शीर्षक वाचून बुचकळ्यात पडला असालच...शब्दश: अर्थावर नको जायला परंतू हे आज "एका" संघ कार्यकर्त्याच्या लग्नात कानावर पडलेले शब्द होय..! *मा.जळगाव विभाग संघचालक राजेश आबा पाटील (चोपडा)* यांच्या कन्येचा साखरपूडा गरताड येथे पार पडला..संघ एक पारिवारीक संघटन असल्याची प्रचिती पून्हा आज अनूभवायला मिळाली..आबांच्या घरातील कुटूंबियांसोबत सर्व संघ कार्यकर्ते एका विशेष थाटात सर्व जबाबदार्या घरातल्या लग्नासारखं बजावत होते..
समारंभाच्या पूर्व संध्येला कार्यक्रमाची तयारी बघण्याकरता अनेक कार्यकर्त्यांचा गोतावळा चालू होता..जेवण झाल्यावर सहज सर्व कार्यकर्ते गप्पा मारत स्वाभाविक गोल मंडलात उभे होते, चकाट्या पिटल्या जात होत्या, हसण्या खिदळण्याचा आवाज मंडपात घूमत होता..लग्नघरातील एक बाहेरील पाहूणे आमच्यात आले व सहज प्रश्न केला , *संघवाले का??*..आम्ही होकारार्थी मान डोलावली..ते लगेच उद्गारले, *"लांबूनच वाटलं मला..!! एवढ्या ओर्गनाइज्ड स्ट्रक्चर मध्ये स्वभाविक उभं राहणं तूम्हालाच जमतं ब्वॉ"* हे ऐकून अझूनच हशा पिकला..
कार्यक्रमाच्या प्रसंगी काही तासांपूर्वी सर्वांचा जमाव होत होता..अगदी स्वागत गेट पासून जिथं नजर जाईल तिथे संघ कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त दिसत होते..जेष्ठ स्वयंसेवकांनी तर स्वागत कमान सोडलीच नाही..जेवणाच्या ठीकाणी संघ शिक्षा वर्गात जसे गाळा प्रमुख असतात तसे प्रत्येक पंगतीच़्या गाळ्यात कार्यकर्ते विचारपूस करून आग्रह पूर्वक पाहूणचार करत होते..
कार्यक्रमाच्या सूरवातीस आबांनी दर्शवलेल्या इच्छेनूसार मंगलनिधी सूपूर्त करण्याकरता लगबग सूरू झाली..सर्व प्रमुख कार्यकर्ते व्यासपिठाच्या बाजूस होते.. *जनकल्याण समिती व वनवासी कल्याण आश्रम ह्या दोघं संस्थांना प्रती २१०००/- मंगलनिधी सुपूर्त केला* ..एकच भारतमातेच्या जय जय काराने सभा मंडप दूमदूमला होता..सर्वच टाळ्यांच्या गजरात आबांच्या कुटूंबियाकडे बघत होते..आबांच्या कुटूंबियांच्या दानशूरतेला लोकं नवलाने व आनंदाने बघत होते..एवढ्यावर हे कुटूंब नाही थांबले.. *राम मंदीर निर्माणाचं राष्ट्रव्यापी अभियान सूरू आहे..ह्या भव्य निर्माणाच्या कार्यात आबांच्या तिघही भावंडानी मिळून सपत्नीक ५१०००/- निधी अभियान समितीकडे सूपूर्त केला..*
खरंच कुणी एक संघ कार्यकर्ता कीती समर्पित जीवन जगतो त्याचा पायंडा आबांनी आज समाजासमोर ठेवला..तन मन स्वरूप मेहनतीने निस्वार्थी वृत्तीने तो काम करतो, त्यात मंगलदान हे एक आदर्श चिन्ह समाजाच्या मातीत रोवतो सुद्धा..ह्या सर्वांनंतर जमलेल्या लोकांच्या वर गेलेल्या भूवया ह्या समर्पणाची पावतीच देत होत्या..लग्नाचा खर्चात झालेला त्रागा असह्य असतो पण त्यातही ही समर्पित वृत्ती म्हणजे एक प्रेरणा च होती..हे सर्व चित्र ज्याने बघितलं असेल , पण तो जर संघाचा कार्यकर्ता नसेन तर निश्चित तो आश्चर्यचकीत झाल्या शिवाय राहणार नाही..आणि हीच पावती त्या शब्दांनी व्यक्त केली..
सुटसूटीत कार्यक्रम, उत्तम नियोजन, सामान्य दिसणार्या असमान्य कार्यकर्त्यांचा गोतावळा, स्वयंसेवकांचे आचरण, अबालवृद्ध कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्याच्या घरकामातला सहभाग, एवढा निधी समर्पित केल्यावरही चेहर्यावरचे नं बदलेले हावभाव..भर लग्न मंडपात भारत मातेच्या घोषणा देणं नं विसरणं हे फक्त संघाच्या कार्यकर्त्याच्या घरच्या मंगलकार्यात बघायला मिळू शकतं..म्हणून कदाचित तो इसम बोलला असावा.. *बापू, संघाचं लग्न आहे हे..!*

0 टिप्पण्या