'सर्व समाज आपला भाऊ आहे'... श्री गुरुजींच्या बालपणीचा प्रेरक अनुभव


रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांचे अवघे आयुष्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रसंग आजही आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवतात व प्रेरणा देतात. संघाचा स्वयंसेवक कसा असायला हवा, याबद्दल तर श्री गुरुजी यांच्या जीवनातील प्रसंग फारच बोलके ठरतात. असाच एक प्रसंग, जेव्हा बाल माधव एका अनोळखी मुलाची मदत करतो.


एकदा संध्याकाळी माधव शाळेतून घरी येत होता. वाटेत त्याला एक मुलगा दिसला. तो रडत होता. त्याचे दप्तर धुळीत पडले होते. त्याच्या पायाला लागले होते. त्यातून रक्त निघत होते. माधव त्याच्या जवळ थांबला. त्याने त्या मुलाचे दप्तर उचलले आणि झटकून ते आपल्या खांद्यावर घेतले. माधवने त्या मुलाचे डोळे पुसले व त्याला हाताला धरून आपल्या घरी आणले. ताई घरी होत्या. त्यांनी त्या मुलाची जखम धुतली पुसली व औषध लावले. मुलगा त्यामुळे सुखावला. माधव म्हणाला,"ताई, त्याला काहीतरी खाऊ दे ग" ताईने त्याला खाऊ दिला. तो मुलगा आपले दप्तर घेऊन गेला. ताईने सहज विचारले, "बाळ मधु हा मुलगा कोण आहे? तुझ्या वर्गातला आहे का.?"

तेव्हा माधव म्हणाला,"तो मुलगा माझ्या वर्गातला नाही की ओळखीचा नाही. पण तो रस्त्यात रडत बसला होता म्हणून मी त्याला घरी आणले."

ताई म्हणाल्या," शाबास मधुबाळा, असेच दुसऱ्याच्या उपयोगी पडावे."

रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी अर्थात माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्या बालपणीचा हा प्रसंग. बालपणी त्यांच्यावर सेवा व परोपकार करण्याचे संस्कार झाले असे यावरून लक्षात येते. संघाच्या शाखेतही "सर्व समाज आपला भाऊ आहे व आपण त्याचे देणे लागतो" हाच विचार शिकवला जातो. याच संस्कारामुळे देशभरात हजारो प्रकल्प संघ स्वयंसेवक केवळ निस्वार्थ वृत्तीने समजहितासाठी करताना आपल्याला दिसून येतात, ज्याची प्रसिद्धी व प्रचारही होत नाही.


संदर्भ- श्री गुरुजी, मूळ लेखक हो. वे. शेषाद्री

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या