देशाला लागलेल्या रोगाचे निदान करणारे आणि संघाची स्थापना करणारे पूजनीय डॉ. हेडगेवार




डॉ. केशव बळीराम हेडगेवार संघाच्या स्थापने नंतर केवळ १५ वर्ष जिवंत राहिले, पण त्यांनी स्वयंसेवकांना ध्येय प्राप्ती पर्यंत उत्साहाने काम करण्यासाठी प्रेरित केलं

परम पूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, यांनी जून १९१४ मध्ये नॅशनल मेडिकल कॉलेज मध्ये मेडिकल ची डिग्री पूर्ण केल्या नंतर १९१५ मध्ये एक चिकित्सक म्हणुन ते नागपूर ला परतले पण  विचार अभ्यास आणि जिविकोपार्जन च्या दिशेने भटकले नाही. त्यांना त्या रोगाचे निदान करावे असे वाटले ज्यानी संपूर्ण राष्ट्राला पीडित केले आहे आणि या ध्येयाला लक्षात ठेवून त्यांनी आपले अवघे जीवन मातृभूमी साठी समर्पित केले.

आपल्या इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यानंतर, त्यांनी निष्कर्ष काढला देशभक्तीच्या भावनेची कमी आणि हिंदू मध्ये फूट परदेशी आक्रमण कर्त्यांच्या हातून आपला पराजय आणि परदेशी शासनाच्या आधीन गुलामीचे कारण होते. त्यांनी या मुद्यांवर उपाय करण्यासाठी एक प्रकारचे संघटन स्थापन करण्याचे निर्णय घेतले त्यांनी आजीवन अविवाहित राहण्याचे आणि आपले पूर्ण जीवन व ऊर्जेला चांगल्या कामासाठी समर्पित करण्याची शपथ घेतली २७ सप्टेंबर १९२५ ला त्यांनी याच उद्देशातून "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची" स्थापना केली.

डॉ. हेडगेवारा॑नी स्वयंसेवकांच्या रुपात ओळखल्या जाणाऱ्या आणि निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या संघटनेच्या वेगळ्या रुपात स्थापित केले. समाजाची सेवा त्यांच्यासाठी २४ तासांचे काम आहे. आणि कोणतेही क्षेत्र स्वयंसेवकांनी अप्रभावित नाही या संघटनेला धन संकलन करण्यात काहीही रस नाही, आणि यांचा खर्च हा स्वयंसेवकांच्या योगदानातूनच पूर्ण केला जातो स्वयंसेवक दर रोज शाखेत भेटतात, परम पवित्र भगव्या ध्वजाला प्रणाम करतात, बौद्धिक रूपाने मुद्द्यांवर चर्चा करतात शारीरिक व्यायाम करतात संघाचा कार्यकर्ता आपल्या मनाची पवित्रता, कोणत्याही वेळी समजाच्या सेवेसाठी तत्परता आणि निस्वार्थ सेवे ने प्रतिष्ठित आहे.

संघाच्या गतिविधिऺचा वेळेनुसार विस्तार होत गेला डॉ. हेडगेवार नेहमी प्रवासात असत त्यांचा प्रचार करण्याचा प्रकार ही निराळा होता. त्यांनी त्या वयात प्रचार प्रसिद्धी मध्ये खूप कमी रस दाखवले त्यावेळी हीच आंदोलनाची जीवन रेषा मानली जात. डॉक्टरजी रवींद्रनाथ टागोर यांच्या उक्तीचे अनुयायी होते  "हमे तब तक गुमनाम रहना चाहिए जब तक हम कूछ महत्वपर्ण हसिल नही कर लेते, हमे पृष्ठभूमि मे रहकर काम करना  और सुर्खियों से दूर रहना चाहिए "  डॉक्टर जी आपल्या समाजाच्या एका गंभीर सामाजिक दोषा विषयी टागोरांच्या आकलनावर सहमत होते. परंतु आपल्या लोकांची मानसिक बनावट त्यावेळी अश्या वापसी साठी अनुकूल नव्हती.

डॉक्टरांचे मुख्य लक्ष प्रत्येक स्वयंसेवकाच्या व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चारित्र्याला आकार देण्याचे होते. त्यांच्या मजबूत नेतृत्व, दृढता, प्रतिबद्धता आणि स्वयंसेवकांसोबत चालू असलेली जोळनी ने त्यांना राष्ट्रीय कारणासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवक विकसित करायला मदत केली. त्यांना वाटायचे प्रत्येक व्यक्ती जात, क्षेत्र, भाषा भेदभावाने मुक्त व्हावा असेच एक उदाहरण खाली दिले आहे. डॉक्टरांनी काही स्वयंसेवकांना  वेगवेगळया प्रांतात अभ्यास प्रवासासाठी पाठवले तेथे शाखा सुरू करण्यासाठी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली स्वयंसेवकांना नवीन क्षेत्रातल्या भाषेसोबत परिचित होण्यासाठी आणि तेथील वातावरणात अनुकूल होण्याची क्षमता होणे आवश्यक होते.

डॉक्टरांनी परिणामस्वरूप स्वयंसेवकांना तेलगू, हिंदी, बंगाली आणि अन्य भाषा शिकण्यासाठी जोर दिले. तथ्य हे आहे की नागपूर मध्ये हिन्दी आणि मराठी दोन्ही बोलल्या जात होत्या, हे फायद्याचे होते डॉक्टरांनी सर्वात आधी हिंदीचा प्रयोग नागपूर शाखे मध्ये केला होता त्यांनी महाकौशल क्षेत्रात संघाच्या गतिविधिऺचा विस्तार करण्यासाठी काही लोकांना पाठवले जेव्हा कोणत्या स्वयंसेवकांनी मराठी क्षेत्रात जाण्याची इच्छा वर्तविली तेव्हा डॉक्टरजी म्हणाले "तुम्ही तुमच्या क्षेत्रांत कसे बसू शकतात जर तुम्हाला दुसऱ्या भाषा माहित नाही" एका नव्या ठिकाणी काम करायला सुरुवात करा भाषा तुमच्या साठी दुसरी प्रकृती बनेल" पाण्यात उतरल्या शिवाय पोहायला शिकणे शक्य आहे का?

"अडचणींपुढे झुकू नका, टीकेची पर्वा करू नका तर सेवेतून विरोधकांना उत्तर द्या" हे त्यांचे शब्द.
संघाचे स्वयंसेवक अनुसरण करतात त्यांच्या हयातीत महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सारख्या महान राष्ट्रीय व्यक्तींनी संघांच्या शिबिरांना भेट दिली. डॉ. बी आर आंबेडकर संघ आणि स्वयंसेवकांची राष्ट्रभक्ती बघून चकित राहिले आणि अशा महान संस्थेच्या स्थापनेच्या कल्पनेचे कौतुक केले. हे निर्विवादपणे सत्य आहे, त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या वाढीवरून हे दिसून येते आणि संघाने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि आज संघ ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी शिस्तबद्ध सामाजिक-सांस्कृतिक संघटना आहे. तथापि, समकालीन निरीक्षकांना संघाची तुलना कोणत्याही समकालीन संघटनेशी करायची असेल तर कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) सोबत करतील कारण या दोन समकालीन संस्था आहेत. वैभवाच्या शिखरावर असलेल्या संघाने इतर आधुनिक संघटनांना इतिहासात खूप मागे सोडले आहे. 

डॉ हेडगेवार यांनी 1925 मध्ये विजयादशमीच्या शुभ दिवशी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) स्थापना केली. आणि लेनिनने ताश्कंदमध्ये 17 ऑक्टोबर 1920 रोजी सीपीआयची स्थापना केली. संघाच्या तुलनेत भाकपचे वय तेव्हा अवघे पाच वर्षे होते. लेनिन, एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व ज्याचा प्रभाव जगभर जाणवत होता, त्यांनी भाकपची स्थापना केली. दुसरीकडे, संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे अक्षरशः अज्ञात होते. त्यावेळी त्यांच्या कार्याच्या प्रांतात नागपूर हे नावच होते. संघटनात्मक कौशल्याची शक्ती सीपीआयच्या बाबतीत व्यापकपणे ओळख झाली. संघाला प्रचारक म्हणून अद्याप मान्यता मिळाली नव्हती. 

स्थापनेनंतर पाच वर्षांच्या आत, 25 डिसेंबर 1925 रोजी, सीपीआयचे कानपूर येथे अखिल भारतीय अधिवेशन झाले. ज्यामध्ये हजारो प्रतिनिधींनी भाग घेतला, ज्यामुळे सीपीआयला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. दुसरीकडे संघाला अजून प्रसिद्धी मिळाली नव्हती. देश विसरून जा; तो आजही विदर्भ प्रांत, नागपूर म्हणून ओळखला जात होता, संघाला जिथे त्याची स्थापना झाली  त्याच्या सभोवतालच्या प्रदेशात कर्षण मिळवायचे होते. संघाची ओळख नागपूरच्या दोन-तीन वस्तीत होती. या भागातही संघ हा त्या काळी नागपुरात कार्यरत असलेल्या अनेक आखाड्यांपैकी एक मानला जात असे डॉक्टर. हेडगेवारांनी स्थापन केलेल्या संघाच्या शाखांचीही गणना अशा आखाड्यांमध्ये होत असे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वत:ला अपघाती हिंदू म्हणत. अशा परिस्थितीत स्वाभिमान जागृत करून संघटनेला पुढे नेणे किती अवघड असेल याची कल्पना करता येते.

त्या तुलनेत प्रस्थापित कम्युनिस्ट पक्षाचे दोन तुकडे व नंतर अनेक गट झाले राजकीय आणि सामाजिक मॉडेल म्हणून विचारधारा पुरातन आणि अस्थिर मानली गेली. ते स्वतःच्या देशात टाळले गेले आणि कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव असलेल्या राजकीय राजवटी असलेल्या इतर देशांनी इतर सामाजिक-राजकीय दृष्टिकोनांच्या बाजूने ते सोडले गेले.

राष्ट्राचा अभिमान पुनर्संचयित करण्यासाठी आणि सर्व हिंदूंना एकत्र करण्यासाठी एका दिव्य आत्म्याचे दर्शन जेणेकरुन कोणताही देश आपल्यावर राज्य करू शकणार नाही संघ आपला न थांबता लढा चालू ठेवत आहे आणि भारताच्या "स्व" साठी काम करत आहे यंदाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बैठकीत दिसून आले. डॉक्टरजींच्या पेरलेल्या बीजाचे वटवृक्षात विस्तार झाले आहे. जो सर्व स्तरातील लोकांना मदत करतो वेगवेगळ्या ठिकाणी 68000 हून अधिक शाखा 36 मोठ्या संस्था, लाखो स्वयंसेवक आणि अनेक सेवा प्रकल्प सुरू झाले आहेत. "विश्वगुरु" होण्याचा प्रवास योग्य दिशेने चालू आहे. 

लेखक - पंकज जयस्वाल

अनुवाद - यश राजेंद्रजी दुधानी

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

#RSS4Nation #डॉ_केशव_बळीराम_हेडगेवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या