समरस समाज निर्मिती करणारी एक नवी परंपरा


जळगांव। चि.अमर काटोले व चि.सौ.कां.सीमा फुसे यांचा विवाह सोहळा दि. 31 जाने. रोजी जळगाव जिल्ह्यात शिरसोली या गावी नुकताच पार पडला. या विवाहात परिसरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.



विवाहाचे वैशिष्ट्ये म्हणजे विवाहापूर्वी एक आगळी वेगळी घोषणा करण्यात आली. विवाह लागल्या नंतर सर्वप्रथम जी पंगत बसेल त्यामध्ये गावातील सर्वच्या सर्व 28 समाजांमधील नवविवाहित दांपत्य भोजनास बसतील. दांपत्यांना तसं पुर्वनियोजीत निमंत्रित केलं गेलं होतं.

विवाह अगदी वेळेवर पडला आणि त्यानंतर ही नवविवाहित दांपत्यांची सामाजिक सलोखा निर्माण करणारी समरसता पंगत भोजनासाठी बसविण्यात आली. त्यावेळी त्यांचा भेटवस्तू देऊन योग्य तो सत्कार केला गेला. स्वतः चि.अमर काटोले आपल्या नववधू सोबत अन्य प्रथा-परंपरा, मानापमान बाजूला सारीत प्रत्यक्ष या पंक्तीत येऊन भोजनासाठी बसले.

सर्व आलेल्या वऱ्हाडी मंडळींना हा सोहळा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वाटला, प्रत्येकजण आपल्या कुटुंबामध्ये अशा पद्धतीने नवनवीन उपक्रम लग्न सोहळ्याच्या निमित्ताने करुन काही सामाजिक संदेश देता येऊ शकतात असा संदेश मनाशी गुणगुणत विवाह सोहळ्यातून बाहेर पडत होता.

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या