चित्रपट विषयात आवड असणाऱ्या तरुणांसाठी आपलं कला कौशल्य सिद्ध करण्यासाठी चांगली संधी - संकर्षण कऱ्हाडे
परभणी। डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ जानेवारी २०२२ दरम्यान जळगाव येथे राज्यस्तरीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात येत आहे. या निमित्ताने परभणी येथे सुप्रसिद्ध मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते या फेस्टिवल चे पोस्टर अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या, तर चित्रपट क्षेत्रात आवड असणाऱ्या तसेच, शॉर्ट फिल्म मेकर्सना आपला कलाविष्कार सिद्ध करण्यासाठी ही चांगली संधी असून त्यामध्ये अधिकाधिक तरुणांनी सहभाग घ्यावा असं आवाहन केलं. यावेळी देवगिरी चित्र साधना युवा विभाग प्रमुख गौरव नाथ व परभणीस्थित डॉ. विवेक दैठणकर, सुरेश देशमुख, कल्पेश जोशी, सागर निकवाडे आदी सहकारी उपस्थित होते.
Twitter link
https://twitter.com/vskdevgiri/status/1472101733555863552?t=0tKSw93VOv1dnvrdcUKDCw&s=19
काय आहे देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल?
शॉर्ट फिल्म मेकर्सना आपली कला सादर करण्यासाठी एक मंच देवगिरी चित्र साधनाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये शॉर्ट फिल्म्स मागवण्यात आल्या असून जळगांव येथे त्याचे सादरीकरण होणार आहे. विशेष निमंत्रित पाहुणे व परिक्षकांकडून यातील सर्वोत्कृष्ट तीन शॉर्ट फिल्म्सना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
या शॉर्ट फिल्म महोत्सवासाठी 'कुटुंब', 'माझे गाव', 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव', 'पर्यावरण', 'भारतीय संस्कृती आणि मुल्य', 'लॉकडाउन - अनलॉकडाउन', 'उद्योजकता', 'शिक्षण आणी कौशल्य विकास', 'भारतीय संस्कृती आणि जीवन मुल्य' इ. विषय देण्यात आले आहेत. प्रवेश पाठवण्याची अंतिम दि. 5 जानेवारी 2022 असून दि. 15 व 16 जानेवारी 2022 असा दोन दिवसीय महोत्सव पार पडणार आहे. अधिक माहितीसाठी 9892906374 व 9766201676, dcs.dff1@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Instagram link
https://www.instagram.com/p/CXnWRrbOeX6/?utm_medium=copy_link
Facebook link
https://m.facebook.com/story.php?story_fbid=352155703471634&id=100060316225249
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या