शिवराज्यभूषण छत्रपती संभाजी महाराज



सनातन वैदिक धर्म सिध्दांता अभिमानी, महाप्रतापी शिवपुत्र छत्रपती संभाजी राजांचा जन्म राजधानी किल्ले पुरंदरवर मातोश्री सईबाईच्या पोटी झाला. कनकगिरीच्या लढाईत शहाजी जिजाऊपुत्र शिवरायांचे थोरले बंधु संभाजी राजांचा मृत्यू झाला त्यांची स्मृती म्हणून शिवरायांच्या दिव्य तेजस्वी, व पराक्रमी पुत्राचे नांव संभाजी ठेवण्यात आले.

     शंभु बाळ वर्षाचे झाले तेव्हा स्वराज्यात चाळीस किल्यांवर महाराजांची सत्ता होती. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचे प्रदेश जिंकणे, घोडे, शस्त्रास्त्रे, खजिना, रहद लुटणे इ. प्रकार दणक्यात चालविले होते. विजापुरकरांनी शिवरायांना कायमचे नष्ट करण्यासाठी अफझलखानाला पाठविला पण महाराजांनी प्रतापगडावर १९ नोव्हेंबर १६५९ ला त्याचा वध केला त्यावेळी संभाजी राजे केवळ अडीच वर्षाचे होते. पण या नरसिंह पराक्रमाने उभा महाराष्ट्र हादरलेला त्यांनी पाहिला. दुर्दैवाने फक्त दोन महिन्यापूर्वी शंभु बाळांच्या मातोश्री सईबाई देवा घरी गेल्या होत्या. शिवरायांच्या व जिजाऊंच्या कुशीत वाढलेले व शिवरायांच्या तेजस्वी इतिहासाला परिस स्पर्श करण्याचे कार्य छत्रपती संभाजी राजांनी केले.

     संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, इंग्रजी भाषेचे व युध्द कलेचे शिक्षण घेतलेले असे नावलौकिक पावलेले संभाजी राजे आठ साडे आठ वर्षाचे असताना त्यांना मोगलांकडे ओलीस राहावे लागले. 

     सन १६६६ ,वयाच्या नवव्या वर्षी आग्रा भेटीत औरंगजेब जेव्हा खुनशीने विचारतो राजे आमच्या मल्लांशी कुस्ती खेळता का ? शंभु राजांनी काय उत्तर द्यावे मी राजा आहे अलबत्या गलबत्या बरोबर कुस्ती खेळत नसतो हे सर्व होत असतांना आग्ऱ्याहून शिवराय व संभाजीराजे १७ ऑगस्ट १६६६ रोजी कैदेतून निसटले शिवराय एकटेच रायगडावर पोहोचले व एकट्या शंभु राजांना मथुरा येथे राहावे लागले. वयाच्या दहाव्या वर्षी राजे मोगलांकडे कडे मनसबदार होते वयाच्या बाराव्या वर्षी शिवरायांनी शंभुराजांकडे दहा हजार फौजेचे नेतृत्व दिले. यावेळी त्यांनी खांबायत गुजरात जिंकले राजांचा कारभार अप्रतिम होता. त्यापूर्वीच म्हणजे राजांनी अनेक ग्रंथाचे सुक्ष्म वाचन केले वयाच्या चौदाव्या वर्षी संभाजी राजांनी 'बुधभुषण' नावाचा संस्कृत ग्रंथ  लिहिला तर 'नखशिखांत', 'नायिकाभेद', व 'सातसतक' हे हिंदी ग्रंथ लिहिले. संभाजी राजे प्रतिभावंत लेखक होते त्यांनी धर्मचिकित्सा केली त्यांचे वक्तृत्व प्रभावी होते. 

     शिवरायांचे वारसदार शंभुराजे शिवाजीराजांच्या राज्याभिषेका प्रसंगी साम्राज्ञीपद महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे यांची निवड झाली. म्हणजे वारसदारावरुन वाद होऊ नये यासाठी शिवरायांनीच संभाजीराजांना वारसदार निवडले. सोयराबाईनी कसलाही विरोध केला नाही सोयराबाई शेवट पर्यंत संभाजी राजांच्या पाठीशी आई प्रमाणे खंबीरपणे उभ्या होत्या. संभाजी व मातोश्री सोयराबाई यांच्यात कधीही सत्ता संघर्ष नव्हता.

     १६७६ साली शिवाजीराजे दक्षिण दिग्वीजयासाठी गेले असतांना अण्णाजी दत्तो व त्यांचे समर्थक यांनी स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे प्रजा त्रस्त झाली अशा वेळेस प्रजा संभाजी राजांच्या आश्रयाला आली व संभाजी राजांनी त्यांना न्याय मिळवून दिला. प्रजेला न्याय क्षेत्रातील,  प्रशासनातील, आर्थिक क्षेत्रातील स्वातंत्र्य दिले. त्यामुळे चिडलेल्या अण्णाजी दत्तो व त्यांचे समर्थकांनी संभाजी राजांची बदनामी सुरु केली. ज्या स्त्रिया इतिहासात झाल्याच नाही अशा स्त्रियांची नांवे संभाजी राजांभोवती जोडण्यात आली. संभाजीराजे चारित्र्य संपन्न व निर्व्यसनी राजे. त्यांनी एकाही स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितले नाही. अशा परिस्थितीत स्वराज्यावर चालून आलेले दिलेरखानाचे आक्रमण रोखण्यासाठी शिवाजी महाराजांनीच संभाजी राजांना खानाकडे पाठविले होते.  

     १६ जानेवारी १६८९ रोजी किल्ले रायगडावर राजांच्या राज्याभिषेकानंतर सतत नऊ वर्ष औरंगजेबा सारख्या बलाढ्य शत्रुशी झुंज देऊन त्यानी अनेक लढाया केल्या व त्या जिकंल्या सुध्दा यात एकही किल्ला, आरमारातील एकही जहाज अथवा स्वराज्यातील इंचभरही जमीन शत्रुच्या हाती लागू दिली नाही. १६८२ ला रामसेजच्या लढाईत अपमानास्पद पराभवानंतर चिडलेल्या औरंगजेबाने कोट्यवधी रूपये खर्च करुन गुप्तहेरां मार्फत संभाजी राजांची सर्व माहिती मिळविली. १ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर (रत्नागिरी) येथे मूकरबखानाचा मुलगा इखलासखान याने संभाजी राजास जेरबंद केले व करकसून बांधले आणि त्यांचे केस धरुन फरफटत हात्ती जवळ आणले त्याचप्रमाणे कवी कलशालाही आणण्यात आले. या दरम्यान बाविस दिवस त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे हाल करण्यात आले. 

     ३ मार्च शाही छावणी बहादुर गडावरुन भिमा कोरेगाव, तुळापूर येथून अखेर अर्धमेल्या अवस्थेतील त्यांचे देह वढु बुद्रुक येथे गावाजवळच्या जंगलात आणण्यात आले. कवी कलशाचा शिरच्छेद करण्यात आला. आणि शंभु राजांना पालथे झोपवून त्यांच्या देहांचे तुकडे तुकडे करण्यात आले. या प्रसंगी संभाजी राजे अवघे ३२ वर्षांचे होते. तो दिवस होता फाल्गुन वद्य अमावस्येचा १९ मार्च १६८९ अशा प्रकारे संभाजीराजांचे धडावेगळे मस्तक एका उंच भाल्यावर रोवले गेले ढोलकर्णे शेकडो बाजारबुणग्यांसह मोठी मिरवणूक अख्या महाराष्ट्रातुन फिरविण्यात आली संमाजी राजांनी स्वराज्यासाठी वेदनामय हौतात्म्य पत्करले. संभाजी राजांच्या मृत्यू नंतर गेली १८ वर्ष हा औरंगजेब पिसाटा सारखा महाराष्ट्रातील हिंदवी तेज हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी तडफडत होता पण महाराष्ट्रला अमृत लाभले होते ते वढु येथील बलिदानातुन आणि अतिशय कडव्या प्रतिकाराने मराठ्यांनी औरंगजेब येथेच संपविला. संभाजी महाराजांनी शिवछत्रपतींच्या कार्याचा वारसा समर्थपणे चालवला व स्वराज्यासाठी आत्माहुती दिली. ताठ मानेने जगावं कस हे तर शंभुराजांनी शिकवलेच पण मानाने मरावं कस हेही त्यांनी दाखवून दिले.

     धर्मविराग्रणी, शिवराज्यभुषण, नितीवान, पराक्रमी, यवनशासनपिडक, शास्त्रपंडीत, भाषापंडीत, सनातन वैदीक, धर्मसिध्दांताभिमानी, परमईश्वरनिष्ठ महाप्रतापी छत्रपती संभाजी राजास कोटी कोटी प्रणाम.

     धर्मवीर संभाजी राजांच्या वास्तविक चारित्र्याचा प्रसार होऊन युवक व युवतींनी सिनेनट, नटी, खेळाडु यांच्या ऐवजी छत्रपती संभाजी राजांचा आदर्श वाटने हाच उद्देश…..
               
- चेतन निर्मळे
  मो. ९७६७८०४८२६

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या