हिंदू समाजाचे सण उत्सव जसे येऊ लागतात तश्या हिंदूविरोधी शक्ती सण उत्सवांचा अपप्रचार करण्यासाठी कामाला लागतात. आपला हिन्दु विरोधी अजेंडा सुरु करतात. नवरात्र ही शक्तीची उपासना आहे. आणि दसऱ्याला रावण दहनाने त्याची सांगता आहे. रावण दहनाचा भाग जसा जवळ येऊ लागतो तसतसा डाव्यांना रावणाचा पुळका येऊ लागतो. त्या पुळक्याला कुठलाही आधार नसतो. केवळ रावण आमचा आहे असे म्हणूनच रावण दहण करु नये असे म्हणनारे समोर येतात. त्यांना जर विचारल की, का रावणाला जाळू नये, त्यांच्यातला एखादा चांगला गुण सांगा, ते नाही सांगू शकत, फक्त रावण आमचा आहे असेच ते म्हणतात.
रावण अभ्यासक होता, त्या अभ्यासकाला काही लोकं विद्वानही म्हणतात, पण विद्+वत असी शब्दव्युत्पत्ती आहे, थोडक्यात काय तर विद्वान तोच असतो, जो विचार आचरणात आणतो. रावणाने कधीच चांगला विचार आचरणात आणलेला नाही. रावण चांगला ज्योतीषी होता, त्रिकालाचं ज्ञान त्याच्याकडे असतांना, त्या ज्ञानाचा फायदा समाजाला करण्यापेक्षा तो स्वत:च्या हिताच्या आड जो जो येतोय त्याला त्याला संपवत होता. कामधेनू सारखं गोधन रावणाकडे होतं, पण रावणाने त्याचाही दूरुपयोग केला. रावण स्वतः साधक होता, पण त्याने त्याच्या साधनेचा उपयोग स्वताःच्या स्वार्थासाठी केला. त्या साधनेतून रावनाला भगवान शंकराने आत्मलिंग प्रदान केल होत, त्यातून समाजहीत व्हाव असा शंकराचा माणस होता, पण रावणाने तसे न करता स्वताःलाच शंकर होता याव म्हणुन ते लिंग लंकेत न्यायच ठरवल होतं.
अहंकार हा कधीच चांगला नसतो. संतांनी म्हंटलंय "तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरु तो समान भार देवा". परमेश्वराला अहंकार तिळा एवढाही आवडत नाही आणि रावण तर अहंकाराने ओतप्रोत होता. माता सीता ही साक्षात शक्तीरुप आहे हे रावणाच्या अभ्यासू नजरेतून सुटले नव्हते पण रावण वासनांध होता की माता सीता किशोरी असल्यापासून त्या रावणाची त्यांच्यावर वाईट नजर होती. या ठिकाणी रावण दूतोंडी होता हे ही लक्षात घेतल पाहीजे. एकीकडे रावणाला सामान्य माणसांबद्दल प्रचंड तिरस्कार होता. तो वनात भटकणारा वनवासी राम मला काय मारणार असे म्हणून हिणावत असतांना त्याच वनवासी रामाची पत्नी सीता मात्र त्याला हवी होती. एकिकडे रावण प्रचंड साधना करायचा, एखादा साधक दुसऱ्या साधकाला कसाकाय अडचणीत आणू शकतो? पण रावणाने सतत महर्षि विश्वामित्र ह्यांच्या ज्ञान-विज्ञानाच्या प्रयोगात सतत अडचणी आणल्या, मारिच आणि सुबाहू सारख्या दुष्ट शक्तीला पाठवून त्यांची साधनास्थळ, यज्ञस्थळ नष्ट करायचा. समाजाच्या कल्याणात चांगला माणुस कधीच येत नसतो. समाजहिताआड तीच माणसं येत असतात जी राक्षसी विचाराची असतात. रावण स्वार्थीही होता एकिकडे लक्ष्मणाने शुर्पनखेचे समाजहितासाठी नाक कापले, शुर्पनखेचा हेतु योग्य नव्हता तिला लक्ष्मणाला जाळ्यात घेऊन रामप्रभूला आळा घालायचा होता, त्यामुळे लक्ष्मणाने तिच्यावर म्हणजे तिच्या हेतूवर प्रहार केला. जेंव्हा रावणाला हे कळालं तेंव्हा रावणाने स्त्री चा अनादर केल्याबद्दल रामांना खोट्या तत्वज्ञानाच्या गोष्टी ऐकवल्या. पण तोच रावण माता सीतेला उचलून आनतांना तत्वज्ञान हेतूपुरस्सर विसरला होता. तो ते विसरला नव्हता रावण मुळातच स्वार्थी आणि विषयांध होता. लंकेच्या अभ्यासकांच्या मते लंकेतील बरेचशी मंडळी रावणाच्या विचाराच्या आणि सत्तेच्या विरोधात गेली होती, म्हणुन रावणाने देशद्रोहाचा आरोप बिभिषणवर ठेऊन त्यांना आपल्या सत्तेआड येनारा व्यक्ती समजून बाहेर हाकलल.. रावण कृर होता.
"एकोहम् द्वितीयोनास्ती। न भूतो न भविष्यती॥" म्हणजे मी एकटाच माझ्या सारखा दुसरा कुणीच नाही, न भूतकाळात झाला, ना तो भविष्यकाळात होईल असं रावणाच मत होतं. इतका अहंकारी रावण होता. रावण हा कृर विचार होता, रावनाचा आचर हा दुष्ट होता. रावण निर्दयी होता. रावण स्वार्थी होता, रावण विषयांध होता, रावण स्त्री शक्तीचा अनादर करनारा होता, रावण सत्तालोलूप होता. रावण गर्विष्ट होता, रावण अन्याय करणारा राजा होता, रावण समाजहिताचा विचार करणारा नव्हता, इतक्या कृर विचाराच्या माणसाला जाळून त्याचे विचार नष्ट केलेच पाहीजे. रावण हा विचारच वाईट आहे. रावणाचा व्यक्ती म्हणून आम्ही कधीच विचार करु नये, रावण हा वाईट विचार आहे. तो वाईट विचार जाळलाच पाहीजे. रावण हा राक्षसांचा राजा आहे.
विशाल मुळे आजेगावकर.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
#ravan #ravandahan #दसरा #dussehrafestival #विजयादशमी
0 टिप्पण्या