कोरोनाच्या वैश्विक संकटात जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन

जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. जगात आतापर्यंत 21 हजार लोक मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येत आहे. इटली, अमेरिका, फ्रांस, चीन, इराण, ब्रिटन यासारखे प्रगत देश या महामारीला बळी पडले आहेत. अश्या परिस्थितीत जगात प्रगतीपथावर असणारा व सर्वच क्षेत्रात गेल्या दशकभरात जगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारताकडॆ जगाचे लक्ष नसणार असे होणार नाही. भारतात आतापर्यंत 11 लोक मरण पावले आहेत. जगात कोरोना विषाणूचा प्रचंड गतीने प्रसार होत असताना भारताला यावर नियंत्रण कसे मिळवता आले, हा प्रश्न विदेशी मीडियालाही पडत आहे. 


न्यूयॉर्क टाइम्सने ट्विट केले की भारतात अजूनपर्यंत कोरोना संक्रमणाच्या केवळ १२५  घटना समोर आल्या आहेत. (हे ट्विट तीन दिवस अगोदर केले गेले होते) सगळ्यांसाठी ही आश्चर्याची बाब ठरली, की पूर्वेकडील देशात आणि पश्चिमेकडील देशात मृतांचा आकडा वाढतच असताना भारत अजून कोरोनापासून अलिप्त कसा राहिला.


या ट्विट वर आलेल्या कमेंट्स वाचण्यासारख्या होत्या. सोशल मीडियाचा मूळ स्वभाव उपहासाचा आहे. लोकप्रिय फेसबुक पेजेस, ट्विटर हँडल्स, युट्युब चॅनल्सवर अचंबित करणारी येतेच पण या माहितीसह येणाऱ्या कमेंट्स काही फार वाईट नसतात. न्यूयॉर्क टाइम्सला आलेल्या प्रतिक्रियामध्ये तुळस, हळद, आवळा अश्या शब्दांचा अक्षरशः पाऊस पडला होता. भारतीय वंशाच्या लोकांनी आपल्या प्रतिकार शक्तीचे सगर्व गुणगान केले होते. एका अमेरिकी व्यक्तीने म्हंटले होते की हो न हो हे लोक आपल्या भोजनात  अश्या औषधी वापरतात ज्यामुळे त्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली होते. आपल्याला त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. 
'मदर ऑफ सारकाजम' नामक एक लोकप्रिय पेज आहे. त्याने म्हंटले होते, हिंदू लोक हजारो वर्षांपासून हातात हात न मिळवता नमस्कार करतात. पशूंची पूजा करतात. शाकाहार भोजनाला सर्वोच्च प्राधान्य देतात. घरात आल्यानंतर ते हात पाय धुतात. कदाचित ते नेहमीच योग्य राहिले आहेत. ही बाब सुद्धा विनोदात घेतली गेली. परंतु सोशल मीडियाचा एक गुण असाही आहे, की एखादी गोष्ट चर्चेत आली की ती सार्वजनिक परिप्रेक्ष्याचा विषय होऊन जाते. एका संदर्भाप्रमाणे त्याचा वापर होतो. भलेही ती बाब कोणी सहजगत्या बोलली असेल, परंतु त्यातून तर्कसिद्धी होत असेल तर ती लक्षात ठेवली जाते. 
तर मग खरच भारताचे रक्षण त्यांची प्रतिकारशक्ती करत आहे का आणि याचे मूळ त्यांच्या जीवनशैलीत आहे का? ही तीच जीवनशैली आहे का की पाश्चिमात्य कैक वर्षांपासून त्याची खिल्ली उडवत आले आहे? ज्याप्रमाणे ट्विटरवर एका भारत वंशीय व्यक्तीने म्हंटले, "आम्ही भोजनात भरपूर प्रमाणात हळदीचा वापर करतो, त्यामुळे आम्ही लवकर आजारी पडत नाही." त्यावर समर्थनात आणि खिल्ली उडवणाऱ्या प्रतिक्रियाही आल्या. 

तथापि, पूर्ण जगाचे भारताकडे लक्ष लागून आहे की भारतीय समाजात या विषाणूचा स्फोट कधी होईल? जो आतापर्यंत झालेल्या विनाशकारी घटनांपैकी सर्वात मोठा असेल, हे सगळ्यांच्या मनात आहे. वेळ पुढे जात आहे आणि आज न उद्या हे घडणार आहे, अश्या घोषणा सुद्धा आता सीमा पार करून ऐकू येऊ लागल्या आहेत. गेल्या दशकभरातील भारताची प्रगती पाहता भारताच्या स्पर्धेतील व भारतविरोधी भूमिका असणाऱ्या देशांच्या मनात हे विचार येणे स्वाभाविक आहे.  न्यूयॉर्क टाइम्सच्या मनात उत्पन्न झालेला प्रश्न अजूनही आपल्या जागी कायम आहे. 

भारतीय बऱ्याचदा म्हणतात की हा देश ईश्वराच्या साक्षीने चालत आहे. "जेहि विधी राखे राम!"  त्यांच्या म्हणण्याचा आशय असतो की निसर्गाची जे चैतन्यमय प्रणाली आहे ती भारताची संस्कृती त्याच्याशी समरूप आहे. निसर्गाला हानी पोहचेल असे आपले मानवी वर्तन आपण ठेवलेच नाही तर निसर्गासारखा दुसरा सच्चा मित्र नाही हा भारतीय रूढ विचार आहे. त्यामुळे मोठमोठ्या आपत्तीप्रसंगी भारतीय कसलीही भीती न बाळगता संकटाचा सामना करताना दिसतात. येते काही दिवस काळजीने भरलेले असताना २२ मार्च च्या दिवशी आपल्या घराच्या गॅलरीत आणि गच्चीवर करतलध्वनी आणि शंखनाद करणारे भारतीय याकडे ही परीक्षेची वेळ असल्यासारखे बघतच नाही. हे त्याचेच उदाहरण नाही का? 



तथापि सोशल मीडियामुळे हे वास्तव समोर आले आहे की 'भोजन' आणि 'भजन' याचे जीवनात मोठे महत्त्व आहे. जो तामसी, विषयुक्त भोजन करणार नाही, आहारात औषधी तत्व असलेल्या पदार्थांचा वापर करेल आणि जीवनात माता-पिता आणि देवताविषयी आदरभाव ठेवेल तो कृत्रिम व अनैसर्गिक संकटांना बळी पडणार नाही. कोणास ठाऊक भारताच्या या चकित करणाऱ्या निश्चिन्ततेच्या मुळाशी संस्कार चिंतन दडलेले असेल!

वैश्विक संकट जगातील सर्व संस्कृतीचे परीक्षण करण्याचे निमित्तसुद्धा करून देत असते. 

येणाऱ्या दिवसात ईश्वर आपले सर्वांचे रक्षण करो.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
जय हिंद वन्दे मातरम्
Unknown म्हणाले…
भारत माता की जय
Unknown म्हणाले…
भारत माता की जय