'नाना नवल' ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न


संभाजीनगर | रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असलेल्या नाना नवल यांच्या सामाजिक जीवनावर आधारित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संभाजीनगर येथे ३१ जानेवारी २०२१ रविवार रोजी संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी स्वत: नाना नवल उपस्थित होते. दिवाकर कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले तर रमेश पांडव यांनी वैयक्तिक गीत म्हंटले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे होते, अध्यक्षस्थानी रा. स्व. संघाचे विभाग संघचालक अनिल भालेराव आणि प्रमुख अतिथी प्रस्तुत ग्रंथाचे लेखक अरुण करमरकर उपस्थित होते.


या कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रीय विचारांचे सुप्रसिद्ध हिंदी मासिक पांचजन्यचे "श्रीरामजन्मभूमी राष्ट्रमंदिर" तसेच दी ऑर्गनायझरच्या Symbol of Reclamation Resolve & Resurgence या विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, देवगिरी विश्व संवाद केंद्र आणि देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नाना नवले यांच्या सामाजिक जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाचे आज दि. ३१ जानेवारी २०२१ रविवार रोजी प्रकाशन करण्यात आले. नागपूर व नाशिक या ठिकाणीही या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे. नानांच्या जीवनाचा सर्वाधिक कालावधी औरंगाबाद येथे व्यतीत झाला असल्याने त्याचे विशेष महत्व असल्याचे प्रतिपादन दिवाकर कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. या पुस्तकाचे लेखन प्रसिद्ध लेखक व पत्रकार अरुण करमरकर यांनी केले आहे. आपल्या भाषणात त्यांनी पुस्तकाविषयी माहिती सांगताना सांगितले की, या पुस्तकाचा उद्देश नानांची व्यक्तिगत प्रसिद्धी करणे हा नसून नानांच्या संघ कार्याची फलश्रुती व त्यांच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा म्हणजे हे पुस्तक आहे. संघाच्या सामाजिक इतिहासाच्या भूमिकेतून या ग्रंथाचं महत्व आहे. नानांनी गावोगावी जाऊन सामाजिक समरसतेचा विचार मांडला, धुळे नंदुरबार भागातील वनवासी समाजापर्यंत संघ कार्य पोहोचवलं आहे. त्यांच्या या कार्यामुळे आपल्याला या ग्रंथातून प्रेरणा आपल्याला मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असलेल्या हरिभाऊ बागडे यांनी आणीबाणी काळात नाना नवले यांच्या सोबत केलेल्या कार्याच्या आठवणीना उजाळा दिला. नाना जेव्हा तरुण स्वयंसेवक होते तेव्हा मी बाल स्वयंसेवक होतो. कष्टमय व संघर्षमय प्रवासातून आम्ही संघ कार्य केलं, त्यातून खूप काही शिकलो असे सांगत त्यांनी नानांच्या आठवणी मांडण्याचा प्रयत्न केला. नानांनी वनवासी समाजात समरस होऊन त्यांना आपलंसं केलं असेही ते म्हणाले.



रा. स्व. संघाचे विभाग संघचालक मा. अनिल भालेराव यांनी आपल्या भाषणात नानांची व्यक्तिरेखा उभी केली. संभाषण कौशल्य आणि संपर्क हे नानांचे वैशिष्ट असल्याचं ते म्हणाले. नानांनी सांगायचं आणि आम्ही ते ऐकायचं असा आदरयुक्त धाक अजूनही आहे. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. कित्येक नवीन जोडल्या गेलेल्या स्वयंसेवकांना ते आपल्या सोबत घेऊन प्रवास करायचे... त्यातून त्यांनी असे कार्यकर्ते घडवले जे आजही संघाच्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत असे त्यांनी सांगितेल. नाना आपल्याकडून खूप काही करून घेतात, ते आपल्याला कळतही नाही. त्यांचे संभाषण कौशल्य, लोकसंपर्क, सगळ्यांना जोडून ठेवण्याची कला खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असल्याचंही त्यांनी सांगितलं.

"मी नाही, माझं नाही, मला नको" - नाना नवले



ज्यांच्या व्यक्ती चरित्रावर हा ग्रंथ निर्माण करण्यात आला ते नाना नवल स्वतः कार्यक्रमात उपस्थित होते. ते म्हणाले, संघात घडलो कष्ट शिकलो ते दत्ताजी भाले यांच्याकडून आणि संघ सांगायचं कौशल्य शिकलो ते प्रल्हादजी अभ्यंकर यांच्याकडून. माझ्याविषयी कार्यक्रमात जे काही गुणगान केल गेलं ते माझं नाही. हा ग्रंथ माझा नाही. "मी नाही, माझं नाही, मला नको" असं म्हणत त्यांनी या सगळ्याचं श्रेय रा. स्व. संघाला दिलं. मी जे काही केल ते संघामुळे. त्यामुळे फुकटचं श्रेय कश्यासाठी? या कार्यात अनेकांनी कष्ट केले आहे. असे सांगत त्यांनी सर्व श्रेयं संघ संस्थापक पू. डॉ. हेडगेवार यांच्या चरणी अर्पण केलं.

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या