भारताने लोकसहभागाचे अद्भुत उदाहरण जगासमोर ठेवले - सरकार्यवाह

दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे आज २२ मार्च रोजी जनतेने स्वेच्छेने जनता कर्फ्युचे पालन करून दाखविले. कोरोनाविरुद्ध सुरू झालेल्या लढाईत डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, डिलिव्हरी बॉय, पोलीस प्रशासन, प्रशासकिय कर्मचारी व मीडिया सारखे घटक सुटी न घेता आपले कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या प्रति कृतज्ञता भाव प्रकट करण्यासाठी सायंकाळी ५.०० वाजता टाळ्या, थाळी किंवा घंटी वाजवून अभिवादन करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. देशभरात नागरिकांनी हे आवाहन स्वीकारले व लीलया पूर्ण केले असून रा. स्व. संघाच्या दिल्ली व नागपूर कार्यालयातही राष्ट्ररक्षकांना अभिवादन करण्यात आले आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली कार्यालयात सुरेश (भैय्याजी) जोशी यांच्या उपस्थितीत टाळ्या, थाळी व घंटी वाजवून राष्ट्र रक्षकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेशजी सोनी, अ.भा.सह प्रचार प्रमुख नरेंद्रजी कुमार, श्री डॉ. कृष्णगोपालजी, सह संपर्कप्रमुख रामलाल जी आणि कार्यालय निवासी स्वयंसेवक उपस्थित होते.


मीडियाशी संवाद साधताना सरकार्यवाह म्हणाले, देशात जनता कर्फ्युच्या माध्यमातून लोकसहभागाचे अद्भुत उदाहरण भारताने जगासमोर ठेवले गेले आहे. लोकांनी ज्या प्रकारे हा जनता कर्फ्यु पाळला आहे, त्याद्वारे जात पात, भेदाभेद, संकुचितता, पक्षीय राजकारण यामधून बाहेर निघून सामूहिक शक्तीचे दर्शन घडविले ही मोठी गोष्ट आहे. सरकारने वेळोवेळी असे लोकसहभागाचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे असेही ते म्हणाले.  

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या