@विशाल मुळे
जी घटना झालेली नसते, तिथले राज्यकर्ते, तिथली काही प्रामाणिक मिडिया, अनेकांचे ट्विट्स त्या संदर्भात येतात की असा कोणताही प्रकार त्रिपुरात झाला नाही, तरीही महाराष्ट्र पेटतो. याचे कारण काय? असा प्रश्न पडला, तर एक लक्षात येते की, हा प्रकार केवळ निमीत्त म्हणुन वापरला गेला आहे आणि हे रझा आकादमीचे एक षडयंत्र होते, हे आता हळूहळू समोर येऊ लागले आहे.
त्रिपुरा येथील जी घटना झालेलीच नाही, ती घटना झाली असे भासवून काही व्हिडीओ, व्हाट्सअप्प मेसेजेस महाराष्ट्रभर पोहचले. यु-ट्यूब चॅनल्सवरून मुस्लिम समाजात भडकावू विचार पोहचवले गेले. त्या संदर्भात काही बाबी आपन जुळवून पाहिल्या असता असे लक्षात येते की, यातील अनेक बाबी खोट्या आहेत किंवा ह्या घटना अन्यत्र ठिकानी घडलेल्या आहेत, त्याचा वापर हा त्रिपुराशी जोडून करण्यात आला. महाराष्ट्रातील वातावरण दुषित करण्यासाठी रझा आकादमीने याचा वापर केला. त्रिपुराच्या कथित घटनेच्या संदर्भात मोठ्याप्रमाणात ट्विट्स रझा अकादमीशी संबंधित लोकांनी केले आहे. त्रिपुरातुन जी ट्विट्स आली ती महाराष्ट्रात त्यांच्याच कार्यकर्त्यांची होती. राष्ट्रीय विचारांना बदनाम करण्याचे काम नेहमीच ह्या अकादमीचे मुख्य उद्दीष्ट राहिले आहे.
त्रिपुरा सरकारने, त्रिपुराच्या डी.जी.ओ. ने स्पष्ट पणे सांगितले आहे की, इथे कोणतीही मस्जिद पाडल्या गेली नाही. तरी देखील रझा अकादमीच्या लोकांनी अनेक चिथावणीखोर वक्तव्य केले, तश्या बातम्या रितसर कशा पोहचतील ह्याची व्यवस्था त्यांनी केली होती. यातून असे दिसून येते रझा आकादमीला हे करायचेच होते. त्यांना समाजात सौख्य नांदू न देने हे त्यांचा मुख्य उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र सरकारच्या एका पक्षाच्या जबाबदारी असलेल्या प्रवक्त्याने तर यात विरोधी पक्षाचा हात असल्याचा आरोप केला आहे. अशा माणसांनी असे वक्तव्य केले तर आपल्याला दुसरा शत्रु असावाच लागत नाही. त्रिपुराच्या कथित घटनेवरून महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्यात रझा अकादमीच्याच लोकांनी बळ दिल्याचे दिसत आहे. अगदी लबाडी करुन काही कथित बातम्या पसरवल्या जात आहेत. एका व्यक्तीने गाड्या जाळल्या आणि दुसरीकडे प्रचंड मोठा भगव्या ध्वजासह यात्रा काढल्याचा फोटो अनेकांनी टाकले आहेत.
मुळात हा फोटोच फेक आहे. ह्या फोटोचे सत्य आहे की हा फोटो पश्चिम बंगालच्या रामनवमी दरम्यानचा आहे. दुसराही एक फोटो असाच होता ज्यात चारचाकी वाहने जळताहेत आणि एका इमारती समोरचा फोटो आहे, जे की जुने आहे व त्याचा या कथित घटने सोबत संबंध नाही. हे फोटो त्रिपुरातील आहेत, पण राजकिय संघर्षाची फोटो आहेत. त्याचा गैरवापर ह्या रझा आकादमीने केला आहे. त्या कथित घटनेवरून हिंदू समाज, बजरंग दल आणि संघ परीवाराला बदनाम करण्याचे षडयंत्र झाले आहे.
रझा आकादमी ही तिच कुप्रसिद्ध संघटना आहे, जिने आझाद मैदानात 2012 साली दंगल घडवून आणली होती. ती तेव्हा पासूनच सर्वांच्या नजरेत आली. रझा आकादमी स्थापन ही 1978 ची आहे. अलहाज मोहम्मद सईद याने ह्या संघटनेची स्थापना केली होती. आझाद मैदानातील दंगल मुळे ह्या संघटनेला प्रसिद्धी मिळाली. आझाद मैदानावरिल अमर जवान ज्योतीची नासधूस ह्याच संघटनेने केली. इमाम-ए-अहमद खान रजा कादरी याने आणि यांच्या सहकार्याने आत्यंत प्रक्षोभक असी इंग्रजी, उर्दू, हिंदी, मराठी भाषेत पुस्तक प्रकाशीत करुन यांचा अजेंडा राबवला आहे. त्या वेळी म्यानमार मधील मुस्लिमांवरील हल्लाच्या निषेधार्थ ह्यांनी भारतात विशेषतः मुंबईत मोर्चा काढला होता आणि प्रचंड नासधूस केली होती. हजारो मुस्लिम तरुणांची गर्दी जमवून अतिशय प्रक्षोभक भाषण करून तरूणांना भडकावले होते. त्या दंगलीत पोलिसांची दिसेल ते वाहन यांनी फोडली आणि जाळली होती. अगदी तसेच त्रिपुराच्या कथित घटनेवरून महाराष्ट्रातील जिल्ह्यात घडले, पोलिसांवर हल्ला झाला. पोलिस यंत्रणेवर हल्ला करून, देशाची सुरक्षा कमजोर करायची आणि देशाच्या शांतता व सुव्यवस्था यावर हल्ला करुन देशात अराजकता माजवायची असा प्रयत्न झाला आहे. कारण 2012 नंतर बऱ्याच हिंसक मोर्चात पोलिसांवर हल्ले झाले ते हेच दर्शवतात. मुंबईच्या दंगल मध्ये पोलीसांच्या रिपोर्टनुसार सहा कोटीच्या मालमत्तेची नुकसान झाल्याचा प्राथमीक अंदाज होता. या दंगलीत 58 पोलीसकर्मी जखमी झाले होते तर 63 जन गंभीररीत्या जखमी होते, तर दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला होता.
संगीतकार ए.आर. रहमान आणि इराणी चित्रपट निर्माता माजिद माजिदी यांना देखील विरोध रझा अकादमीने केला आहे. त्यामुळे रझा अकादमी ही संस्था सांगत असली की आम्ही इस्लामविषयक माहितीचा प्रचार प्रसार करतो, प्रबोधन करतो... परंतु यांचे प्रबोधन काय आहे हे आता पुन्हा उजागर झालेच आहे. अश्या संघटना त्वरित बॅन करून टाकल्या पाहिजे ही जी मागणी सर्व स्तरातून होत आहे, ती त्यामुळेच रास्त मागणी ठरत आहे.
- विशाल मुळे, हिंगोली
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या