@डॉ.प्रसन्न पाटील
- भ**; च्यु**; ह**खोर वगैरे शिव्या जाहीरपणे उच्चारणारे माननीय खासदार.
- सर्व विधीमंडळाला चोर म्हणणारे..
- एका जातीच्या संवेदनशील प्रश्नावर काढलेल्या मूक मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणून टिंगल करणारे...
- सर्व गुजराथी ठग असतात असं परवाच बोललेले एक मान्यवर उपमुख्यमंत्री.
- ‘गंगू तेली’ म्हणून जातीवाचक हिणवणारे नेते.
- सोशल मिडीयावर असंच काही आडवळणाने किंवा प्रत्यक्ष लिहिल्यानं लोकांना दोन दोन महिने तुरुंगात डांबलं तेंव्हा आपणच मुमं होतात.
- गोमूत्र, शेंडी- जानवं Jibes वापरून जाती- धर्माचा उपहास आपणही केलेला आहे.
- ज्यांच्या बचावार्थ आज आपण हे बोलताहात त्यांनी सतत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलेला आहे!
‘चोराला चोर’ म्हटल्यानं गुन्हा सिद्ध नाही झाला. अख्ख्या एका इतर मागासवर्गीय जातीला हिणवल्याचा गुन्हा होता. कोर्टात सिद्ध झाला. शिक्षा झाली. भारतीय घटनेतील तरतुदीनुसार खासदारकी गेली!
वरचे प्रसंगही ताजेच आहेत. त्याबद्दल खासदारकी गेली नाही हे नशीब!
भारतीय राज्यघटना सर्वोपरी आहे. ती मान्य करत गुन्हा कोर्टात सिद्ध झालेल्या गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणायला घाबरू नका. गुन्हेगाराची बाजू न घेता पुढच्या वेळी सांभाळून बोलायला सांगा.
एकूणच ओपीनियन मेकर्सनी सांभाळून बोललं पाहीजे. सोशल मिडीयाच्या जमान्यात लवकर सगळीकडं पोहोचतं. सर्वपक्षीय वाचाळ नेत्यांनी यातून धडा घेऊन जबान पे लगाम लगानेकी आदत डालनी चाहिये. मुद्दा हिरीरीने मांडा पण व्हर्बल डायरीया लागू देऊ नका. सकारात्मक विमर्श चालला पाहीजे. सध्या तर एकमेकांचा उद्धार करणं म्हणजे पब्लिक डिस्कोर्स असं समिकरण होतंय. ते थांबलं पाहीजे. ते थांबेल का हे काळ ठरवेल. तोवर-
“चिनॅाय शेठ, जिनके अपने घर शीशे के होते हैं, वो दुसरों पर पत्थर फेंका नही करते!”
Prasanna Patil
#rahulgandhi #indianpolitics
#publicdiscourse
0 टिप्पण्या