डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकात म्हंटल्याप्रमाणे, ‘मुस्लिम’ आणि ‘सहिष्णुता’ कधीच सोबत राहू शकत नाही का?

पाकिस्तानातील होळी ? 
- प्रशांत पोळ

कोण्या एके काळी, लाहोर येथे होळी उत्सव विविध रंगांच्या उधळणीने खूप धामधूमीत साजरा व्हायचा. संपूर्ण लाहोर शहर विविध रंगांनी माखून जात असे. वसंतोत्सवानंतर होळी म्हणजे जणू काही लाहोर ची ओळखच होती.

वर्ष 1882 मधे, जेव्हापासून लाहोर येथे पंजाब विद्यापीठ बनले, तेव्हापासून तेथे होळी साजरी करायची परंपरा चालत आली होती, परंतु 1947 च्या फाळणी ने सगळं काही बदलवून टाकले. होळी तर तेथे साजरी होत राहिली, पण जो आनंद-उत्साहाचा अनुभव आधी येत होता, तसा आनंद-उत्साह नाहीच. आत्ताच चार दिवसांपूर्वी, 6 मार्च च्या दुपारी, जेव्हा पंजाब विद्यापीठातून काही हिंदू विद्यार्थ्यांनी, विद्यापीठ परिसरात, कुलगुरु कार्यालयाच्या समोर, रंग - गुलाल उधळून  होळी खेळायला सुरुवात केली, तेव्हा 'इस्लामी जमियत तुलबा' (IJT) च्या कार्यकर्त्यांनी या होळी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना लाठी-काठ्यांनी  बेदम मारहाण केली. यात पंधरा हिंदू विद्यार्थी गंभीर स्वरूपाने जखमी झालेत, त्यांना  इस्पितळात भरती केले गेले.

होळी ची  दुसरी घटना पाकिस्तानातील  सिंध प्रांतातील, होळीच्या दुसऱ्या दिवशी , ७ मार्च च्या रात्री  घडली. सिंध प्रांतातील दुसऱ्या क्रमांका चे शहर, हैदराबाद येथे. त्याठिकाणी सिंध प्रांताचे सुप्रसिध्द डाॅक्टर श्री. धरम देव राठींना  त्यांचाच ड्रायव्हर, हनीफ लेघारी ने चाकू भोसकून ठार केले. श्री.धरम देवजींचा यात काय गुन्हा होता ? त्यांनी आपल्या  मित्रांसोबत आदल्या दिवशी होळी खेळली होती आणि  त्यांचे असे हे होळी खेळणे त्यांचा ड्रायव्हर हनीफ ला पसंत पडलं नाही. त्यामुळे हनीफ ने त्यांना ठार केले !*

डाॅक्टर श्री. धरम देव राठी हे  पाकिस्तानातले नावाजलेले  त्वचा रोग तज्ञ  (स्कीन स्पेशलिस्ट) होते. दोन वर्षांआधी ते पाकिस्तान च्या आरोग्य विभागाचे, एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून, सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी त्वचा रोगा संबंधी अनेक शिबिरं  पाकिस्तानात घेतली होती . सिंध प्रांताच्या सरकार ने पारितोषिक देऊन त्यांचा सत्कारही केलेला होता. हैदराबाद च्या सदर बाजारात डाॅक्टर्स लेन मधे त्यांचा दवाखाना होता. 

श्री.दिलीप ठाकूर त्यांचा(डाॅक्टरांचा) स्वयंपाकी होता. त्याने डाॅ क्टर व त्यांच्या ड्रायव्हर मधे विवाद होऊन भांडण झाल्याचे ऐकले होते. ड्रायव्हर चा आक्षेप होता की, '” तुम्ही हिंदू पाकिस्तानात होळीचा सण कसा काय साजरा करु शकतात ?”

या घटनेची पाकिस्तानात काही एक-दुसरा अपवाद सोडला तर या निर्घुण हत्याकांडाची कुठूनही निंदा-निषेध झालेला नाही. पाकिस्तानातील जनतेकडून वा सरकारकडून अशी अपेक्षा तरी कशी करणार ?. …परंतु भारतात सुद्धा “'तथाकथित मानवतावादी” कार्यकर्ते ही पाकिस्तानातील  या घटनेवर मूग गिळून गप्प बसलेले आहेत, याचे खूपच आश्चर्य वाटते.  * काय लाहोर नि काय हैदराबाद (सिंध) ! फक्त 75 वर्षा आधी, दोन्ही शहरे हिंदू बहुसंख्यक होती. तेथे मस्त आनंदोत्सवात होळी खेळली जात होती.  कधी काळी होळीच्या सणाला असणारी धामधूम, या शहरांची ओळख होती.* आणि आज? सिंध प्रांतातील हैदराबाद येथे  हिंदूंची संख्या फक्त 5% च शिल्लक उरलेली आहे, आणि तेथे, एका प्रतिष्ठित डाॅक्टरांना, होळी खेळण्याची शिक्षा मृत्यू च्या रुपात दिली जाते...! लाहोर येथे होळी खेळण्याच्या परिणामी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली जाते, अर्धमेलं केलं जातंय आणि पाकिस्तानचे  प्रशासन मौन राहतंय..!!

*डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आपल्या 'Thoughts on Pakistan'  या ग्रंथात लिहिले आहे की, 'मुस्लिम आणि सहिष्णुता कधीच सोबत राहू शकत नाहीत..!'*

हे सत्य आहे का ?
- प्रशांत पोळ

@ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या