मुस्लिम कट्टरतावाद्यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई करावी; मुस्लिम राष्ट्रीय मंचची मागणी



संभाजीनगर। भारतासह जगभरात दहशतवाद व कट्टरतावादामुळे सर्वत्र इस्लामविषयी चर्चा होत असताना इस्लामच्या नावाखाली काही कट्टरपंथी मुसलमानांची कट्टरता भयानक रूप घेताना दिसत असून त्यांच्याविरुद्ध राज्य सरकार व केंद्र सरकारने, सर्व राजकिय पक्षांनी तसेच अन्य देशातील शासनाने कठोर पावलं उचलावीत आणि त्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेही करावे अशी मागणी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केली आहे. नुकत्याच घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पदाधिकाऱ्यांचे ऑनलाइन चर्चासत्र घेण्यात आले, त्यात मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफजल यांनी सर्वानुमते या घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

गेल्या काही दिवसात देशात हरियाणातील निकिता तोमर हत्या प्रकरण, मेहबुबा मुफ्ती व शेख अब्दुल्ला यांचे देशविरोधी वक्तव्य, मथुरा येथे मंदिरात नमाज अदा प्रकरण, काश्मीर मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या घडवून आणणे, तसेच फ्रान्समध्ये प्रेषित महंमद यांचे व्यंगचित्र दाखवले म्हणून शिक्षकाची हत्या करणे, विरोधी पक्षांनी राजकारणासाठी कट्टरतावाद्यांना समर्थनच देणे, अश्या घटनांनी देशातील शांतता व सलोखा धोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम राष्ट्रीय मंचाने देशभरातील आपल्या पदाधिकाऱ्यांची तात्काळ ऑनलाइन बैठक घेतली व या विषयांवर चर्चा करण्यात आली. 

या चर्चासत्रात त्यांच्या लक्षात आले की या सर्व घटना कट्टरतेचा विषारी, दानवी व अमानवीय चेहरा प्रस्तुत होतो. मन चिंतीत करणाऱ्या या घटना आहेत. तसेच देशाच्या शांतता व सलोख्यासाठी हानिकारक आहे. कट्टरपंथीयांच्या पुतळ्याचे देशभर दहन करून त्यांचा निषेध व्यक्त केला जाईल, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच देशातील मुसलमानांनी या घटनांचा निषेध करण्यासाठी पूढे यावं आणि इस्लामचा शांती, सौहार्द, बंधुत्वाचा आणि सगळ्यांच्या कल्याणाचा संदेश समाजात पोहचवावा असे आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केले आहे. 

मोहम्मद अफजल, डॉ. शाहिद अख्तर, अबू बकर नकवी, एस. के. मुद्दीन, डॉ. ताहिर, इरफान अली पिरजादे, इस्लाम अब्बास, सय्यद रजा रिजवी, रेशमा हुसेन, एड. शाहीन परवेज, एड. सिराज कुरेशी, मोहम्मद फ़ैज़ खान, बिलाल-उर-रहमान, फरुक अहमद खान, मोहम्मद मजाहिर खान, डॉ. लतीफ़ मगदुम, डॉ. माजिद अली तलिकोटी, मौलाना कौकब मुजतबा, मौलाना सुहैब कासमी, मौलाना इरफान, फातिमा, शब्बीर शाह, नाजनीन अंसारी, नज़मा परवीन, सय्यद फ़ैयाज़ उद्दीन, एम. ए. सत्तार, फारुख खान, ठाकुर राजा रईस, एड. सुबुही खान, आसिफा, नजीर मीर, खुर्शीद राजका, डॉ. इमरान चौधरी, रफ़ीक़, हिदायतुलाह, बदरुद्दीन हलनी, जहीर कुरेशी, सलीम खान पठन, डॉ. अकील अहमद, प्रोफेसर इरतजा करीम, प्रोफेसर ऐनुल हसन, प्रोफेसर फ़ज़लूर रहमान, एड. तनवीर अब्बास, डॉ. शमीम अंसारी, डॉ. एहरार हुसेन, डॉ. अरशद इकबाल, अली दारुवाला आदी पदाधिकारी या चर्चासत्रात उपस्थित होते.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या