सुंदरम

"सुंदरम"

दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर शहरात त्याचे आगमन झाले. मागील सहा वर्षांपासून त्याने मल्टिनॅशनल कंपनीतील जॉब सोडून केवळ पर्यावरण संरक्षणासाठी स्वतःला वाहून घेतलंय. आता सध्या पर्यावरण संरक्षण भारत यात्रेवर निघाला आहे आणि तेही सायकलने. 

मागच्या 201 दिवसापासून  त्याचा अविरत प्रवास सुरु आहे. सहा वर्षात 1 लाख 57 हजार वृक्षांची लागवड त्याच्या प्रयत्नातून साध्य झालीय. आतापर्यंत जवळजवळ 10 हजार किमी प्रवास त्याचा झालाय आणि 18 हजारहून अधिक शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था यांना भेटी दिल्या आहेत. 

संभाजीनगर शहरात त्यांनी छत्रपती राजर्षी शाहू वसतिगृहात भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. लष्करी छावणी येथील कमांडींग ऑफिसर खान सर यांना भेटून तेथील वृक्ष लागवड उपक्रम पाहिला. तसेच केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड व अश्विनी चोबे यांची सदिच्छा भेट घेतली.

सुंदरम उत्तरप्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि त्याचं वय वर्ष केवळ 26 आहे. पर्यावरण संरक्षणाचे कार्य जाती धर्माच्या पलीकडे असून जे काही करून दाखवायचं ते ह्याच वयात. तरुणपणीच आपण देश व समाजसाठी काही केले पाहिजे. मी हे कार्य याच ईश्वरी प्रेरणेने सुरू केले असून मला माझे कुटुंब व मित्रांची मदत होते अशी प्रतिक्रिया त्याने दिली. 

दमण मधून येत असताना नवसारी येथे एका अपघातात त्याला दुखापत झाली. सायकल मोडली. पण त्याचा निर्धार सुटला नाही. दृढ निश्चय म्हणतात तो हाच!

सुंदरम तिवारी यांचे पर्यावरण रक्षणाचे हे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

सुंदरम भैया पौधा वाले Dr. Bhagwat Karad 
#पर्यावरण #पर्यावरण_संरक्षण #sundaramtiwari #aurangabad #sambhajinagarkar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या