रा. स्व. संघाविषयी फेसबुकवर बदनामीकारक माहिती टाकणाऱ्या तरुणावर तक्रार दाखल, मागितली माफी



नांदेड l गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात सोशल मीडियात काही असामाजिक तत्वांकडून जाणीवपूर्वक खोटी व बदनामी करणारी माहिती पसरवण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायत नगर (वाढोना) येथील शेख हनीफ या व्यक्ती ने सोशल मीडियात टाकलेल्या खोट्या माहितीमुळे त्याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. 


"महान क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांचा पत्ता सांगणारास इंग्रजानी 5000 रुपये बक्षिस जाहीर केले होते आणि ते बक्षिस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीरभद्र तिवारी याने जिंकले होते अशी खोटी पोस्ट करुन रा.स्व.संघाची बदनामी करणार्या  शेख हनिफ या समाजकंटकाविरुध्द  हिमायतनगर पोलिस स्टेशन जि.नांदेड येथे तक्रार दाखल करण्यात आली"
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये हजर करून कडक समज दिली. त्यानंतर शेख हनीफ ने लेखी माफीनामा सादर करत आपल्या चुकीची कबुली दिली आहे व यापुढे असे होणार नाही अशी हमी दिली आहे. 

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

===================================




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
जर पुणा आस काय केल तर लकक्षा ठेव