंसाच्या कारावासात सुरू होते. तुरूंगामध्ये यातना सहन करत वासुदेव आणि देवकी च्या पोटी जन्म घेऊन नंतर तेथील सर्व बंधने तोडून त्यांनी आतंकवाद आणि अधर्मासोबत युद्ध करण्याचा संकेत देत शंखनाद केला. तुरुंगातून मुक्त होऊन नंदग्राम येथे सुरक्षित पोहोचण्याच्या वार्तेमुळे अत्याचारी शासक कंस आणि त्याचे सहाय्यक सर्व राक्षस राजे भयभीत झाले. नंदिग्राम येथे माता यशोदेच्या अंगाखांद्यावर, कडेवर खेळत आणि आपल्या बाल मित्रांसोबत श्रीकृष्णाने ज्या सहसिक लीला केल्या त्यामधून समाजसेवा, सामाजिक समरसता, धर्मरक्षण, महिला सशक्तिकरण आणि संघटन शक्ती याचे दर्शन होते.

अन्यायाविरुद्ध संघटित सशस्त्र प्रतिकार

श्रीकृष्णाने आपल्या बाल मित्रांचे संघटन करून 'दह्याची मटकी फोडणे' हा भांडवलशाही, हुकुमशाहीच्या विरुद्ध क्रांतीचा संकेत दिला आहे. शेतकरी, मजूर यांच्या द्वारा मेहनतीने कमावलेले 'धन' म्हणजे 'दह्याचे मडके' आहे, जे कंसासारख्या हुकूमशहाच्या घरामध्ये जात होते. कृष्णाची बाल सेना त्याला प्रतिकार करत. ग्राम वासियांना ते धन वितरित करण्याच्या प्रथेला त्यांनी जन्म दिला. म्हणूनच शेतकऱ्यांच्या माता-भगिनी, गोपिका श्रीकृष्णाच्या या कार्याला सदैव प्रेमपूर्वक स्वीकृत करी. बाळकृष्णाला याच ग्रामवासीयांनी 'माखनचोर' असे म्हणून प्रेम व आशीर्वाद सुद्धा दिले आहेत.


जेव्हा पूर्ण प्रदेशात मुसळधार पाऊस झाल्यामुळे घर-परिवारांवर संकट आले, तेव्हा बाळकृष्णने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वताला उचलून धरले व व सर्व प्राणिमात्रांना शरण दिले. इंद्र देवतेच्या प्रकोपापासून समाजाला सुरक्षित करून श्रीकृष्णाने हा संदेश दिला, की एकाच नेतृत्वात आपण संघटित झालो, तर प्रत्येक संकटापासून आपल्याला उपाय मिळू शकतो. सामाजिक सुरक्षेचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. अश्याप्रकारे कृष्णाने आपल्या बाल सवंगड्यांनाही संघटनेच्या माध्यमातून अनुशासन महत्व समजवले.


बाळकृष्ण श्रीकृष्णाने आपल्या मित्रांना सैनिकी प्रशिक्षण, मल्लयुद्ध, गोपनीयता आणि अन्यायाविरुद्ध सशक्त प्रतिकार करण्याचे प्रशिक्षण दिले. परिणामस्वरुप श्रीकृष्णाच्या नेतृत्वात याच सैनिकांनी कंस, शिशुपाल, पूतना यासारख्या राक्षशी हुकूमशहांना ठार करून त्यांचा वध करून यश प्राप्ती केली. सर्वसामान्य नागरिकांचे शोषण करणाऱ्या अत्याचारी शासक आणि सामाजिक अराजक तत्त्वांना समाप्त करण्यासाठी श्रीकृष्णाने सामाजिक भेदभावाला समाप्त करण्याची आवश्यकता असल्याचा मार्ग प्रशस्त केला.


गोपिकांसोबत रासलीला करून अध्यात्मिक आधारावर महिला सशक्तिकरण आणि मातृशक्ती यासंदर्भात समजून घेतले पाहिजे. गोपिकांच्या, अर्थात महिला संघटनेच्या नेतृत्वामध्ये त्यांची जिम्मेदारी सांभाळणाऱ्या 'गोपी राधा' हिला शास्त्रांमध्ये 'श्रीकृष्णाची शक्ती' म्हटले गेले आहे. याचा अर्थ खूप सखोल आहे. ईश्वरीय शक्ती असलेल्या श्रीकृष्णाला सुद्धा मातृशक्तीचा आधार घ्यावा लागला. रासलीला तर केवळ नारीशक्ती चे संघटन आणि त्यांना दिशा देण्याचा एक मार्ग मात्र होता. या रासलीलामध्ये जाती, धर्म, क्षेत्र यासाठी कोणतेच स्थान नव्हते. "बेटी बचाव, बेटी पढाव" हा संदेश गोपिकांसोबत रासलीला करताना हा अध्यात्मिक संदेश देणे उद्देश होता.

क्रांतीचा आधार बासरी आणि सुदर्शन चक्र:

आज आपण बघतो की, सैन्यामध्ये सैनिकांचे प्रशिक्षण, अनुशासन, संचलन इत्यादींमध्ये बँडचे खूप योगदान असते. या बँडच्या आवाजाने केवळ सैनिकच नव्हे, तर साधारण नागरिकांच्या मनात सुद्धा उत्साह, निष्ठा, चिकाटी हे भाव जागृत होतात. श्रीकृष्णाच्या बासरीच्या धून मधून समाजाच्या सर्व वर्गांमध्ये मंत्रमुग्ध होऊन एक सूत्रांमध्ये समाविष्ट होण्याचे प्रेरणा मिळत होती. शेतकरी, मजूर बाल वृद्ध महिला शहरवासी आणि ग्रामवासी या सर्वांना संघटित करण्याची शक्ती म्हणजे श्रीकृष्णाची बासरी होती.


------------

-------------

समाज आणि धर्म रक्षणासाठी वेळ आली तेव्हा श्रीकृष्णाने बासरी सोडून सुदर्शन चक्र सुद्धा हाती घेतले होते. महाभारताच्या युद्धाच्या अगोदर श्रीकृष्ण पांडवांचे दूत म्हणून दुर्योधनाकडे गेले होते. त्यांना धर्म शिक्षा देण्याचा हेतू होता. दुर्योधनाच्या दरबारात गेल्यानंतर काहीही करून युद्ध टळावे, यासाठी श्रीकृष्णाने प्रयत्न केला. शांती वार्तेने ही समस्या सुटावी असा युद्धाचा अंतिम मार्ग आहे. श्रीकृष्ण पाच गाव मिळाले तरीही पांडव संतुष्ट होतील या नीतीवर चालत होते. परंतु, "युद्धाविना एक इंच भूमी सुद्धा देणार नाही" असे उत्तर दुर्योधनाने दिल्यामुळे युद्ध अनिवार्य झाले. श्रीकृष्णाने भीष्म पितामह आणि विदुर सारख्या विद्वानांच्या माध्यमातून दुराचारी दुर्योधनाला समजावण्याचे प्रयत्न केले. परंतु त्याच्यावर युद्धाचे भूत बसले होते. या युद्धाच्या विचाराला उतरवण्यासाठी एकच मार्ग होता, तो म्हणजे 'कुरुक्षेत्र युद्धाचे मैदान'!

युद्धाच्या मैदानात कर्मयोगाचा उपदेश:

युद्ध मैदानात श्रीकृष्णाने आपल्या आदर्श राजनीतीचा आणि कूटनीतीचा परिचय दिला. धर्म आणि अधर्माच्या युद्धात अर्जुनाला गीतोपदेश देऊन या माध्यमातून कर्मयोगाचा उपदेश देणे म्हणजे त्यांचे ईश्वरी रूपातील सर्वात महत्त्वपूर्ण कार्य होते. मानवाच्या समस्त कर्माला दिशा देऊन त्याला मोक्षाचा मार्ग दाखवणे म्हणजे गीता गीतेचा उपदेश. हा उपदेश देऊन क्रांतिकारी योगेश्वर श्रीकृष्णाने 'जगद्गुरु' ही भूमिका निभावली आणि आपला पूर्णावतार सार्थक केला. अर्जुनाला प्रचंड निराशेतून आणि नकारात्मकतेतून बाहेर काढून कर्म पथावर मार्गक्रमण करायला लावले आणि गीता उपदेश समस्त जगासमोर ठेवला.


श्रीकृष्णाने अधर्माचा साथ देणाऱ्या भीष्मपितामह सारख्या दिग्गज विद्वानांना तसेच दुर्योधन, अश्वत्थामा आणि कर्ण यासारख्या योद्ध्यांना सुद्धा समाप्त करण्यासाठी संकोच बाळगू दिला नाही. श्रीकृष्णाचे अध्यात्मिक कर्मयोगी जीवन मानवाला सर्व समस्यांपासून समाधान देणारे आहे. जन्माष्टमीच्या पवित्र दिनी त्या राष्ट्रभक्त संस्थांनी श्रीकृष्णाच्या जीवन आणि कार्यपद्धती पासून प्रेरणा घेतली पाहिजे, जो समाजाच्या संघटनेसाठी आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी कार्य करत आहे.

या संघटनांवर सांप्रदायिक, फॅसिस्ट, दंगली घडवणारे, समाजाला तोडणारे असे आरोप होत असतात. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे, की श्रीकृष्णाला सुद्धा चोर, नटखट, छळकूट, रणछोड, खोटारडा इत्यादी दूषणे दिली गेली आहेत. परंतु योगेश्वर श्रीकृष्णाने या सर्व आरोपांना शांतपणे ऐकून घेतले आणि आपल्या निर्धारित उद्देशाच्या सफलतापूर्वक प्राप्तीसाठी प्रयत्न केला. तेव्हाच अधर्मावर धर्माचा विजय झाला आणि असत्य  सत्याच्या हातून पराजित झाले.

"होने लगता है चीर हरण,
तब शंख बजाया जाता है,
बांसुरी फेक वृंदावन में,
सुदर्शन चक्र उठाया जाता है"...

(लेखक वरिष्ठ पत्रकार व स्तंभलेखक आहेत)

मराठी अनुवाद - कल्पेश जोशी

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या