बस स्टँड रोज सकाळी झाडून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंदीबाई_बाविस्कर आजी यांच्याकडून श्रीराम मंदिरासाठी पहूर शहरातून पहिले समर्पण!
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियान पहूर (जि. जळगांव) शहरात सुरवात करण्यात आली. तेव्हा प्रथम निधी संकलनाची १०० रुपयाची पावती बस स्टँड रोज सकाळी झाडून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंदीबाई बाविस्कर आजी यांच्या योगदानातून सुरू केले.
बस स्टँड झाडून उपजीविका चालवणाऱ्या आनंदीबाई बाविस्कर आजींसाठी १०० रु खूप आहेत, पण त्यांच्याही मनात श्रीरामाबद्दल असलेली भक्ती आणि मंदिरासाठी त्यांनी दिलेली देणगी ही समाजाच्या मनामनातील राम व श्रद्धा दर्शवणारी आहे.
श्रीरामा बद्दल ची भक्ती लोकांमध्ये ही विषमता विरहित आहे. सर्वांमध्ये श्री राम एकच आहे हे ह्या प्रसंगाने सिद्ध केले. आणि जेव्हा हे मंदिर पूर्णत्वास येईल तेव्हा त्याचे पावित्र्य आणखीन वाढेल कारण त्यामध्ये देणगी जरी वेगवेगळी असेल पण भाव मात्र एक असेल.
मुख्यतः आपल्या समाजातले असे लोक जे आपल्या उदरनिर्वाहसाठी इकडे तिकडे भटकत असतात, पण प्रभू श्रीरामाबद्दलची आसक्ती थोडी सुद्धा कमी होऊ देत नाही. त्यातले आनंदीबाई बाविस्कर हे एक आहेत.
- चेतन अरूण रोकडे, पहूर
मो. ८८०६६३२८७८

0 टिप्पण्या