इ. स. 1235 मध्ये दिल्लीचा सुलतान असलेल्या इल्तुतमिश याने या प्राचीन मंदिराला उध्वस्त केले होते. यावेळी आक्रमकांपासून वाचवण्यासाठी हिंदू समाजाकडून महाकाल ज्योतिर्लिंग 550 वर्ष जवळच्याच एका विहिरीत लपवून ठेवण्यात आले होते.
इ. स. 1732 मध्ये पेशवा बाजीराव पंतप्रधान असताना मराठ्यांचा पराक्रम सर्वदूर गाजत होता, त्यावेळी पराक्रमी मराठा सरदार राणोजी शिंदे यांनी मुघलांना पराजित करून उज्जैन मध्ये भगवा फडकविला व आपले हिंदू राज्य स्थापित केले.
याच वेळी राणोजी शिंदे यांनी महाकाल ज्योतिर्लिंग कोटी तिर्थकुंड येथून काढून पुन्हा स्थापित केले व महाकाल मंदिराचे पुनर्निर्माण केले व दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा सुद्धा या ठिकाणी सुरू केला.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "महाकाल लोक"चे लोकार्पण केले. यानिमित्ताने हा इतिहास पुनः भारतीय नेत्र पटलावर आल्याशिवाय राहत नाही. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी ट्विट करून ही माहिती दिलीय व या मंदिराचा एक पुरातन फोटो सुद्धा शेअर केला आहे.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
#mahakaleshwarmandir
#historyofindia
#templesofindia
#hindutemple
#ujjainmahakaal
0 टिप्पण्या