मराठवाडा साहित्य मंच, लातूर
दि. १४ ऑक्टो 2022 लातूर
प्रति,
मा.उषाताई तांबे, मा . अध्यक्ष,
अ.भा. मराठी साहित्य मंडळ, मुंबई
विषय : लातुर मराठी साहित्याची पंरपरा व साहित्य रसिकांची भावना जपणारा सुसंस्कृत मा. संमेलनाध्यक्षाची निवड करणे...
महोदय,
उपरोक्त विषयान्वये गेल्या १०० वर्षे साहित्य संमेलनाची परंपरा असलेली मराठी ही एकमेव भाषा आहे. परंतु गेले पाच वर्षापासून साहित्य संमेलन हा राजकारणाचा अड्डा बनत आहे. त्यामुळे नवीन पिढीतील तरुण मंडळी साहित्य संमेलनापासून दूर राहत आहे व त्यामुळे मा. संमेलनाध्यक्ष या विषयीचा आदर व सन्मान कमी होत आहे.
उस्मानाबाद येथील संमेलनात मा. फादर दिब्रिटो यांचे अध्यक्ष होणे, त्यांनी फक्त अद्घाटनाचे भाषण करणे, साहित्य रसीकांसाठी आयोजीत केलेल्या कोणत्याच कार्यक्रमात ( ग्रंथदिंडी, चर्चासत्र, मुलाखत ) संमेलीत न होणे, स्वतः संमेलनाच्या कार्यक्रमाला येताना मुबंईतील सर्व चर्चच्या पाद्री मंडळीना घेऊन येणे ( साहित्याशी संबंध नसलेल्या ) व व्यासपिठासमोरील पहिल्या रांगेतील खुर्चावर सर्व पाद्री मंडळीना उपस्थित करणे हे साहित्य संमेलनाचे स्वरूप साहित्य संमेलनाला वर्षानुवर्षापासून येणाऱ्या साहित्य रसिकांना वेदना देणारे होते.
त्यानंतर पुन्हा राजकारणाचे अत्योच्य टोक म्हणजे नाशिक येथील साहित्य संमलेनापुर्वीच स्वा. सावरकर या विषयावर व मानापमानावर एवढी चर्चा समाजमाध्यमांनी केली की संवेदनशील असलेले मा. संमेलनाध्यक्ष , डॉ . जयंतराव नारळीकर सारखी जगविख्यात वैज्ञानिक साहितीक व्यक्ती संमेलनाला आलेच नाहीत. हे सर्व मराठी साहित्य रसीकांना लाजविणारी बाब होती . संमेलनाध्यक्ष शिवाय साहित्य संमेलन, ही साहित्य संमेलन इतिहासातील पहिलीच घटना आहे. एवढे होऊनही अ.भा.मराठी महामंडळाच्या कार्यकारिणीवर कांहीच परिणाम झाला नाही.
यवतमाळ येथील संमेलनापुर्वी उद्घाटकाचे संमेलनापुर्वीच भाषण प्रसिध्द करून मा. अरुणाताई ढेरे यांनी संमेलनाला उपस्थित राहू नये अशी चर्चा समाज माध्यमांनी केली.
या सर्व घटनाक्रमावरून लक्षात येते, मराठी साहित्य संमलेनाच्या आयोजनामागे हेतुपुरस्कर काही राष्ट्रविघातक, मराठी विरोधक शक्ती काम करत आहेत व संत साहित्याची परंपरा असलेल्या जगातील एकमेव मराठी भाषेवरील संमेलनाची परंपरा बंद पाडण्याचे षडयंत्र होत आहे. यावर्षी पण साहित्य संमेलनापुर्वीच मा. सुरेश द्वादशीवार यांना संमेलनाध्यक्ष करावे म्हणून कांही शक्ती कार्यरत झाल्या. श्री
द्वादशीवार यांनी लगेच स्वा. सावरकरांवर अगडपगड सुरू केली . स्वा. सावरकरांचे साहित्यिक मुल्य, त्यांचे साहित्यातील विविध विषयातील लेखन व ते नव्वद वर्षापुर्वी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हे सर्व विसरून त्यांनी म्हणणे "ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते." मा. सुरेश द्वादशीवार या वक्तव्यांने मराठवाडयातील सर्व साहित्य प्रेमी वाचक, लेखक, कवी, प्रकाशक यांच्यामध्ये तीव्र निषेधाच्या भावना निर्माण झाल्या आहेत.
आपणास विनंती की मा.श्री. सुरेश द्वादशीवार यांना साहित्य संमेलनाध्यक्ष पदापासून दूर ठेवावे व अन्य कोणत्याही मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तिला व पुर्ण वेळ संमेलनाला अपस्थित राहणाऱ्या व्यक्तीची संमेलन अध्यक्षपदी निवड करावी ही विनंती.
आपला विश्वासू,
प्रवीण सर देशमुख संयोजक ,
मराठवाडा साहित्य मंच.
0 टिप्पण्या