बॉलिवूडमधील 'कालनेमी' ओळखणे गरजेचे!

@ गजानन जगदाळे

हा विषय फार दिवसांपासून (खरेतर अनेक वर्षांपासून) मनात रेंगाळत होता पण त्यावर उघडपणे बोलणे / लिहिणे मला जमत नव्हते. भारतीयांच्या व खासकरून हिंदूंच्या पैशांवर मोठा झालेला बॉलीवूड अभिनेता आमीर खान काल तुर्कीच्या राष्ट्रपतीच्या पत्नीला भेटला त्यामुळे आज त्या गोष्टीवर बोलायला निमित्त मिळाले.

मी २००९- १० ह्या वर्षी इंजिनीयरींगच्या सेकंड यिअर मध्ये असताना आमीर खानचा 'थ्री इडियट्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट फार गाजलाही होता. अनेकांना तो आवडला होता. रट्टा मारून पास होणाऱ्यांपेक्षा खरेखुरे इंजिनियरींग जगणाऱ्या रॕन्चोने सर्वांनाच भुरळ घातली होती. पण मला त्या चित्रपटातील एक गोष्ट खूप प्रखरपणे सलत राहिली. ती म्हणजे आमीर खान व त्याच्या इतर दोन मित्रांची दारू पिण्याची सवय. दारू पिणे हा इंजिनीयरींगच्या मुलांमध्ये एक पॕशनचा भाग मानला जातो. त्यात भर म्हणजे इंजिनीयरींगच्या मुलांवर रॕन्चोने (आमीर खानने) भुरळ घातली. थ्री इडियट्स नंतर इंजिनीयरींगच्या मुलांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण विशेष वाढल्याचे मी त्यावेळेस पाहिले आणि मला त्या चित्रपटाचा हा साईड इफेक्ट प्रकर्षाने लक्षात आला. चित्रपट हे समाजाच्या (विशेष करून बाल व तरुणांच्या) नैतिकतेवर परिणाम करणारे असतात हे मला त्यावेळेस अनुभवाला आले. त्यानंतर दोन वर्षांनी आशिकी-२ ह्या चित्रपटातही असाच एक बेवडा हिरो दाखवण्यात आला होता आणि तो चित्रपट रिलीज झाल्यानंतर बऱ्याच जणांच्या दारू पिण्यात वाढ झाल्याचे मी पाहिले होते. मात्र ही गोष्ट मी उघडपणे कुणाजवळच बोललो नाही. बॉलीवूडच्या माध्यमातून आपल्या देशाची पिढी घडवण्यापेक्षा नासवण्याचे काम अधिक करण्यात आले आहे, हे तथ्य कुणीही नाकारू शकणार नाही.

काल हाच आमीर खान पाकिस्तानचा मित्रदेश असलेल्या तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षाच्या पत्नीला जाऊन भेटला. पुर्वी हा आमीर खान मला भलताच तत्त्वांवर चालणारा व साफ नियत असणारा वाटायचा. मात्र सावाचे रूप घेऊन आपलाच घात करणारे संवचोर आपल्या समाजात असतात याचे अनुभव आपण समाजात डोळसपणे वावरू लागतो तसतसे येऊ लागतात. Incredible India च्या माध्यमातून अतिथीदेवो भवः म्हणणारा आमीर खान मला पुर्वी अत्यंत स्वच्छ मनाचा वाटत असे. त्याने सुरू केलेल्या सत्यमेव जयते मुळे त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला होता. पाणी फाऊंडेशन मुळे तो शेतकऱ्यांचा कैवारीही वाटू लागला.मात्र त्याचा खरा चेहरा तेव्हा समोर आला जेव्हा त्याने त्याला ह्या देशात त्याला असुरक्षित वाटत असल्याचे विधान केले. पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम सुद्धा आमीर खानने २०१९ च्या लोकसभा निवडणूकांच्या आधी राबावला होता आणि आता त्याची अंमलबजावणी कोठेच होताना दिसत नाही, हे लक्षात घ्या. काश्मीरमधून हजारो काश्मीरी हिंदूंचे सामूहिक हत्याकांड झाले तेव्हा ह्या आमीर खानला कधीच असुरक्षित वाटले नाही परंतु २०१४ मध्ये हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आले तेव्हा याला लगेच असुरक्षित वाटू लागले.

तुर्की हा देश पाकिस्तानचा मित्र आणि भारताचा उघड शत्रू आहे. तसा तो पाकिस्तानचा चांगला मित्र आहे. भारत सरकारने मागील वर्षी काश्मीरमधील कलम ३७० व ३५A हटवल्यानंतर ह्याच तुर्कीने उघड उघड याला विरोध केला होता. खरेतर काश्मीर व कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असताना बाहेरील देशांना यात नाक खुपसण्याची काहीही गरज नव्हती. ह्याच तुर्कीने भारत सरकारच्या CAA कायद्यालाही उघड उघड विरोध केला आहे. इतकेच काय पण संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताने जेव्हा पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा समोर आणला तेव्हा याच तुर्कीने पाकिस्तानची पाठराखण केली आहे. भारताविरुद्ध लढण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला अमेरिकेकडून विकत घेतलेली लढाऊ विमाने देखील दिली आहेत. एवढेच नाही तर भारतात इस्लामिक कट्टरतावादी संघटनांना अशांतता पसरवण्यासाठी तुर्की आर्थिक रसद पुरवत असल्याचे वृत्त आहे. तुर्की हा इस्त्रायलचा शत्रू आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू भारत भेटीवर आले होते तेव्हा त्यांनी बॉलीवूडच्या तीन मुख्य कलाकरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तेव्हा हा आमीर खान त्यांना भेटला नव्हता जो आज तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला जाऊन भेटत आहे.

ह्या आमीर खानने बॉलीडमधील सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युवर एक शब्दही उच्चारलेला नाही किंवा त्याच्या गूढ मृत्युची चौकशी सीबीआय कडून व्हावी असेही म्हटले नाही. एरवी भारतात असुरक्षित वाटणाऱ्या आमीर खानला एका बॉलीवूड कलाकाराचा असा गूढ मृत्यु झाल्यानंतर असुरक्षित वाटले नाही हे विशेष.

रामायणात एक प्रसंग येतो. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर मारुती द्रोणागिरी आणण्यासाठी जात असताना कालनेमी नावाचा एक राक्षस साधूचे रूप घेऊन मारुतीच्या मार्गात विघ्न आणतो; मात्र मारुती त्याचे ते छद्मी रूप ओळखतो आणि त्याला मूळ रुपात आणून त्याला ठार करतो.

आपल्या देशात आमीर खान सारखे लोक हे कालनेमीपेक्षा वेगळे नाहीत. पाकीस्तानचे उघड समर्थन करणाऱ्या झाकीर नाईक व शाहरुख खान यांच्यापेक्षा आमीर खान सारखे सभ्यपणाचा व सर्वधर्मसमभावाचा बुरखा पांघरलेले कालनेमी देशासाठी अधिक घातक आहेत.

दोन दिवसांपुर्वीच महेश भटच्या सडक-२ ह्या सडकछाप चित्रपटाच्या ट्रेलरला १ कोटीहून अधिक लोकांना डिसलाईक केल्यानंतर बॉलीवूड मधील ह्या कालनेमींचे धाबे दणाणले आहे. म्हणूनच आता हे कालनेमी त्यांचे मायावी रूप सोडून खऱ्या रूपात प्रकट होत आहेत. आमीर खानने तुर्कीला दिलेली भेट हा त्याचाच एक भाग आहे.

ह्या कालनेमींना दोष देण्यापेक्षा मला जास्त राग नेभळट आणि अज्ञानी हिंदू लोकांचा आहे. कारण एकीकडे हे कालनेमी देशद्रोही कृत्ये करत असताना मुर्ख हिंदू लोक मात्र कोणताही सोशियल अवेअरनेस न ठेवता मनोरंजनाची भूक भागवण्यासाठी ह्या कालनेमींचे खिसे भरून त्यांना मोठे करत असतात. आमीर खानचा मागे दंगल चित्रपट आल्यानंतरही मी तो चित्रपट पाहिला नाही व अजूनही तो चित्रपट मी पाहिलेला नाही. अगदी मोबाईलवर सुद्धा नाही. कारण थ्री इडियट्स मधून आदर्श इंजिनीयरची भूमिका साकारताना आमीर खानने हळूच तरुणांना दारू पिण्याकडे अधिक प्रेरित केल्याचा व गुरुजनांचा अपमान करण्याच्या गोष्टींचा राग माझ्या मनात अजूनही आहे. यानंतर आलेल्या पीके चित्रपटाने तर हिंदूंच्या भावनांवर खूप आघात केले आहेत. यामुळे ह्या खान मार्केटचे कोणतेही चित्रपट बघायचे नाहीत असा निश्चय मी मनोमन केला व तो अंमलातही आणत आहे.

हा सगळा लेखप्रप्रंच करण्याचे कारण म्हणजे ज्यांना अजूनही ह्या कालनेमी लोकांबद्दल माहिती नाही त्यांना ह्या बद्दल कळावे हा उद्देश आहे. फेसबूक / ट्विटर / यूट्यूब हे सोशियल प्लॕटफॉर्म्स आहेत. यांचा उपयोग हा सोशियल अवेअरनेस साठीच व्हायला हवा. हिंदूत्ववादी आणि राष्ट्रवादी लोकांनी कालनेमींचे हे षडयंत्र जास्तीत जास्त उघडे पाडा आणि भारतीय लोकांना जागृत करा. 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या