।। आज गुरु शिष्याचा स्मृती दिन ।।
वस्ताद श्री लहुजी साळवे अन् क्रांतिकारक तसेच प्रचंड अध्यात्मिक ऊर्जा असणारे दत्तभक्त श्री वासुदेव महाराज अर्थातच श्री वासुदेवबळवंत फडके यांचा स्मृती दिवस.
वासुदेव जेंव्हा इंग्रज दरबारी नौकरी करत होते तेंव्हा त्यांनी लहुजी साळवे यांच्याकडुन .शस्त्र व कुस्तीचे शिक्षण घेतले. एकदा त्यांची आई आजारी पडली असता सरकारने त्यांची रजा मंजुर केली नाही.आणि आईचे अतिंम दर्शन घेता आले नाही. या प्रसंगावरुन त्यांचे जीवनच पालटले. ते थोर दत्त भक्त होतो.पुणे मुक्कामी असताना गुरुचरित्र संपूर्ण हस्तलिखित केले. तसेच श्री दत्तप्रभू यांचे सात हजार ओव्यांचे चरित्र सुध्दा लिहले. वासुदेव नित्य संध्यवंदन तसेच रुद्र,पवमान सुध्द म्हणत असत. त्यांच्याजवळ एक सुंदर दत्तप्रभू यांचे एकमुखी रुद्रभाव असणारे छायचित्रे असे .तसेच सोबत गुरुपादुका नित्य पुजन.
त्यांचा क्रांतीकार्यास त्यांनी संतांची मदत मागितली. मात्र ही वेळ योग्य नाही असे संतानी सांगितले. त्यावेळेस
वासुदेव म्हणाले : ज्यावेळेस आपल रक्त क्रांतीसाठी उसळेल तीच योग्य वेळ आहे. त्यांनी स्वराज्याचे किल्लेदार सरदार असलेल्या रामोशांच्या मनात क्रांतीचा व स्वातंत्राचा वन्ही चेतवला. एक आंदोलन उभ केल. १८५७ राष्ट्रीय उठाव इंग्रजांना वाटल आपण मोडीत काढला पण त्या उठावाची ठिणगी मात्र घराघरात पडली होती. तीच ठिणगी वासुदेवाच्या रुपात मशाल बनु लागली. वासुदेव यांनी स्वदेश व शिक्षणावर भर दिला. पुन्हा पाद्र्यांनी दुष्काळ परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा गैरफायदा घेत पावाचे तुकडे फेकुन धर्मांतरचे काम चालु केले होते. त्या कडे ही त्यांनी लक्ष घालत ते मोडीत काढायचा प्रयत्न केला. हे सर्व प्रयत्न सुरुच होते. त्याचवेळी अध्यात्मिक साधनाही सुरु होती. त्यांनी देशहितासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले.
वासुदेवास पकडण्यासाठी. भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्यांनी त्याहून मोठे इनाम जाहीर केले. श्री वासुदेव महाराज यांनी याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही इनाम जाहीर केले. वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते.
१८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी 'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या आनंदमठ कादंबरीमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्धचे फडक्यांचे अनेक कारनामे वापरले आहेत. यावर सरकारने आक्षेप घेऊन कादंबरी प्रकाशित न होऊ दिल्यामुळे चट्टोपाध्यायनी पाचवेळा बदल केल्यावर मगच त्याचे प्रकाशन झाले.
जुलै २३, इ.स. १८७९ रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले.फाशी ऐवजी फडक्यांना येमेन देशातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असताना एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.
तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले त्यात फेब्रुवारी १७, इ.स. १८८३ रोजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी एका महान क्रांतिकारकाने आपले जीवन आणि जीव दोन्ही अर्पण केले. वासुदेव बळवंत फडके यांचे बलिदान झाल्या नंतर त्यावर्ष दोन अडीच महिन्याच्या अंतराने पुन्हा एका क्रांतिकारकाचा जन्म झाला ते म्हणजे तात्याराव सावरकर.
माझी भावना अशी आहे वासुदेवराव (महाराज ) यांचे क्रांतीकार्य जे अपुरे राहिले ते पूर्ण करण्यासाठी तात्यांचा जन्म झाला होता. देव व देशभक्तास साष्टांग दंडवत व विनम्र अभिवादन ।
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
।। भारत माता की जय ।।
योगेश काटे यांच्या फेसबुकवरून साभार
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या