- अनुप देशपांडे, संभाजीनगर
(मो. ९४२३८५११८८)
रविवारी झालेला T20 वर्ल्डकपचा भारत - पाकिस्तान सामना न बघणारे क्वचितच सापडतील. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला आणि यानंतर मात्र भारतीय संघावर टिकांचे अक्षरशः वादळ उठले. क्रिकेटप्रेमींनी आपल्याला जमेल त्या शब्दांत भारतीय क्रिकेटपटूंचा समाचार घेतला. सामन्यामध्ये सुमार प्रदर्शन करणाऱ्या प्रत्येकाला लोकांनी ट्रोल केले. मग ते सामन्यानंतर विराट कोहलीच पाकिस्तानी खेळाडूच्या गळ्यात पडणं असो, की एकामागून एक तंबूत परत येणाऱ्या फलंदाजांचं. पत्रकार परिषदेत तर एकाने रोहित शर्माला संघातून वगळण्याची भाषा केली. हे सगळं होत असताना पाकिस्तानने भारताची बदनामी करण्यासाठी खोडसाळपणा सुरू केला होता.
सामन्यानंतर थोड्याच वेळात मोहम्मद शमीला टॅग करून काही पोस्ट येणं सुरू झालं. त्यात मोहम्मद शमी हा पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI चा एजंट असल्याचे सांगून, 'मेजर शमी वी आर प्राऊड ऑफ यु', 'वेल डन शमी' असे असे ट्विट्स यायला सुरुवात झाली. खालील काही अकाउंटस् वरून हे ट्विट्स आणि इंस्टा पोस्ट केले गेले होते - @Mkamran_98, faizigram , @sugar_kaka, @mehucutegirl
(ह्या सगळ्या पोस्टचे स्क्रीनशॉट्स खाली लावले आहेत) तसेच , आपल्या देशातील लिबरल, अलगाववादी आणि कट्टरतावादी मंडळींना तर हे आयतं कोलीत मिळालं होतं, म्हणून त्यांनी सुद्धा ह्याचा वापर आपले अजेंडे चालवण्यासाठी केला. ह्यात राजकिय नेते सुद्धा मागे नव्हते. मेहबुबा मुफ्ती , फारूक अब्दुल्ला ह्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचं advantage घेतलं. जेव्हा हा ट्रेंड नंबर 1 ला जाऊन पोहोचला तेव्हा सॉलिडारिटी म्हणून आणि त्याच्या पाठीशी उभं राहायचं म्हणून अनेक दिग्गज खेळाडूंनी शमीची बाजू घ्यायला सुरूवात केली. त्यात सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, अझुरुद्दीन इत्यादी सामील होते, यानंतर मात्र हा ट्रेंड ओसरला. परंतु तोपर्यंत माध्यमांनी मोहम्मद शमीच्या ट्रोलिंगच्या बातम्यांच्या हेडलाईन सुरू केल्या होत्या. भारतात एका आंतरराष्ट्रीय खेळाडूला तो केवळ मुस्लिम (विशेषतः काश्मिरी) आहे, म्हणून कशी तुच्छ वागणूक दिली जाते हे सांगून जगासमोर भारताची बदनामी करण्याचा हा डाव होता.
हा विषय फक्त ट्रेंड पुरता थांबला नाही, नंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपण क्रिकेटर असल्याच लिव्हरेज घेत ह्यावर प्रतिक्रिया देतांना आपला राजकीय हेतू साध्य केला. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी ह्या सामन्याला धार्मिक वळण देऊन हा फक्त पाकिस्तानचा विजय नाहीतर पूर्ण इस्लामचा विजय असल्याचं वक्तव्य दिलं.
या प्रकरणावरून काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे लक्षात येतात -
१. भारत-पाकिस्तान सामन्याचा उपयोग भारताची Anti-Muslim किंवा Anti-Kashmiri दाखवण्यासाठी पूर्वनियोजित कट होता!
२. मोहम्मद शमीला टॅग करून त्याने जणू पाकिस्तानशी प्रामाणिक वागला अश्या आशयाचे ट्विट करून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न झाला, यामागे पाकिस्तानी ट्विटर हँडल्स होते.
३. मोहम्मद शमीने बेईमानी करून खराब प्रदर्शन केले, असे भासवून त्याला ट्रोल करणारे जवळपास सर्व ट्विटर हँडल हे अभारतीय (पाकिस्तानी) होते.
४. हा ट्रेंड सुरू झाल्याच्या काहीच वेळात पाकिस्तानी नेते, काश्मिरी नेते यानिभा मुद्दा उचलून आपले मत मांडायला सुरुवात केली व मुद्दा मोठा केला.
५. ज्या माध्यमांनी या ट्विटर ट्रेंडचा हवाला देऊन बातम्या व हेडलाईन्स तयार केल्या त्यांच्या हे लक्षात आलेच असणार की ट्विट करणारे कोण आहेत, तरीही त्यांनी जणू भारतीयच शमीला ट्रोल करताहेत असे बातम्यांतून का भासवले.?
भारतात नवाब पतौडी ते जहीर खान , जहीर खान ते मोहम्मद कैफ आणि आता कैफ ते शमी असे अनेक मुस्लिम धर्माचे क्रिकेटपटू आहेत ज्यांनी देशासाठी खेळतांना कुठलीही तडजोड केली नाही. भारतीयांनी त्यांना मोठं केलं. देशाचं नाव मोठं करणारा प्रत्येक जण अगोदर भारतीय असतो. 'राष्ट्र प्रथम' या संस्कारावर चालणारा भारत मोहम्मद शमीला का ट्रोल करेल? पाकिस्तान विरुद्धच्या सामना भारतीय जणू आपल्या स्वाभिमान अस्मितेचा सामना आहे, अश्या अर्थाने बघतात, त्यामुळे अधिक प्रतिक्रिया उमटतात. दानिश कानेरिया सारख्या हिंदू खेळाडूला केवळ तो गैरमुस्लिम आहे म्हणून मानसिक त्रास देऊन टीम मधून बाहेर काढणाऱ्या आणि इतक्या वर्षात एकही गैरमुस्लिम खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊ न शकणाऱ्या पाकिस्तानला भारतीय मुस्लिमांची चिंता करण्याचे काही कारणच नाही. एका सामन्यात विजयी झालेल्या पाकिस्तानने इतके शेफारून जाण्याची आवश्यकता नाही. भारतीय संघ त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
3 टिप्पण्या
लगे रहो......