‘दी केरला स्टोरीज’ चित्रपट आणि केरळमधील ‘लव जिहाद’ची वस्तुस्थिती



दी केरला स्टोरी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर या विषयावरून वेगवेगळ्या स्तरांमधून वाद निर्माण झाले. काही ठिकाणी तर या चित्रपटाच्या सत्त्यतेवर आणि आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. केरळ, पश्चीम बंगाल या राज्यांनी या चित्रपटावर बंदी घातली, हा चित्रपट धार्मिक तेढ पसरवत आहे, अश्या चर्चा रंगवल्या जात आहेत. मात्र यामागचे सत्य जाणून घेण्यासाठी नक्कीच काही अधिकृत आकडेवारीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. 

‘दी केरला स्टोरी’ या चित्रपटात दाखवलेल्या या घटनेचे मूळ अगदी १९९० पासून रुजवले जात आहे. १९९० पासून केरळ राज्यात धार्मिक कट्टरतावाद, हिंसाचार आणि आयएसआयएस (ISIS) या संघटनेशी असलेले संबंध वाढत आहेत. या कट्टरतावादी संघटनांशी संपर्क वाढल्यामुळे राज्यातील सामान्य नागरिक धर्मांतरणाचे बळी ठरत आहेत. केरळमधील अधिकृत धार्मिक परिवर्तनाबाबतच्या एका केस स्टडीनुसार या राज्यात दरवर्षी ६०० पेक्षा जास्त लोक धर्मांतरीत होतात. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात २० ते ३० या वयोगटातील हिंदू धर्मीय स्त्रियांचा समावेश असतो. यातील काही स्त्रिया प्रेमाच्या शोधात तर काही दबावामुळे इस्लाम धर्मीय पुरुषाशी विवाह करून इस्लाम धर्म स्वीकारतात. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुण मुलींचे ब्रेन वॉशिंग केले जाते. कित्येक केसेस मध्ये तर मुस्लीम स्त्रिया हिंदू स्त्रियांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्यासाठी कारणीभूत असतात. 

केवळ २००१ ते २०११ या एकाच दशकात या राज्यातील मुस्लिमांची लोकसंख्या तब्बल ६ पटींनी वाढली आहे. त्यानुसार आता या राज्यात सुमारे ८८.७ लाख मुस्लीम लोकं आहेत, त्यातील ६३.८ लाख नागरिक हे केवळ उत्तर केरळमधीलच आहेत. यामध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. 
केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी एक या धर्मांतरणाबाबत एक अतिशय धक्कादायक खुलासा केला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त २००६ ते २०१२ या सहा वर्षांच्या काळात या राज्यातील तब्बल ७८०० लोकांनी धर्मांतर केले आहे. विशेष म्हणजे त्यात एकूण २६६७ फक्त हिंदू मुलीच होत्या. एवढंच नाही, तर २००५ ते २०१२ या कालावधीत ४००० ख्रिचन मुलींचे देखील मुस्लीम धर्मात धर्मांतर झाले आहे. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडून जॉर्ज कुरियन यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र पाठवलं होतं. त्यामध्ये त्यांनी ‘’केरळ राज्यात ख्रिश्चन मुलींना कश्या प्रकारे सॉफ्ट टार्गेट केलं जातंय’’, ही बाब स्पष्ट केली होती. २००९ साली केरळ उच्च न्यायालयाने सादर केलेल्या आकड्यांनुसार अवघ्या चार वर्षात उत्तर केरळमध्ये तब्बल ४००० धर्मांतराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. 

TOI ने केरळच्या राज्य पोलिसांकडे सादर केलेल्या एका अहवालानुसार फक्त कोझिकोड आणि मल्लापुरम या दोन शहरांमध्ये २०११ ते २०१५ या चार वर्षांच्या कालावधीतच तब्बल ५,७९३ लोकांनी इस्लाम धर्मात प्रवेश केला आहे. याबाबत जेव्हा उत्तर केरळातील मल्लापुरम येथील पीएफआय (प्रतिबंधित आतंकवादी संघटना PFI) महिला विंगची अध्यक्षा झैनाबा हिच्याशी बातचीत केली, तेव्हा तिने सांगितले कि, मागील १० वर्षात केरळमधील एकूण ५००० महिलांचे धर्मांतरण झाले आहे. 

ही सगळी आकडेवारी आणि पुरावे समोर असताना देखील या चित्रपटाला प्रोपोगंडा पसरवणारा चित्रपट म्हणलं जात असेल, तर हि निश्चितच अत्यंत निंदनीय बाब आहे. हे सर्व पुरावे, आणि द केरला स्टोरीज हा चित्रपट केरळमध्ये धर्मांतरीत झालेल्या आणि आयएसआयएस सारख्या आतंकवादी संघटनांशी जोडल्या गेलेल्या हजारो मुलींची साक्ष देत आहेत.

- शांभवी नितीन डोळे, छत्रपती संभाजीनगर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या