जगाच्या पाठीवर दहा लाखापेक्षा जास्त लोक मरण पावले आणि दीड कोटीपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले असा एकमेव संग्राम म्हनजे भारताच स्वातंत्र संग्राम. ह्या संग्रामात प्रत्येकाने आपआपल्या पद्धतीने योगदान दिले. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान काय हे ओरडनारे डावे इतिहासकार आजही आहेत. पण आता सर्वांनाच संघाच योगदान माहिती झालंय. डाव्यांनी घातलेलं ठराविक इतिहासावरचं आवरण आता गळून पडलेय. सर्वांना संघाच्या स्वातंत्र्य चळवळीतला सहभाग माहिती झालाय. द्वितीय सरसंघचालक श्री गोलवळकर गुरुजी तर ऑगष्ट 1947 च्या शेवटच्या पंधरवाड्यातील पाच सहा दिवस पाकिस्तानातच होते. ह्या व्यतिरिक्त देखील असंख्य संघ स्वयंसेवकांनी आपल्या प्राणाचं समर्पण स्वातंत्र्यासाठी केलंय. नावं आणि पुराव्यासह ते आता सर्वांसमोर आलंय... पण केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघच नाही तर ह्या स्वातंत्र्याच्या संग्रामात "राष्ट्र सेविका समितिचा" देखील मोठा सहभाग होता, हेदेखील तितकंच खरं आहे.
स्वातंत्र्याच्या काळात कॉंग्रेसचे सर्वेसर्वा महात्मा गांधींनी ऑगस्ट 1947 ला शरणार्थी शिबिरात भेट दिली. असंख्य हिंदूंचे हाल त्यांनी पाहिले. अन्न पाण्यावाचुन तडफडणारा हिन्दु देखील त्यांनी पाहला. "मुस्लीम नेशनल कार्ड" ने अनन्वीत अत्याचार केलेत हे गांधींना माहित असतांना बापू म्हणाले, की मुस्लीमांनी मला शब्द दिलाय ते अत्याचार करणार नाहीत आणि जरी झाले तरी लाहोरच्या हिन्दुनो धैर्याने लढा. आणि जिन्नानी मला शद्ब दिलाय तो पाळा. आणि लढता लढता मरण आलंच तर ते आनंदाने स्विकारा. हे या शिबिरातले बापुंचे वाक्य हिंदू समाजाला दुखावून जाते. अशातच कॉंग्रेसचे त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य कृपलानी ह्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी, त्या केवळ कॉंग्रेस अध्यक्षांच्या पत्नी एवढीच त्यांची ओळख नव्हती तर त्याही कॉंग्रेसच्या खुप मोठ्या नेत्या होत्या. त्या सुचेता कृपलानी ह्यांच्याकडे कराचीतील हिन्दु महिला एक नेत्या म्हनून मदत मागायला आल्यावर त्या सौ.कृपलानी ह्या महिलांना म्हणाल्या की तुम्ही लहान ब्लाऊज घालता, पारदर्शक साड्या घालता, ओठ पॉलिश करता म्हणुन तुमच्यावर मुस्लीम आत्याचार करतात. त्या ह्याही पुढे असं म्हणतात, मी पाहा पंजाबात आणि नोआखाली मध्ये एकटी फिरते मला कोणीच काही करत नाही. ह्या पुढे त्या म्हणतात की वेळ आलीच तर राजपूत महिलांचा आदर्श घ्या आणि जोहार करा. श्रीमान गांधीजी आणि सुश्री कृपलानी ह्यांच्या ह्या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा? थोडक्यात काय तर मरण पत्करा पण मदत मागु नका, हे तर आहेच पण हिंदूंच्या अत्याचाराकडे आणि हिंदू समाजाच्या हिताकडे डोळेझाक दोघांच्याही बोलण्यात दिसून येतो. एकीकडे राष्ट्रीय नेते असे वागत असताना एक अजून वेगळे चित्र त्यावेळेसचा हिंदू समाज बघत होता.
सिंध प्रांतातील राष्ट्रसेविका समितीच्या स्वयंसेविका सुश्री देविका सेठी ह्यांच जुलै 1947 ला राष्ट्र सेविका समितीच्या मावशी उपाख्य सौ.लक्ष्मीबाई केळकर ह्यांना पत्र येतं, की कराची आणि इकडे सर्वत्र हिन्दु महिलांवर अनन्वित अत्याचार होतायेत. तुम्ही काही तरी करा.. त्या विषयाच्या संदर्भात त्या तितक्या भीषण परिस्थितीत मावशी केळकरांना राहवत नाही, त्या आपल्या काही निवडक सेविकांना त्या विषयाच्या सुचना देतात, त्यावर चर्चा करतात. मावशी केळलर ऑगस्ट 1947 ला बैठक घेतात आणि 13 ऑगष्ट 1947 ला हिंदू समाजाच्या मदतीसाठी पाकिस्तानात जाऊन पोहचतात. त्यांच्या सोबत वेणुताई कळमकर या एकमेव सहकारी होत्या. मुंबईच्या जूहू विमानतळावरुन ह्या दोघी पाकिस्तानात गेल्या. अठ्ठेचाळीस आसन क्षमता असणाऱ्या ह्या विमानात जयप्रकाश नारायणही होते. महाराष्ट्रातले शंकरराव देव होते. बाकी सर्व मुस्लीम होते. त्यातही हे दोघेही अहमदाबादला उतरले होते. त्या विमानात त्या स्थितीत त्या दोघीच हिंदू महिला होत्या. विमानात पाकिस्तान जिन्दाबाद चे नारे लागत होते. "लढ के लिया पाकिस्तान हसके लेंगे हिन्दुस्तान" ही घोषना प्रामुख्याने होती. त्यात संघाच्या नऊवारी साडीतल्या ह्या दोनच महीला चालल्या होत्या पाकिस्तानातल्या हिन्दु महिलांना आधार देण्यासाठी. त्या पाकिस्तानातल्या द्रिघ विमानतळावर उतरल्या. तिथे वत्सलाबाई चोळकर ज्या पाकिस्तानातल्या कराचित राष्ट्रसेवीका समितीच काम करायच्या त्या आणि त्यांचे स्वयंसेवक पतीसह पंधरा ते विस स्वयंसेविका मावशीला घ्यायला आल्या. केळकर मावशी अनेकदिवस तिथे राहिल्या आणि तिथल्या महिलांना धाडस दिलं. संघर्षाच बळ दिलं. राष्ट्रसेविका समितीची स्थापना होऊन नुकतेच अकरा वर्ष झाले होते. पण कराचित संघासह राष्ट्रसेविका समितीचं नाव घेतल जायचं.
ऑगस्ट 1947 ला मावशी स्वत: काही संघ सेविकांच्या घरी प्रवासकर्त्या झाल्या. काही संघ स्वयंसेवकांनाही त्या भेटल्या, त्यावेळी कराची महानगराचे कार्यवाह लालकृष्ण अडवाणी ह्यांचीही त्यांनी भेट घेतली. रात्री महत्वाच्या महिलां सोबत बैठक घेऊन ऑगस्ट 1947 सकाळी आणि दुपार पर्यंत काही भेटीगाठी घेऊन दुपारी चार वाजता कराची मधल्या एका प्रचंड मोठ्या हवेलीत बैठक ठरली. त्या घरातील सर्व समितीच्या महिलांनी अगोदरच बैठकीचे निरोप दिले होते. त्या अनुशंगाने तिथेच त्या हवेलीच्या छतावर संपर्कातील महीलांच एकत्रीकरण केलं. शहरातील असंख्य हिन्दु महिलांची त्याला उपस्थिती होती. शेवटपर्यंत नऊशे महिला तिथे आल्या होत्या. बसायलाही जागा राहली नव्हती. पुष्कळशा महिला हवेलीच्या खाली उभ्या होत्या. त्याही स्थितीत पहिल्यांदा ध्वज लागला, शाखा झाली, गीत झालं. वातावरण गंभीर होतं पण तिथे सर्वांमध्ये उत्साह आला होता. धीर आला होता. मावशी केळकरांनी प्रत्येक महिलांना प्रतिज्ञा दिली. आत्मविश्वास दिला. त्यातच एक प्रश्नोत्तराचं सत्र झालं. एक तरुण सेविकेने प्रश्न केला, "पाकिस्तानात आम्ही सुरक्षित नाहीत आम्ही काय केलं पाहिजे.?"
मावशी केळकरांनी लाहोर जळतांना पाहीलेलं आहे, पाकिस्तानातला कट्टरवाद विमानात अनुभवला आहे, हिन्दुस्त्रियांवर झालेल्या बलात्काराच्या बातम्या ऐकल्या आहेत, कराचीतल्या सिख, सिंधी, आणि हिन्दु माणसांचे व्यापारी संकूलं जळतांना पाहिलेले आहेत अशाही स्थितीत आपल्या धिरगंभीर आणि विश्वासाच्या आश्वासक स्वरात सौ.केळकर म्हनतात, जसे शक्य होई तसे भारतात या, इथून निघुन भारतात कसे पोहचता येईल केवळ ह्याचाच विचार करा, मुंबई आणि इतर ठिकाणी संघाने तुमची व्यवस्था केली आहे. कोणत्याही प्रकारची चिंता करू नका, आपण सर्व एकाच मातेचे पुत्र आहोत, एक परिवार आहोत. ही वाईट वेळ आपल्या सर्वांच्या एकत्रीकरणाने, एकजूटीने निघून जाईल. माझ्या बहिणींनो धैर्य धरा, संयम ठेवा, शक्ती ठेवा, स्वताःच शिल राखण्यासाठी तुमच्यातली दुर्गा जागृत करा. आपल्या संघटनेवर पूर्ण विश्वास ठेवा. आणि माझ्या आत्मीय भगीनीनो ह्या कठिण परिस्थीतीतही आपल्या मातृभुमीच सेवाव्रत कायम ठेवा..! संघटनेच्या शक्तीने आपण ह्या संकटातून सुरक्षित बाहेर पडू... केळकर मावशीची ही यशश्वी बैठक आणि त्यांच उस्फूर्त बौद्धीक हे त्या दिवशी पाकिस्तानात झालं, ज्या दिवशी पाकिस्तानचा पहिलाच स्वातंत्र्य दिन होता.
हिन्दुस्तानी नारीशक्तीची ही शक्ती कराचितल्या सर्वांनी पाहली आहे. संघाने तर आपले सर्वस्वच राष्ट्रासाठी दिलेल आहे. तो इतिहास आहे. संघाच्या स्वयंसेवकांचच नाही तर संघाच्या स्वयंसेविकांच देखील मोठ योगदान ह्या लढ्यात राहिलं आहे. तिरंग्यासाठी गोळी खाणारा पहिला कार्यकर्ता हा संघाचाच होता. कॉंग्रेसनेत्या सुचेता कृपलानी ह्या हिन्दु महीलांना खिजवत असतांना त्याच महीलांना बळ देणाऱ्या लक्ष्मीबाई केळकर मावशी संघाच्याच होत्या. जेंव्हा कॉंग्रेसचे हिंदू कार्यकर्ते पाकिस्तानातून भारतात पळून येत होते तेंव्हा मुस्लीम कार्यकर्ते मात्र मुस्लीम लीगशी दोस्ती करत होते. तेंव्हाच संघाचे स्वयंसेवक अतिशय कष्टाने, जिद्दीने, जिवाची बाजी लाऊन हिन्दु आणि शिखांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. हिन्दु आणि शिखांना वाचवणारे स्वयंसेवक जेलमध्ये होते. त्यांच्यावर गांधीहत्येचा खोटा आरोप लावला होता. देशाला एकत्र ठेवण्यासाठी, अखंड भारत राहण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक एक स्वयंसेवक प्रयत्न करत होता. एकटा नाही तर आपल्या संपुर्ण परिवारासह.
- विशाल मुळे आजेगावकर.
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
===========================================
0 टिप्पण्या