संविधानाच्या उद्देशिकेतील पहिले तीन शब्द 'आम्ही भारताचे लोक' म्हणजे कोण?



'आम्ही भारताचे लोक' म्हणजे संविधान निर्मितीच्या काळातील लोक, असा त्याचा अर्थ करायचा का? आज त्या पिढीतील लोक दिवंगत झालेले आहेत. मग आम्ही भारताचे लोक म्हणजे त्या दिवंगत पिढीतील लोक, असा अर्थ करून चालत नाही. आम्ही भारताचे लोक म्हणजे वेदकाळापासून जे लोक या देशात राहत आले आहेत, आज आहेत आणि उद्याही असणार आहेत ते सर्व म्हणजे आम्ही भारताचे लोक.

आम्ही भारताचे लोक याचा दुसरा अर्थ असा होतो की तुम्ही भारतीय म्हणजे काही जीवनमूल्य मानणारे, एका विशिष्ट संस्कृतीचा विकास करणारे, सर्व मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारे, केवळ मानव जातीचा नाही तर सर्व प्राणी सृष्टीशी, वनस्पतीसृष्टीशी भावनिक नाते जोडणारे, नद्यांमध्ये मातेचे रूप बघणारे, वेगवेगळ्या विचारधारा स्वीकारणारे आणि त्यांचा सन्मान करणारे, वेगवेगळे उपासना पंथ स्वीकारणारे व त्यांचा सन्मान करणारे, सत्य एक असून त्याकडे जाणारे मार्ग अनेक आहेत ते सर्व सत्य आहेत असे म्हणणारे म्हणजे आम्ही भारताचे लोक असा त्याचा व्यापक अर्थ होतो.

आपल्या राज्यघटनेची पहिली प्रत हस्तलिखित आहे. प्रेम बिहारी नरेन रायजादा यांनी ते लिहिण्याचे काम केले आहे आणि आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण हे चित्राच्या माध्यमातून चित्रीत करण्याचे काम चित्रकार नंदलाल बोस यांनी केले आहे. 

राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर सिंधू संस्कृतीपासून रामायण महाभारत गीता भगवान गौतम बुद्ध ते महात्मा गांधी गांधीजीं पर्यंत सर्व चित्र आहेत. सिंधू संस्कृती स्वतंत्र आम्ही भारताचे लोक असे चित्रातूनही स्पष्ट केलेले आहे. राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये हे सर्व आपण बघू शकतो. हे काम पंडित नेहरू यांनी करून घेतलेले आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे.

संदर्भ - आम्ही आणि आमचे संविधान, लेखक - रमेश पतंगे 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

#भारतीय_संविधान 
#आम्ही_भारताचे_लोक 
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर 
#संविधान_दिवस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या