'हातावर पोट' असणाऱ्यांसाठी जनकल्याण समितीचा पुढाकार; १ हजार कुटुंबाना करणार मदत

संभाजीनगर। कोरोनाचे संकट दिवसेंदिवस मोठे होत असताना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक लॉकडाऊन मुळे उपासमारीच्या संकटात सापडला आहे. शासन मदत करत असले तरी काहीवेळा मदत पुरेशी ठरत नाही, तर काही घटकांपर्यंत शासनाची मदत पोहचू शकत नाही. त्यामुळे कोरोनाच्या निमित्ताने उभ्या ठाकलेल्या सर्व संकटांचा मुकाबला करण्यासाठी संघ सज्ज झाल्याचे दृश्य आहे.

संभाजीनगरातील स्वयंसेवकांनी आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी आपत्ती निवारण समितीही गठीत केली आहे. कोरोनाच्या महासंकटांशी लाॅकडाऊन द्वारा प्रतिबंध करतानाच ज्यांना ‘दररोज काम केलं तरच चूल पेटेल’ अशी अवस्था असणाऱ्या अनेक कुटुंबांची पण आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे, असे येथील स्वयंसेवकांनी सांगितले.

रा. स्व. संघ जनकल्याण समिती आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाने गरजू परिवारांना लाॅकडाऊन संपेपर्यंत भोजन/ राशन देण्याची योजना इतर कांही संस्थासोबत मिळून आखली आहे. कमीत कमी १००० परिवारांची व्यवस्था होऊ शकेल अशी तयारी करण्यात आली आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक सामग्रीचा एक संच अंदाजे 750 रुपयाचा असून ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जाणार असल्याचेही समितीतर्फे सांगण्यात आले आहे. या कार्यासाठी यथाशक्ती आर्थिक मदत करावी व आवश्यकता वाटल्यास या कामासाठी स्वयंसेवक म्हणून वेळ द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

-------------------------------------------------------------------
रा. स्व. संघ जनकल्याण समिती, संभाजीनगर.
Acc no. 016220100004092
Ifsc code: JSBP0000016

संपर्क:
सौ सीमा कुलकर्णी
9422205693
प्रा. शिवराज बिराजदार
9923885599
---------------------------------------------------------------------
 
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ.
www.spmesmandal.org या संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर ‘Donate Now’ वर जाऊन करू शकता. 
 
संपर्क: 
डाॅ. दिवाकर कुलकर्णी - ९८२२४३५५३९
डाॅ. विशाल बेद्रे - ९८८१७३६३५६
--------------------------------------------------------------------

एका आठवड्याला 5-6 जणांना लागणारा शिधा :

1)10 किलो गहू / कणिक
2)2 किलो तांदूळ
3)2 किलो तूर किंवा मुग दाळ
4)1 लीटर तेल
5)100 gm किलो तिखट
6)100 gm गरम मसाला 
7)1 kg मीठ 
8)2 kg साखर 
9)250 चहापत्ती

-विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या