नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात दोन दिवसापूर्वी अतिशय मन हेलावून टाकणारी घटना घडली...


जिल्ह्यात श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान अगदी उत्साहात सुरु आहे. तळोदा शहरातील संघाचे बालपणा पासूनचे स्वयंसेवक श्री प्रविणकाका मुरलीधर सोनार यांना काही दिवसापूर्वी कोरोना झाला होता व ते नंदुरबार येथे रुग्णालयात उपचार घेत होते.



अभियान सुरु होते परंतु या अश्या परिस्थितीमुळे त्यांना कोणाला भेटता येत नव्हते, त्यामुळे दि. २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी त्यांनी त्यांच्या मुलाला संदीप यांना रु.२१,०००/ रू. चा चेक तयार करायला सांगितला आणि निरोप दिला की संजू भाऊ ला ( श्री संजय पुराणिक, जिल्हा कार्यवाह) बोलावून देऊन टाक आणि यानंतर लगेच काकांची तब्येत खालावली आणि दुर्दैव असे की दुपारी ते शांत झाले.

सरकारी सोपस्काराप्रमाणे नंदुरबार येथेच त्यांचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी आपले कार्यकर्ते द्वारदर्शनासाठी गेले आणि पुढच्या ५ मिनिटात त्यांचा २३ वर्षीय मुलाने २१,०००/- चा चेक आणून दिला आणि घडलेला घटनाक्रम सांगितला.

अक्षरशः मन हेलावणारी घटना होती. अंथरुणावर खिळलेला माणूस ज्याला पुढे काय होणार याची शाश्वती नाही, परंतु अयोध्येतील राम मंदिरासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि दुसरीकडे त्यांचा मुलगा अशी कठीण परिस्थिती असताना पितृ छत्र हरपून अवघा १ दिवस झालेला असताना पित्याची शेवटची इच्छा हे आपलं परम कर्तव्य मानून त्याची त्वरित पूर्तता करणारा आदर्श पुत्र समर्पण करतो. हा प्रसंग म्हणजे जन-माणसातील रामाचे दर्शन घडवणारे आहे आणि राम मंदिर, राम, आयोध्या हे सर्व विषय हिंदू जन-मनात किती खोलवर रुजलं आहे याचं अगदी जिवंत उदाहरण आहे.

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या