• श्रीमती संतोष यादव जी या साक्षात शक्ती आणि चैतन्याच्या प्रतिनिधी आहेत. त्यांनी गौरीशंकर शिखर दोनवेळा सर केले आहे.
• संघाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये समाजातील विचारवंत व कर्तृत्ववान महिलांची उपस्थिती असण्याची पूर्वीपासून परंपरा आहे. संघ आणि समितीची शाखा पद्धती वेगळी असली तरी अन्य सर्व कार्यक्रमांमध्ये महिला व पुरुष एकत्र येऊनच पार पाडतात.
• भारतावरील सततच्या आक्रमणांमुळे मातृशक्ती संकुचित झाली, परंतु भारताच्या नवनिर्मितीची चाहूल लागताच आमच्या महापुरुषांनी ही रूढी नष्ट केली व मातृशक्ती ला देवतास्थानी बसविले.
• शासन, प्रशासन, वेगवेगळे नेतागण, आणि समाज, सारेजण स्वार्थ आणि भेदभावरहित भावनेने कर्तव्यपथावर वाटचाल करू लागतात, तेव्हा राष्ट्र प्रगतीच्या वाटेवर सर्वात पुढे चालत राहते. शासन, प्रशासन, आणि नेते आपल्या कर्तव्याचे पालन करतीलच, पण समाजानेही आपल्या कर्तव्यांचे विचारपूर्वक पालन केले पाहिजे.
• भारताचे ऐक्य आणि प्रगती सहन न होणाऱ्या शक्ती हा नवनिर्माणाच्या प्रक्रियेतील दुसरा मोठा अडथळा आहे. चुकीच्या किंवा खोट्या वावड्या उठवून संभ्रम निर्माण करणे, अतिरेकी कारवाया करणे किंवा अशा कारवायांना प्रोत्साहन देणे समाजात भय, कलह आणि अराजकता माजविणे अशी यांची कार्यपद्धती आपण अनुभवतो आहोत.
• समाजात भय, कलह व अराजक निर्माण करणाऱ्या शक्तींचा समाजाने धिक्कार केला पाहिजे. सरकार व प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना समाजानेही साथ दिली पाहिजे.
• वेगवेगळ्या वैद्यकीय चिकित्सापद्धतींचा योग्य समन्वय साधून आरोग्य सेवेच्या परवडणाऱ्या गुणवत्तापूर्ण तसेच सर्वांसाठी सुलभ व नफेखोरीमुक्त अशा सुविधा सरकारने उपलब्ध करून द्याव्यात हे संघानेदेखील सुचविले आहे.
• परस्परांतील मैत्रीपूर्ण संबंध व्यक्तिगत किंवा कौटुंबिक पातळीवरील व्यवहारांतून तयार होत नाहीत, मंदिर, पाणी आणि स्मशाने जोवर सर्व हिंदूंसाठी खुली होत नाहीत, तोवर समता हे केवळ स्वप्नच राहणार आहे.
• प्रशासकीय व्यवस्थेतून ज्या परिवर्तनाची अपेक्षा केली जाते, त्या परिवर्तनाचा प्रारंभ आपण आपल्या आचरणातूनही केला तर या प्रक्रियेस वेग आणि बळही मिळते. असे परिवर्तन शाश्वत असते.
• केवळ नोकरी म्हणजे रोजगार नाही, हा समज समाजात रुजविला पाहिजे. कोणतेही काम छोटे किंवा कमी प्रतिष्ठेचे नसते.
• आज भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. ५० वर्षांनंतर आजचा युवक वर्ग ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत दाखल होईल, तेव्हा त्यांचा सांभाळ करण्यासाठी किती तरुणांची गरज असेल याचाही विचार आपल्याला आज करावा लागेल.
• लोकसंख्या धोरण तयार करून सर्वांसाठी समान रीतीने लागू करायला हवे. त्यासाठी जनजागृती करून लोकांची मानसिकता करणेही आवश्यक आहे.
• कुटुंबांचे आकारमान संकुचित झाल्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या समस्या निर्माण होत असून सामाजिक तणाव. एकाकीपणा, अशी अनेक नवी आव्हानेही पुढे येऊ लागली आहेत.
• लोकसंख्येचा असमतोल झाला की देशाच्या भौगोलिक सीमा देखील बदलून जातात. लोकसंख्या नियंत्रणाबरोबरच धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही.
• संघाकडून किंवा संघटित हिंदू समाजाकडून धोका असल्याची अकारण भीती तथाकथित अल्पसंख्यांकांमध्ये पसरविली जात आहे. असे केव्हा घडले नाही, आणि यापुढेही घडणार नाही. समाजात बंधुभाव, सभ्यता आणि शांती राखण्याकरिता संघ संपूर्ण दृढनिश्चयानिशी काम करत राहाणार आहे.
• उदयपूर सरख्या निंदनीय घटना घडतात तेव्हा निषेधाची भावना अपवादात्मक राहू नये, तर अधिकाधिक मुस्लिम समाजाचा हा स्वभाव व्हायला हवा.
• वेगळेपणाची भावना निर्माण झाल्यामुळे आम्ही विखारी फाळणी अनुभवली. आम्ही भारतीय आहोत, आमचे पूर्वज भारतीय आहेत, भारताची सनातन संस्कृती आमची संस्कृती आहे, समाज आणि राष्ट्रीयत्वाचे नाते एकच आहे, हाच आमचा तारक मंत्र आहे.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी प्रांत
#RSSVijayadashami2022
0 टिप्पण्या