धुळे शहरात संघ स्वयंसेवकांनी साजरी केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

धुळे येथील संघ स्वयंसेवकांनी अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरी केला. शहरातील संघाच्या कार्यालयात उपस्थित अधिकारी व स्वयंसेवक यांच्या हस्ते राष्ट्रध्वज तिरंगा फडकावला. शहरातील स्वयंसेवकांतर्फे वंचित घटकांना भेट देऊन त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच बाल स्वयंसेवकांनी वृक्षारोपण कार्यक्रम करून आपलाही सहभाग नोंदवला.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धुळे जिल्हा कार्यालय व शिरपूर तालुका कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धुळे जिल्हा कार्यालय (नानाराव ढोबळे स्मृती भवन) तसेच शिरपूर येथील तालुका कार्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट 2022 सकाळी 7.47 वाजता तिरंगा ध्वज फडकवित ध्वजारोहण करण्यात आले.

 यावेळी तिरंगा ध्वजास संघ स्वयंसेवकांनी अभिवादन केले तसेच राष्ट्रगीत गायले आणि सह-घोष, संघ गणवेशात मानवंदना देऊन कार्यक्रम संपन्न झाला. तसेच प्रत्येक स्वयंसेवकांनी हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत तिरंगा ध्वज आपापल्या घरी लावून अनेकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आव्हान केले...!

यावेळी कार्यक्रमात जिल्हा सह-कार्यवाह, धुळे नगर संघचालक, धुळे नगर कार्यवाह, नगर सह कार्यवाह, शिरपूर तालुका कार्यवाह आणि मोठ्या संख्येने स्वयंसेवक बंधुनी सहभाग घेतला.

दिनांक 14 ऑगस्ट रोजी धुळे येथील रा. स्व. संघ गोशाळा शाखेच्या स्वयंसेवकांनी आज शहरातील वंचित, दुर्बल घटकातील समाज बांधवांना भेटून संवाद साधला. त्यांच्या समस्या, इच्छा, अपेक्षा समजून घेतल्या व त्यांच्या परिवारासोबत तिरंगा राष्ट्रध्वज फडकवला. 

क्रांतिवीर श्री.चंद्रशेखर आजाद शाखा, आनंदखेडे, धुळेकडून अमृत महोत्सवानिमित्त वृक्षरोपण व वृक्ष वाटप

धुळे शहरातील वंचितांची व्यथा संवेदनशील धुळेकरांसमोर आणण्याची कल्पना लक्षात ठेवत आज दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता धुळे नगरातील गोशाळा प्रभात शाखेच्या स्वयंसेवकानी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत धुळे ग्रामीण क्रांतिवीर श्री.चंद्रशेखर आजाद शाखा, आनंदखेडे यांनी वृक्ष रोपण व वृक्ष वाटप केले आणि रक्षा सूत्र बांधून रक्षा बंधन उत्सव पण साजरा केला. तसेच गावातील लहान मुलांसोबत वृक्षारोपण करीत देशभक्ती गीत गात अमृत महोत्सव साजरा केला.
 
तसेच यावेळी या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धुळे ग्रामीण क्रांतिवीर श्री.चंद्रशेखर आजाद शाखा, आनंदखेडे, धुळे येथील सर्व स्वयंसेवक बंधूनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला....!

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

_______________________________________________________


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या