थोडक्यात माहिती...
वर्षातून एकदा होणाऱ्या ह्या बैठकीत सुमारे १४०० स्वयंसेवक आणि कार्यकर्ते सहभागी होतात. संघटनेच्या सरसंघचालकांचे मार्गदर्शन आणि सरकार्यवाह यांच्या द्वारे संचालित असणाऱ्या बैठकीत भारतातील सर्व जिल्ह्यातील निवडलेले प्रतिनिधी, अखिल भारतीय व प्रांतीय पातळीवरील अधिकारी, सर्व विभागांचे अग्रणी कार्यकर्ते, प्रचारक आणि संबंधित संघटना उपस्थित असतात.
या वार्षिक सभेच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये शाखेत भगव्या ध्वजा समोर प्रार्थना, मग परिचय, विविध कामाचे वृत्त ,निवेदन, कामाची प्रगती, भविष्यातील नियोजन, चर्चा सत्र, विशेष बौद्धिक वर्ग, राष्ट्रीय हितसंबंधित विषयांवर ठराव संमत करणे, संघटना यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय विचारांच्या नवीन पुस्तकांचा परिचय आणि नियमित पत्रकार वार्ता इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात.
थेट शाखा कार्य आणि जवळपास ४० संलग्न संघटनांसह संघ सातत्याने आपल्या ध्येय्याकडे वाटचाल करत आहे. अखिल भारतीय प्रतिनिधींची वार्षिक बैठक संघाच्या या विशालकाय स्वरुपाचे प्रतिनिधित्व करते.
संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी मंडळाची ही बैठक प्रत्यक्षात एक लघु कुंभ आहे जो दरवर्षी भरतो. या बैठकीत सहभागी होणारे सुमारे दीड हजार प्रतिनिधी राष्ट्र जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सुरु असलेल्या संघ कार्याचा लेखाजोखा सादर करतात.
हा लघु कुंभ म्हणजे धर्म, संस्कृती, राजकारण, शेतकरी, कामगार, शिक्षण, विद्यार्थी, आर्थिक जग, जनजाती, सेवा क्षेत्र, गौ माता संरक्षण आणि संवर्धन, सीमा सुरक्षा, साहित्य प्रकाशन आणि पत्रकारिता इत्यादी संघटनेच्या कार्यात समर्पित स्वयंसेवकांच्या परिश्रमांचा परिचय आहे.
संघाच्या सरकार्यवाहांच्या द्वारे देशभरात झालेल्या संघ कार्याच्या अहवालाच्या विस्तृत वृत्तांकनाने ह्या बैठकीची सुरवात होते. या अहवालात संघाच्या कामाची प्रगती सर्व प्रतिनिधींना देण्यात येते. देशातील वेगवेगळ्या क्षेत्र प्रदेश आणि शाखांमधे सुरु असलेल्या कामाचा ताजे वृत्त इथे मिळते.
या वार्षिक बैठकीतील कामाच्या प्रगती व्यतिरिक्त, नवीन अनुभव, नवीन प्रयोग, नवीन प्रकल्प आणि नवीन योजनांवर सविस्तर चर्चा केली जाते आणि सहमतीने निर्णय घेतले जातात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक ही एक अशी अद्भुत चिंतनशाळा आहे, ज्यात संघटनेच्या संबंधित विषयांबरोबरच राष्ट्रहिताच्या महत्त्वपूर्ण विषयांवर देखील चर्चा होते.
अर्थात संघ फक्त संघाबद्दलच विचार करत नाही; तर इथे राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक एकता तसेच समरसता , सर्वांगीण विकास, सांस्कृतिक विकास, महिला स-शक्तिकरण, शैक्षणिक जागरण तसेच जाती-धर्मांतील सद्भावना अशा ज्वलंत समस्यांवर चर्चा होते. थोडक्यात काय, तर आपल्या संसदेप्रमाणेच काहीशी कार्य प्रणाली इथे असते.
संघाच्या या वार्षिक बैठकीत जे प्रस्ताव पारित होतात ते सुद्धा 'संस्था केंद्रित' नसून 'राष्ट्रकेंद्रित' असतात.
संघाचे काम व्यक्ती, संस्था, आश्रम, भाषा, जाती, आणि क्षेत्रांवर आधारित नाही. संघाच्या संपूर्ण कार्यपद्धतीत विशेषतः बैठकित 'राष्ट्र' हाच केंद्रबिंदू असतो. त्यामुळे येथे व्यक्तिगत स्पर्धेचे (नेतागिरी) नामोनिशाण नसते.
प्रतिनिधी सभेच्या वार्षिक बैठकीत पारीत होणाऱ्या प्रस्तावांच्या विषयांचा सरळ संबंध संघाचे उद्दिष्ट म्हणजेच, 'राष्ट्राचे परम वैभव' अर्थात 'सर्वांगीण विकासाशी' असतो.
प्रतिनिधी सभेत समक्ष चर्चेकरिता ठेवल्या जाणाऱ्या प्रस्तावांवर एका क्रमबद्ध पद्धतीने विचार होतो. आधी या प्रश्नांच्या विषयांवर अखिल भारतीय कार्यकारिणी मध्ये चर्चा होते; त्यानंतर या प्रस्तावांना प्रतिनिधी सभेत सादर करून यावर सविस्तर चिंतन होते. आणि हेच कारण ज्यामुळे मतदानाची वेळ येत नाही. फक्त एका 'ओम'च्या ध्वनि सोबत सर्वसंमतीने प्रस्ताव पारित होतो.
प्रस्ताव पारित झाल्यानंतर चर्चा पुर्णपणे थांबते. बैठकीच्या अंतिम दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह विधीवत पत्रकार परिषदेत या प्रस्तावाची पार्श्वभूमी आणि हेतू समस्त भारतीयांपुढे ठेवतात.
सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या संसदीय प्रणालीच्या विशाल स्वरूपाचे अद्वितीय, अद्भुत आणि अतुलनीय उदाहरण म्हणजे ही 'दैव दुर्लभ संसद !'.
-----------
#rss_प्रतिनिधि_सभा #abps2023
0 टिप्पण्या